whatsappicon
prajavarta logo
favicon

आपल्या शहरातील ताज्या बातम्या मिळवा मोफत

Install App

Pimpri News : पिंपरी चिंचवडमध्ये ५ नवीन पोलीस ठाण्यांची भर पडणार! पिरंगुट, मोशी, देहूगावसह मोठा विस्तार प्रस्तावित

तारीख : 04-04-2026श्रेणी :गुन्हेगारी

feature image
whatsapp

Shirgaon Crime : मोबाईल पॅटर्नचा गैरवापर करून ५० हजारांची फसवणूक; दोन आरोपींविरुद्ध गुन्हा

तारीख : 10-04-2026श्रेणी :गुन्हेगारी

feature image

शिरगाव (Shirgaon) : मावळ तालुक्यातील चांदखेड येथे मोबाईलचा पॅटर्न व पासवर्डचा वापर करून ५० हजार रुपयांची फसवणूक (Online Fraud Case) केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना मंगळवारी (दि. ०७ एप्रिल २०२६) रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली.


याप्रकरणी जितराम बुनकर (वय ३९, रा. चांदखेड, ता. मावळ) यांनी फिर्याद दिली असून बाबुलाल यादव (वय २४) आणि नारायणदास यादव (वय २१, दोघे रा. मध्यप्रदेश) यांच्याविरुद्ध शिरगाव पोलीस ठाण्यात (Shirgaon Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अद्याप अटक झालेले नाहीत.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करून फिर्यादीच्या मोबाईलमधील पॅटर्न व पासवर्डचा वापर केला. त्यानंतर फिर्यादीच्या फोनपे (PhonePe Fraud) खात्यातून परस्पर ५०,००० रुपये काढून घेत फसवणूक केली. या प्रकरणाचा पुढील तपास शिरगाव पोलीस (Maval Crime) करत आहेत.

whatsapp

Talegaon Crime : मावळात ‘मुळशी पॅटर्न’ करण्याची धमकी देत कुटुंबाला बेदम मारहाण; २० लाखांचा चेक जबरदस्तीने घेतला

तारीख : 10-04-2026श्रेणी :गुन्हेगारी

feature image

तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) : मावळ तालुक्यात जमीन व्यवहाराच्या वादातून एकाच कुटुंबावर हल्ला करून जबरदस्तीने गाडीत टाकत मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना मंगळवारी (दि. ८ एप्रिल २०२६) रोजी सायंकाळी सव्वासहा ते रात्री साडेनऊच्या दरम्यान तळेगाव दाभाडे येथील दुय्यम निबंधक कार्यालयासमोर आणि कातवी-करंजविहीर परिसरात घडली. (Land Dispute Assault Case)


नंदकुमार दत्तात्रय गाडे (वय ४३, रा. सदुंबरे, ता. मावळ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विठ्ठल खंड गाडे (वय ४७), बाळकृष्ण खंड गाडे (वय ५२), ओंकार गाडे (वय २४), सार्थक गाडे (वय २०, सर्व रा. सदुंबरे) तसेच इतर ७ ते ८ अज्ञात इसमांविरोधात तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात (Talegaon Dabhade Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी बाळकृष्ण गाडे याला अटक करण्यात आली असून इतर आरोपी फरार आहेत.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचे कुटुंबीय दुय्यम निबंधक कार्यालयासमोर असताना आरोपींनी “जमीन कशी विकली?” असा जाब विचारत धमकावले. त्यानंतर फिर्यादी, त्यांच्या कुटुंबीयांना जबरदस्तीने चारचाकी वाहनात बसवून कातवीकडे नेत हाताने व कमरेच्या पट्ट्याने मारहाण केली. या मारहाणीत फिर्यादीच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. तसेच आरोपींनी “मुळशी पॅटर्न करतो” अशी धमकी देत फिर्यादीच्या वडिलांना करंजविहीर परिसरात नेऊन मारहाण केली आणि त्यांच्याकडून जबरदस्तीने २० लाख रुपयांचा चेक तसेच २ हजार रुपये रोख रक्कम घेतल्याचे समोर आले आहे. (Extortion Case Maval)


दरम्यान, या घटनेमुळे मावळ तालुक्यात जमीन व्यवहारांशी संबंधित वाद हिंसक होत असल्याचे चित्र पुन्हा स्पष्ट झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलीस (Maval Crime) करत आहेत.

whatsapp

Maval Crime : “का बघतोस?” म्हणत रिक्षाचालकांना दोन ठिकाणी बेदम मारहाण

तारीख : 08-04-2026श्रेणी :गुन्हेगारी

feature image

तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) : मावळ तालुक्यात किरकोळ कारणांवरून रिक्षाचालकांवर हल्ले होण्याच्या घटना समोर आल्या असून दोन वेगवेगळ्या ठिकाणी मारहाणीचे प्रकार घडले आहेत. या दोन्ही घटनांमुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. (Auto Driver Assault Cases in Maval)


पहिली घटना गहुंजे परिसरातील साईनगर येथील हॉटेलमध्ये घडली. अमित आनंद पोटगुळे (वय ४५, रा. मामुर्डी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, किरण गोरख ठोंबरे (रा. मामुर्डी) आणि हॉटेलमधील तीन अज्ञात वेटरांविरुद्ध तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात (Talegaon Dabhade Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी हॉटेलमध्ये बीअरचे १०० रुपये पुढील दिवशी देण्याचे सांगितल्याने वाद झाला. या किरकोळ कारणावरून आरोपींनी लाकडी दांडक्याने मारहाण केली. या हल्ल्यात फिर्यादीच्या हनुवटीला दुखापत झाली असून डोळ्याला मार लागून सूज आली आहे. तसेच जबडा, छाती आणि पायाला मार लागून पायातील हाड फ्रॅक्चर झाले आहे.


