whatsappicon
prajavarta logo
favicon

आपल्या शहरातील ताज्या बातम्या मिळवा मोफत

Install App

Vadgaon News : दुर्दैवी! धोकादायकरीत्या चाललेल्या वाहनाला थांबवण्याच्या प्रयत्नात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला कंटेनरने चिरडले

तारीख : 15-05-2025श्रेणी :गुन्हेगारी

feature image
whatsapp

Maval Crime : पवन मावळ परिसरात वनविभागाची धाड, वन्यप्राणी शिकाऱ्यांचा पर्दाफाश; ५२ किलो वन्यप्राण्याचे मांस, दोन शस्त्रास्त्रे आणि काडतुसे जप्त

तारीख : 15-05-2025श्रेणी :गुन्हेगारी

feature image

पवनानगर (Pawnanagar) : पवन मावळ परिसरामध्ये बेकायदेशीर वन्यजीव शिकारीचा पर्दाफाश करण्यात आला. वनविभागाने तिकोना गावच्या हद्दीत केलेल्या तत्परतेच्या कारवाईमध्ये शिकारीसाठी लागणारी शस्त्रास्त्रे व शिकार केलेल्या वन्यजीवांचे ५२ किलो मांस जप्त करण्यात आले. यासह आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहिती वनविभाग अधिकाऱ्यांनी दिली. 


सुखमित हरमित सिंग भुतालिया (वय २६, रा. तिकोणा गाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी वन्यजीव (संरक्षण) कायदा, १९७२ च्या कलम ९ व ५१ अंतर्गत वनगुन्हा नोंदविण्यात आला असून, आरोपीला कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. 


वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि १३ मे) मावळ तालुक्यातील तिकोणा गाव येथे "सिंग बंगल्यावर' वनविभागाने अचानक धाड टाकली. आरोपी भुतालिया याच्याकडून सुमारे ५२ किलो संशयित वन्यप्राण्याचे मांस, दोन शस्त्रास्त्रे, जिवंत व वापरलेली काडतुसे आणि शिकारी व सोलण्यासाठी वापरण्यात येणारे विविध साहित्य जप्त करण्यात आले आहे.

 

सदरची कारवाई उपवनसंरक्षक तुषार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली व सहायक वनसंरक्षक मंगेश टाटे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या पथकात वडगाव मावळ वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश शिंदे, देवले वनपाल सीमा पलोडकर, खंडाळा वनपाल गणेश मेहत्रे, चावसर वनरक्षक संदीप अरुण आणि वनरक्षक शेळके यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.  


दरम्यान, वनविभागाने सर्वसामान्य नागरिकांना आवाहन केले आहे की, बेकायदेशीर शिकार किंवा वन्यजीव व्यापारासंदर्भात कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तत्काळ जवळच्या वनकार्यालयात किंवा हेल्पलाइनवर माहिती द्यावी. वन्यजीव आणि जिंगलांचे संरक्षण ही आपल्या सर्वाची सामूहिक जबाबदारी आहे.

 

संपूर्ण कारवाई अत्यंत गोपनीयतेने व अचूकतेने पार पडली. जप्त करण्यात आलेल्या मांसाचा नमुना वन्यजीव संशोधन केंद्र, गोरेवाडा, नागपूर येथे न्यायवैद्यक तपासणीसाठी व प्राण्याच्या प्रजातीच्या ओळखीसाठी पाठविण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या शस्त्रास्त्रांबाबत मालकी व परवाना याची चौकशी पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने करण्यात येणार आहे. 
- प्रकाश शिंदे (वनपरिक्षेत्र अधिकारी, वडगाव मावळ)
whatsapp

Talegaon Crime : बायकोने चिट्ठी टाकल्यावरून पेटला वाद; वादात पती पत्नीला लोखंडी पाईपने मारहाण

तारीख : 12-05-2025श्रेणी :गुन्हेगारी

feature image

तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) : बायकोने चिट्ठी टाकल्यावरून शेजाऱ्यांमध्ये वाद पेटला आणि या वादातून पती पत्नीला लोखंडी पाईपने बेदम मारहाण करण्यात आली. रविवारी (दि. ११) रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास श्री अर्पाटमेंट भिसे कॉलनी, वराळे, (ता. मावळ) येथे ही घटना घडली. 


याप्रकरणी अक्षय भानूदास आव्हाड (वय २७, रा. भिसे कॉलनी, वराळे ता. मावळ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी प्रशांत सुर्यकांत सुर्यवंशी (रा. भिसे कॉलनी, वराळे ता. मावळ) आणि एक महिला आरोपी या दोघांवर तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घरासमोर राहणारे आरोपी सूर्यवंशी यांनी फिर्यादी यांचा दरवाजा वाजवल्याने फिर्यादी बाहेर आले. आरोपीने त्यांच्या घरासमोर फिर्यादीच्या बायकोने वाईट मजकुर लिहिलेली चिठ्ठी टाकताना पाहिले असल्याचे सांगून वाद घातला. त्यानंतर वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन आरोपीने लोखंडी पाईपने फिर्यादीच्या पायावर, पाठीवर व खांदयावर मारहाण करुन दुखापत केली. तसेच भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी करण्यास आलेल्या फिर्यादीच्या पत्नीला देखील मारहाण करत शिवीगाळ व दमदाटी केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास तळेगाव एमआयडीसी पोलीस करत आहेत. 

