तारीख : 21-07-2025श्रेणी :आरोग्य
तारीख : 15-05-2025श्रेणी :आरोग्य
वडगाव मावळ (Vadgaon Maval) : मावळ तालुक्यातील मूत्रपिंड विकारांनी ग्रस्त रुग्णांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक सुविधा सुरू करण्यात आली आहे. उपजिल्हा रुग्णालय वडगाव मावळ (कान्हे) येथे, गुरुवार (दि. १५ मे) पासून मोफत डायलिसीस सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे, अशी घोषणा मावळचे आमदार सुनील शेळके यांनी केली.
ही उपयुक्त सेवा सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन, आमदार सुनील शेळके, पॉस्को, रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे, आणि जी. के. फाउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त प्रयत्नातून सुरू होत आहे. डायलिसीस सेवा सोमवार ते शुक्रवार दरम्यान, सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत उपलब्ध राहणार आहे. यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना त्यांच्या उपचारांचा मोठा आधार मिळणार आहे.
उपचारासाठी आवश्यक सूचना
१) उपचारासाठी येण्यापूर्वी 8080346234 या क्रमांकावर संपर्क करून आपल्या आजाराची माहिती द्यावी व अपॉइंटमेंट घेऊनच रुग्णालयात यावे.
२) रुग्णाने येताना खालील कागदपत्रांची झेरॉक्स प्रत सोबत आणावी :
▪️ आजारासंबंधीचे सर्व वैद्यकीय अहवाल / कागदपत्रे
▪️ रेशन कार्ड
▪️ आधार कार्ड
या उपक्रमासाठी मावळचे आमदार सुनिल शेळके यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. त्यांच्या पुढाकारामुळे मावळ परिसरातील रुग्णांना स्थानिक स्तरावर सुसज्ज व मोफत उपचाराची सोय उपलब्ध झाली आहे. ही सेवा मावळ तालुक्यातील सर्व नागरिकांसाठी खुली असून गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.