दरम्यान, दुसरी घटना चांदखेड बसस्थानक परिसरात घडली. सनी शामराव गोटे (वय ४३, रा. चांदखेड) यांनी फिर्याद दिली असून यश भालेकर (वय अंदाजे २२) आणि वैष्णव भालेकर (वय अंदाजे २३, दोघे रा. चांदखेड) यांच्याविरुद्ध शिरगाव पोलीस ठाण्यात (Shirgaon Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


या प्रकरणात फिर्यादी रिक्षामध्ये बसले असताना आरोपींनी “का बघतोस?” असे म्हणत त्यांना रिक्षातून बाहेर ओढले. त्यानंतर लाकडी फळी व हाताने छाती आणि पोटावर मारहाण करत शिवीगाळ केली. दोन्ही घटनांतील आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.


मावळ तालुक्यात किरकोळ कारणांवरून वाढणाऱ्या मारहाणीच्या घटनांमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होत असून नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे. अशा प्रकारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.

whatsapp

Maval Crime : बास्केटबॉल पोस्ट कोसळून २० वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू; इंदोरीतील तोलानी इन्स्टिट्यूटवर निष्काळजीपणाचा आरोप (Tolani Maritime Institute)

तारीख : 06-04-2026श्रेणी :गुन्हेगारी

feature image

इंदोरी (Indori) : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील इंदोरी येथे रविवारी (दि. ५ एप्रिल) सकाळी घडलेल्या दुर्दैवी अपघातात २० वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. तोलानी मेरीटाईम इन्स्टिट्यूटच्या आवारात बास्केटबॉल खेळताना पोस्ट कोसळून ही घटना घडली. मृत विद्यार्थ्याचे नाव विशाल वर्मा (वय २०, मूळ रा. अयोध्या, उत्तर प्रदेश) असे आहे. (Maval Accident News)


मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी साडेसातच्या सुमारास विद्यार्थ्यांचा बास्केटबॉल खेळ सुरू होता. यावेळी विशाल वर्मा हा बास्केटबॉलच्या रिंगला लटकला असता, रिंगचा भार सहन न झाल्याने ती तुटली आणि त्यासोबतच लोखंडी खांब खाली कोसळला. हा खांब थेट त्याच्या अंगावर पडल्याने त्याला गंभीर दुखापत झाली.


अपघातानंतर त्याला तातडीने तळेगाव दाभाडे येथील भाऊसाहेब सरदेसाई जनरल रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, गंभीर डोक्याच्या दुखापतीमुळे सकाळी सुमारे दहाच्या सुमारास डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.


या घटनेची माहिती मिळताच रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सुचिता काळे यांनी तळेगाव एमआयडीसी पोलिसांना कळवले. पोलिस उपनिरीक्षक प्रशांत रेळेकर यांनी घटनेची पुष्टी केली असून पुढील तपास सुरू असल्याचे सांगितले. (Talegaon MIDC Police)


दरम्यान, या घटनेनंतर संतप्त विद्यार्थ्यांनी कॉलेज प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. खेळाच्या मैदानातील साहित्याची योग्य देखभाल करण्यात आली नव्हती, तसेच अपघातानंतर पोलिसांना माहिती देण्यात उशीर झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.


या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून शैक्षणिक संस्थांमधील सुरक्षेच्या उपाययोजनांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. संबंधित प्रकरणाचा तपास सुरू असून जबाबदारी निश्चित करण्याची मागणी पुढे येत आहे.

whatsapp

Talegaon Crime : आंबीतील गावठी दारूभट्टीवर पोलिसांची कारवाई; दीड लाखांचे रसायन जप्त

तारीख : 05-04-2026श्रेणी :गुन्हेगारी

feature image

तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) : मावळ तालुक्यातील आंबी परिसरातील कंजार भट वस्तीत बेकायदेशीर हातभट्टी दारू निर्मितीवर पोलिसांनी कारवाई करत मोठा साठा जप्त केला आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. ४ एप्रिल २०२६) रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ओढ्याच्या काठावर करण्यात आली. (Illegal Liquor Manufacturing Case)


इतासना पुरुषोत्तम राठोड (रा. कंजार भट वस्ती, आंबी, ता. मावळ) असे आरोपी महिलेचे नाव असून ती सध्या फरार आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई विनायक बबन शेरमाळे यांनी फिर्याद दिली असून त्यानुसार तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात (Talegaon MIDC Police Station) महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला ही बेकायदेशीररित्या हातभट्टी दारू तयार करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला. घटनास्थळी सुमारे ४ हजार लिटर क्षमतेच्या लोखंडी टाकीत अंदाजे ३ हजार लिटर गुळमिश्रित कच्चे रसायन (Illicit Liquor Case) आढळून आले. या साठ्याची एकूण किंमत सुमारे १ लाख ५४ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.


दरम्यान, पोलिसांना पाहताच संबंधित महिला आरोपी घटनास्थळावरून पळून गेली असून तिचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास तळेगाव एमआयडीसी पोलीस (Maval Crime) करत आहेत.

whatsapp