तारीख : 03-08-2023श्रेणी :व्यवसाय
तारीख : 19-01-2024श्रेणी :व्यवसाय
तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) : मावळ तालुक्यातील शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या शेतकरी बांधवाना एचडीएफसी बँक प्राधान्याने कर्ज पुरवठा करेल अशी ग्वाही बॅंकेचे वरिष्ठ अधिकारी उद्दाम सय्यद यांनी वडगाव मावळ येथे केले.
मावळ तालुका पोल्ट्री योद्धा संघटना आणि एचडीएफसी बॅक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या कर्ज मेळाव्यात सय्यद हे बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी पोल्ट्री योद्धा संघटनेचे अध्यक्ष एकनाथराव गाडे होते. याप्रसंगी उद्योजक संपत पवार, पोल्ट्री संघटनेचे राज्य संघटक सोनबा गोपाळे गुरूजी, कार्याध्यक्ष सुभाष केदारी, सचिव प्रविण शिंदे, सहसचिव महेश कुडले, खजिनदार विनायक बधाले, संभाजी शिंदे, सोमनाथ राक्षे, संतोष घारे, संभाजी शिंदे, बाबाजी पाठारे, पंढरीनाथ खरमारे, अॅड. चंद्रकांत खांदवे व पोल्ट्री उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी शेतीपूरक कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय, शेळी पालन, फुलशेती आदी व्यवसायास कर्ज पुरवठा कोणत्या प्रकारे केला जातो याबाबतची सर्व माहिती वरिष्ठ अधिकारी सय्यद यांनी यावेळी सांगितली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटक सोनबा गोपाळे गुरूजी यांनी केले. तर अध्यक्ष एकनाथ गाडे यांनी पोल्ट्री उद्योजकांनी बॅंकेच्या कर्जाचा वापर करून स्वतःच्या व्यवसायात प्रगती करावी, असे आवाहन केले. तर कार्याध्यक्ष सुभाष केदारी यांनी आभार मानले.
तारीख : 28-11-2023श्रेणी :व्यवसाय
पवनानगर (Pavananagar) : 'पवना लेक कॅम्पिंग' अधिकृत करण्यासाठी तहसीलदार, जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा सुरु असून माझ्या धरणग्रस्त व्यावसायिक बांधवांसाठी मी कायम एक पाऊल पुढे आहे. जिथे जिथे आवश्यकता भासेल तिथे तिथे हाक द्या तुमच्या हाकेला मी लगेचच उपस्थित असेल, असे आश्वासन माजी मंत्री बाळा भेगडे यांनी दिले.
सोमवारी (दि. २७ नोव्हेंबर) रोजी मा. राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी कृषी पंढरी समजल्या जाणार्या पवन मावळ भागातील टेंट व्यावसायिकांची विशेष बैठक घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलताना भेगडे म्हणाले, पवना धरणाचे पाणी हे मावळ तालुक्यासह पिंपरी चिंचवड शहरवासीयांच्या पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत असल्याने त्याचे प्रदूषण होणार नाही याची देखील काळजी घ्यावी. आपला मावळ तालुका हा पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित झाल्याने स्थानिकांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध झालेल्या आहेत. आणि याचा पुरेपूर फायदा घ्यावा, असे आवाहन केले. यावेळी त्यांनी स्वतः देखील एक शाकाहारी हॉटेल कसे चालविले हे आवर्जून सांगितले. ज्यामुळे स्थानिक व्यावसायिकांना नवीन ऊर्जा मिळाली.
यावेळी उपस्थित व्यावसायिकांनी वीज कनेक्शन, ध्वनी प्रदुषण, सांडपाणी, रस्ते, दळणवळण, आणि पुरविल्या जाणार्या इतर सर्व सेवा अशा विविध समस्या मांडल्या. व्यावसायिकांच्या या सर्व समस्या ऐकल्यानंतर सर्वांनी रीतसर वीज जोडणी करून घ्या. आपण महावितरणकडून थोडा कालावधी मागून घेऊ. जेणेकरून सर्वांचे रितसर वीज कनेक्शन होउन जाईल. सांडपाण्याची व्यवस्था सगळ्यांची ठीक आहे. परंतु ज्यांची नाही, त्यांनी त्वरित आपल्या जागेत शोषखड्डे घेऊन सांडपाण्याची व्यवस्था करावी, असे भेगडे यांनी सांगितले.
याप्रसंगी मावळ भाजपचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब गुंड, मावळ विधानसभा प्रमुख रवींद्र भेगडे, युवा मोर्चा अध्यक्ष नितीन मराठे, आरपीआयचे तालुकाध्यक्ष नारायण भालेराव, भाजपचे उपाध्यक्ष गणेश ठाकर, सरपंच नारायण बोडके, किसन खैरे, बाळासाहेब मोहोळ, संजय मोहोळ, भारत काळे, ज्ञानेश्वर ठाकर, निवृत्ती ठाकर, दत्ता ठाकर, प्रकाश ठाकर, माऊली आढाव, सुधीर घरदाळे, धर्मेंद्र ठाकर, अशोक ठाकर, पांडु ठाकर, नवनाथ कारके, केशव बोडके, संदीप ठाकर, बबन ठाकर, मदन ठाकर, अंकुश ठाकर, शंकर गाडे, गणेश मानकर, आकाश ठाकर व इतर स्थानिक व्यावसायिक बहूसंख्येने उपस्थित होते.
