whatsappicon
prajavarta logo
favicon

आपल्या शहरातील ताज्या बातम्या मिळवा मोफत

Install App

Shirgaon Accident : परंदवडी पुलावरून पडून २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू; वन्यजीव आणि शिवदुर्ग रेस्क्यू पथकाच्या मदतीने मृतदेह पाण्यातून बाहेर

तारीख : 26-04-2026श्रेणी :गुन्हेगारी

feature image
whatsapp

Maval Crime : पवन मावळ हादरले! तरुणाचा गाडीसह जाळून खून; शेतात आढळला मृतदेह

तारीख : 28-04-2026श्रेणी :गुन्हेगारी

feature image

पवनानगर (Pawananagar) : पवनानगर परिसरात तरुणाचा दुचाकीसह जाळून खून केल्याची थरारक घटना उघडकीस आली असून संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात (Maval Crime) तपास सुरू करण्यात आला आहे. ही घटना दि. २८ एप्रिल २०२६ रोजी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास महागाव-धालेवाडी रस्त्यावरील मोकळ्या शेतात उघडकीस आली.


मृत तरुणाचे नाव अमोल अनंता मोहोळ (वय अंदाजे ३७, रा. वारू, ता. मावळ, जि. पुणे) असे आहे. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार, पवनानगर परिसरातील महागाव-धालेवाडी रस्त्यालगत असलेल्या एका शेतात तरुणाचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. मृतदेहाजवळ दुचाकी देखील जळालेल्या अवस्थेत आढळली. (Murder Case Maval) या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


सदर प्रकरणात नेमका खून कोणत्या कारणातून करण्यात आला, तसेच आरोपी कोण आहेत याचा शोध पोलीस घेत असून पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस (Maval Crime News) करत आहेत.

whatsapp

Talegaon Crime : मावळातून विक्रीसाठी गांजा बाळगणाऱ्या तरुणाला अटक; ४४ हजारांचा गांजा जप्त

तारीख : 28-04-2026श्रेणी :गुन्हेगारी

feature image

तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) : अंमली पदार्थ विक्रीसाठी गांजा बाळगणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केल्याची घटना मावळ तालुक्यात उघडकीस आली आहे. या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात (Talegaon Crime) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई दि. २४ एप्रिल २०२६ रोजी रात्री सुमारे सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास तळेगाव-चाकण रोडवरील एश्वर्या हॉटेलच्या मागील पीडब्ल्यूडी गोडाऊनजवळील मोकळ्या जागेत करण्यात आली.


याप्रकरणी पोलीस अंमलदार आनंद तुकाराम मोहिते (वय ३८) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार विशाल रोहिदास पडवळ (वय ३०, रा. खडोबामाळ, चाकण, ता. खेड) याला पोलिसांनी अटक केली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा संशयास्पदरीत्या फिरताना आढळल्याने त्याची झडती घेण्यात आली. त्यावेळी त्याच्याकडून सुमारे ०.८५६ ग्रॅम वजनाचा गांजा (Cannabis Seized Case) जप्त करण्यात आला. या गांजाची किंमत सुमारे ४४ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले असून तो विक्रीच्या उद्देशाने बेकायदेशीररीत्या बाळगल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस (Maval Crime) करत आहेत.

whatsapp

Talegaon Crime : कॅफेऐवजी स्वतःच्या क्यूआर कोडवर स्वीकारले पैसे! तळेगावात कॅफेमधील कर्मचाऱ्यांकडून लाखोंची फसवणूक

तारीख : 28-04-2026श्रेणी :गुन्हेगारी

feature image

तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) : कॅफेमधील QR कोडच्या माध्यमातून लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार मावळ तालुक्यात उघडकीस आला आहे. या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात (Talegaon Crime) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १ जानेवारी २०२४ पासून ते २५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी दहा वाजेपर्यंत यशवंतनगर येथील दुर्गा कॅफेमध्ये घडल्याचे समोर आले आहे.