whatsapp

Maval Crime : धक्कादायक! पुरावा नष्ट करण्यासाठी जेसीबीच्या सहाय्याने जमिनीत पुरला मृतदेह; मावळातील चावसर येथील घटना

तारीख : 05-05-2025श्रेणी :गुन्हेगारी

feature image

पवनानगर (Pawnanagar) : अनोळखी पुरुषाचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जेसीबीच्या साहाय्याने जमिनीत पुरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. चावसर (ता. मावळ) येथे शनिवारी (दि. ३ मे) रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही घटना निदर्शनास आली. या घटनेने संपूर्ण मावळ तालुक्यात एकच खळबळ माजली असून मयत व्यक्तीची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चावसर येथे अंदाजे ३५ ते ४० वयाच्या पुरुषाचा (नाव पत्ता माहित नाही) मृतदेह जमिनीत पुरलेल्या अवस्थेत आढळला. अज्ञात आरोपींनी सदर व्यक्तीचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचा मृतदेह चावसर-शिळींब रोडच्या बाजूला जमीन गट नं. ३४३ मध्ये जेसीबीच्या सहाय्याने खड्डा खोदून त्यात पुरला. सदर व्यक्तीच्या नातेवाईकांची अद्याप ओळख पटलेली नसून त्यासाठी खाली दिलेल्या वर्णनावरून ओळख पटल्यास तत्काळ लोणावळा ग्रामीण पोलिसांना कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 


मयत व्यक्तीचे वर्णन


एक पुरूष जातीचा अंदाजे ३५ ते ४० वयोगटाचा मृतदेह, उंची ५ फुट ०७ इंच, अंगात निळ्या रंगाची जिन्स पॅन्ट, व टि शर्ट (रंग समजुन येत नाही.)

whatsapp

Maval Crime : तुमच्या पतीचा खून झालाय, तुमच्या परिवारालाही धोका! कुटुंबियांकडून दहा लाख रुपये खंडणीची मागणी; आरोपीला कोल्हापुरातून अटक

तारीख : 28-04-2025श्रेणी :गुन्हेगारी

feature image

तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) : तुमच्या पतीचा खून झालाय, तुमच्या परिवारालाही धोका असल्याची धमकी देऊन कुटुंबियांकडे तब्बल दहा लाख रुपयांची खंडणी मागितली. बुधवारी (दि. १६ एप्रिल) रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास नवलाख उंब्रे (ता. मावळ) येथे ही घटना घडली. यातील आरोपीला इचलकरंजी, कोल्हापूर येथून अटक करण्यात आली आहे.  


पार्थ किरण काकडे (वय २३, रा. इचलकरंजी, कोल्हापूर) असे अटक आरोपीचे नाव असून याप्रकरणी शनिवारी (दि. २६ एप्रिल) रोजी पीडित महिलेने फिर्याद दिली होती. त्यानुसार फोनद्वारे धमकी देणाऱ्या काकडेसह तीन साथीदारांवर तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फियादी घरी असताना त्यांचे पती पंडीत रामचंद्र जाधव यांचा खून झाल्यासंबंधी त्यांच्या मोबाईल नंबरवर अनोळखी व्यक्तीने फोन केला. तसेच तुमच्या मुलांना, कुटुंबियांना धोका आहे अशा धमकी दिली आणि त्याने त्यांच्याकडे १० लाख रुपये खंडणीची मागणी केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 


याबाबत पोलिसांनी कौशल्यपूर्वक तपास करत आरोपीला इचलकरंजी, कोल्हापूर येथून अटक केली आहे. आरोपीकडून तीन सिमकार्ड आणि दोन मिबाईल जप्त करण्यात आले आहेत. पुढील तपास तळेगाव एमआयडीसी पोलीस करत आहेत. 

whatsapp

Maval Crime : मावळात पुन्हा घरफोडी, साडेतीन लाखांहून अधिकचा मुद्देमाल लंपास

तारीख : 22-04-2025श्रेणी :गुन्हेगारी

feature image

वडगाव मावळ (Vadgaon Maval) : जुन्या मुंबई-पुणे महामार्गालगतच्या मोहितेवाडी (साते) येथे घरफोडीची घटना घडली. येथील बंद घराचे कुलुप तोडून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम मिळून एकूण ३ लाख ६५ हजार ८५० रुपयांचा ऐवज अज्ञात चोरटयांनी शनिवारी (दि. १९ एप्रिल) रोजी संध्याकाळी साडेसात ते रात्री पावणे बारा या कालावधीत चोरून नेला.


याप्रकरणी संतोष आण्णा मोहिते (वय ४७, रा. मोहितेवाडी, साते, ता. मावळ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे शनिवारी (दि. १९ एप्रिल) रोजी संध्याकाळी साडेसात ते रात्री पावणे बारा या कालावधीत घराबाहेर असताना कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरटयांनी बेडरूममधील लोखंडी कपाट उघडून त्यामधून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम मिळून एकूण ३ लाख ६५ हजार ८५० रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. पुढील तपास वडगाव मावळ पोलीस करत आहेत.

whatsapp