तारीख : 17-11-2023श्रेणी :व्यवसाय
प्रजावार्ता : दर महिन्याला अपडेट होणाऱ्या एलपीजी सिलिंडरच्या किमती कधी झटका देतात तर कधी दिलासा देतात. त्यानुसार या महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच नोव्हेंबरमध्ये व्यावसायिक सिलिंडरच्या किमती वाढवण्यात आल्या होत्या. ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी १ नोव्हेंबर २०२३ रोजी १९ किलो गॅस सिलिंडरची किंमत १०३ रुपयांनी वाढवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आज पेट्रोलियम कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतला. यामुळे जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे.
दिल्ली ते मुंबईत एलपीजी सिलिंडरच्या दरात घसरण झाली आहे. विशेष म्हणजे ही कपात फक्त व्यावसायिक एलपीजी सिलिंडरसाठी आहे. व्यावसायिक एलपीजी सिलिंडरमध्ये ५० रुपयांची कपात करण्यात आली आहे. घरगुती सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. याचा अर्थ घरगुती सिलिंडरची किंमत स्थिर आहे. तुमच्या शहरात व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत काय आहे ते जाणून घेऊयात.
किमतीत वाढ झाल्यानंतर आजपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरची नवीन किंमत
शहर - जुनी किंमत - नवीन किंमत
दिल्ली - १८३३ रुपये - १७५५.५० रुपये
मुंबई - १७८५.५० रुपये - १७२८ रुपये
चेन्नई - १९९९.५० - रुपये - १९४२ रुपये
कोलकाता - १९४३ रुपये - १८८५.५० रुपये
देशांतर्गत सिलिंडरचे दर स्थिर
देशात घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. १ नोव्हेंबर २०२३ रोजीही त्यांच्या किमती बदलल्या नाहीत. याचा अर्थ राजधानी दिल्लीत १४.२ किलोच्या सिलिंडरची किंमत ९०३ रुपये आहे.
तारीख : 01-11-2023श्रेणी :व्यवसाय
प्रजावार्ता : ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना महागाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली असून एलपीजीच्या दरांत तब्बल १०० रुपयांची वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. १९ किलोच्या कमर्शियल सिलेंडरच्या किमतींत ही वाढ झाली आहे. घरगुती सिलेंडरच्या किमतींत मात्र आज कोणताही बदल करण्यात आलेला नाही. कमर्शियल सिलेंडरच्या दरांत वाढवण्यात आलेल्या किमतींचा प्रभाव खाद्य उद्योग आणि रेस्टॉरंट व्यवसायावर दिसून येईल. म्हणजेच, आजच्या दरवाढीमुळे बाहेर खाणं महाग होणार आहे.
कमर्शियल एलपीजी सिलेंडरच्या किमतींत वाढ
आज, १ नोव्हेंबरपासून, देशाची आर्थिक राजधानी मुंबईत कमर्शियल गॅस सिलेंडरची किंमत १७८५.५० रुपयांवर आली असून १०१.५० रुपयांनी महागली आहे. ऑक्टोबरमध्ये त्याचे दर १६८४ रुपये होते. दिल्लीत व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत १८३३ रुपये प्रति सिलेंडर झाली आहे. गेल्या महिन्यात १ ऑक्टोबर रोजी कमर्शियल सिलेंडरची किंमत १७३१.५० रुपये होती. दिल्लीत आजपासून कमर्शियल एलपीजी १०१.५० रुपयांनी महाग झाला आहे. कोलकातामध्ये एलपीजीची किंमत १०३.५० रुपयांनी वाढून १९४३ रुपयांवर पोहोचली आहे, तर गेल्या महिन्यात त्याचा दर १८३९.५० रुपये झाला होता. तर चेन्नईमध्ये गॅस सिलेंडरची किंमत १९९९.५० रुपयांवर आली असून १०१.५० रुपयांनी वाढली आहे. ऑक्टोबरमध्ये त्याचे दर १८९८ रुपये होते.
तारीख : 04-09-2023श्रेणी :व्यवसाय
तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) : तळेगाव दाभाडे येथील युवा उद्योजक रणजीत काकडे यांना ‘उध्दव श्री‘ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शिवसेना पक्ष प्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त संत तुकारामनगर पिंपरी येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात हा पुरस्कार वितरण समारंभ संपन्न झाला.
या कार्यक्रमात शिवसेना (उबाठा) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे, ज्येष्ठ विचारवंत श्रीपाल सबनीस, शिवसेना (उबाठा) पश्चिम महाराष्ट्र समन्वयक रवींद्र मिर्लेकर, जिल्हा प्रमुख, माजी आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार यांच्या हस्ते काकडे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी सुषमा अंधारे यांच्या हस्ते 'राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती' योजनेच्या लाभधारकांना धनादेश वाटपाचा सोहळा पार पडला.
याप्रसंगी विधानसभा संपर्क प्रमुख दिलीप घोडेकर, महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, शैला खंडागळे, अनिता तुतारे, विधानसभा प्रमुख अनंता कोऱ्हाळे, धनंजय आल्हाट, तुषार नवले, संयोजक गुलाब गरुड, युवराज कोकाटे आदी उपस्थित होते.
दरम्यान, रणजित काकडे हे आरएमके इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लिमिटेडचे संचालक तसेच इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे संचालक असून पुणे जिल्ह्यातील उद्योग क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाने कामाचा वेगळा ठसा उमटविणारे ते युवा उद्योजक आहेत. आपले वडील व प्रसिद्ध उद्योजक रामदास काकडे यांच्या पावलावर पाऊल ठेवून उद्योग विश्वाचे धडे गिरवत रणजित काकडे यांनी उद्योग विश्वाचा राजमार्ग स्वकष्टाने निर्माण केला आहे.