याप्रकरणी अविनाश हरिभाऊ बोडके (वय ४५, रा. गहुंजे, ता. मावळ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अतुल ऊर्फ अनुज ऊर्फ विनय कमलेश पटेल (वय २४) आणि विनोद कमलेश पटेल (वय २०, दोघेही रा. मध्यप्रदेश) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करून कॅफेमध्ये QR कोडद्वारे पैसे स्वीकारण्याचे काम विश्वासाने घेतले होते. मात्र त्यांनी ग्राहकांकडून येणारे पैसे कॅफेच्या QR कोडऐवजी स्वतःच्या QR कोडवर व काही वेळा रोख स्वरूपात घेतले. अशा प्रकारे सुमारे ६ ते ७ लाख रुपये स्वतःच्या फायद्यासाठी वळवले. (QR Code Fraud Case) पैसे परत देण्याचे आश्वासन देत त्यांनी फिर्यादीचा विश्वास संपादन केला होता, मात्र रक्कम परत न केल्याने हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस (Maval Crime) करत आहेत.

whatsapp

Maval Crime : ‘हा डॅम तुमच्या बापाचा आहे का?’ म्हणत आंद्रा धरणाच्या सुरक्षा रक्षकावर हल्ला; मावळातील घटना

तारीख : 26-04-2026श्रेणी :गुन्हेगारी

feature image

वडगाव मावळ (Vadgaon Maval) : आंद्रा धरण परिसरात पोहण्यासाठी आलेल्या मुलांना हटकल्याच्या रागातून सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना मावळ तालुक्यात घडली आहे. या प्रकरणी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात (Maval Crime) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दि. २३ एप्रिल २०२६ रोजी दुपारी सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास राजपुरी गावच्या हद्दीतील आंद्रा धरण परिसरात घडली.


याप्रकरणी सोमनाथ शंकर तांबोळी (वय ४२, रा. मंगरुळ, ता. मावळ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सागर देवराम शिंदे आणि त्याचा पुतण्या (दोघेही रा. राजपुरी, ता. मावळ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंद्रा धरण परिसरात काही मुले पोहण्यासाठी आली होती. त्यांना हटकल्याच्या कारणावरून आरोपी सागर शिंदे याने फिर्यादीशी वाद घालत “हा डॅम तुमच्या बापाचा आहे का? मी आमदार साहेबांना घाबरत नाही,” असे म्हणत संताप व्यक्त केला. त्यानंतर आरोपींनी लाकडी दांडक्याने हातापायावर मारहाण केली तसेच तोंडावर बुक्क्यांनी प्रहार करत फिर्यादीचे वरचे चार दात व खालच्या बाजूची दातांची कवळी पाडून गंभीर दुखापत केली. (Assault Case Maval) या प्रकरणाचा पुढील तपास वडगाव मावळ पोलीस (Maval Crime News) करत आहेत.

whatsapp

Talegaon Crime : नवलाख उंब्रे परिसरात गांजा विक्रीचा पर्दाफाश; आरोपीकडून ४२६ ग्रॅम गांजा जप्त

तारीख : 26-04-2026श्रेणी :गुन्हेगारी

feature image

तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) : अंमली पदार्थ विक्रीसाठी साठा ठेवलेल्या एका व्यक्तीवर पोलिसांनी कारवाई करत त्याला ताब्यात घेतल्याची घटना मावळ तालुक्यात उघडकीस आली आहे. या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात (Talegaon Crime News) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई दि. २३ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी नवलाख उंब्रे ते बधलवाडी रस्त्यावर मुक्ताई मंदिराजवळ करण्यात आली.


याप्रकरणी भिमराव खिलारे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार दत्ता बधाले (रा. बधलवाडी, नवलाख उंब्रे, ता. मावळ) याला पोलिसांनी अटक केली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा मुक्ताई मंदिराजवळ संशयास्पदरीत्या फिरताना आढळून आला. तपासणीदरम्यान त्याच्याकडून सुमारे ४२६ ग्रॅम वजनाचा गांजा (Cannabis Seized Case) आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली. संबंधित अंमली पदार्थ हा विक्रीच्या उद्देशाने बेकायदेशीररीत्या बाळगल्याचे निष्पन्न झाले. चौकशीदरम्यान गांजा कुठून आणला याबाबत आरोपीने कोणतीही ठोस माहिती दिली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस (Maval Crime) करत आहेत.

whatsapp