तारीख : 15-05-2023श्रेणी :गुन्हेगारी
तारीख : 26-12-2022श्रेणी :गुन्हेगारी
प्रजावार्ता : दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या नसून त्याची हत्या झाल्याचा मोठा खुलासा समोर आला आहे. सुशांतच्या मृत्यूला अडीच वर्ष उलटून गेली असली तरी, ही आत्महत्या नसून हत्याचं असल्याचं अनेकदा सांगण्यात आलं आहे. मात्र आता टॅबब्बल तब्बल दोन वर्षांनी त्याचे शवविच्छेदन करणाऱ्या रुपकुमार शाह यांनी मोठा खुलासा केला आहे. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत ते बोलत होते. यावेळी बोलताना रुपकुमार शाह यांनी अनेक मोठे खुलासे केल्याचं दिसून आलं आहे.
रुपकुमार शाह म्हणाले की, “जेव्हा सुशांतचं निधन झालं तेव्हा शवविच्छेदनासाठी पाच मृतदेह आले होते. त्यामध्ये एक व्हीआयपी मृतदेह असल्याचं आम्हाला सांगण्यात आलं, जेव्हा मृतदेहावरचा कपडा काढला तेव्हा शरीरावर मारहाणीच्या खूणा होत्या. गळ्यावर दोन-तीन वर्ण होते. असं त्यांनी सांगितलं आहे.
शाह पुढे म्हणाले, ‘जेव्हा मी सुशांतचा मृतदेह पाहिला तेव्हा मी वरिष्ठांना सांगितलं, ही आत्महत्या नसून हत्याच असल्याचं मला वाटतं. त्यामुळे आपण त्या पद्धतीने काम करायला हवं. पण ते म्हणाले लवकर फोटोवर काम करायचं आहे आणि मृतदेह ताब्यात द्यायचा आहे. आणि त्यानंतर आम्ही मुतदेहावर काम सुरु केलं. असं ते म्हणाले आहेत. दरम्यान, आता रुपकुमार शाह यांच्या माहितीनंतर या प्रकरणाला एक नवीन वळण येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तारीख : 18-03-2022श्रेणी :गुन्हेगारी
प्रजावार्ता : 'द काश्मीर फाइल्स' चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना फोन व मेसेजद्वारे ठार मारण्याच्या येऊ लागल्याने गृह मंत्रालयाने त्यांना वाय श्रेणीची सुरक्षा दिली आहे. इंटेलिजन्स ब्युरोच्या थ्रेट पर्सेप्शन रिपोर्टच्या आधारे गृह मंत्रालयाने अग्निहोत्री यांना ही सुरक्षा दिली आहे.
बॉलिवूड चित्रपट 'द काश्मीर फाईल्स' रिलीज झाल्यापासून चर्चेत आणि वादात आहे. एकीकडे अनेकांना हा चित्रपट आवडत आहे, काही राज्यांनी तर चित्रपट करमुक्त केला आहे. पण, दुसरीकडे अनेकांनी या चित्रपटाबद्दल नाराजीही व्यक्त केली आहे.
'द काश्मिर फाईल्स' हा चित्रपट काश्मीर पंडितांवर १९९० साली झालेल्या अत्याचारांसंदर्भातील कथानकावर आधारित आहे. या चित्रपटावरून देशात समर्थनार्थ आणि विरोधात असे दोन गट पडले आहेत. याशिवाय अग्निहोत्री यांना सतत धमकीचे फोन येत आहेत. येणाऱ्या धमकीचे कॉल्स आणि मेसेजची संख्याही वाढत आहे. या मेसेज आणि कॉल्समधून जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्या जात आहेत. त्यामुळे गृह मंत्रालयाने त्यांना वाय श्रेणीची सुरक्षा दिली आहे.
तारीख : 28-10-2021श्रेणी :गुन्हेगारी
प्रजावार्ता : अखेर उच्च न्यालयाकडून आर्यन खानचा जामीन मंजूर झाला असून, या सुनावणीमुळे अभिनेता शाहरुख खानला मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणातील महत्त्वपूर्ण सुनावणी मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात सुरू झाली होती. मात्र, ती सुनावणी अपूर्ण राहिल्याने आर्यन खान आणि इतर दोघांच्या जामीन अर्जांवर आता उर्वरित सुनावणी काल पार पडली.
आर्यन तर्फे युक्तिवाद मंगळवारी पूर्ण झाला होता. तर काल अरबाझ मर्चंट आणि मुनमून धमेचातर्फे युक्तिवाद पूर्ण झाला. मात्र एनसीबीचा युतीवाद राहिल्याने न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांनी आज सुनावणी ठेवली. एनसीबीच्यावतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांच्यासह श्रीराम शिरसाट आणि विशेष सरकारी वकील अद्वैत सेठना यांनी जोरदार युक्तिवाद केला. मात्र, आर्यन खानसह अरबाझ आणि मुनमुन यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
या युक्तिवादादरम्यान एनसीबीच्या वकिलांनी आर्यन खान हा ड्रग्जचा नियमित ग्राहक आहे आणि तो अमली पदार्थ पुरवत असल्याचे सिद्ध करणारे पुरावे आमच्याकडे आहेत, असा महत्वपूर्ण दावा केला. काल अरबाज आणि मुनमुन यांच्या वकिलांचा युक्तिवाद संपला असून एनसीबीचा युक्तिवाद आता सुरु आहे.
आर्यनकडे ड्रग्ज सापडले नाही, मात्र तो या कटात एक भाग आहे. त्यामुळे हा कटकारस्थानचा प्रकार असल्यास कलम ३७ हे आपसूक लागू होते आणि कटकरस्थानचे कलम २९ लागू झाले की गुन्हा गंभीर होतो. अरबाजकडे ड्रग्ज आहेत हे त्याला माहिती होते.
आर्यन आणि अरबाज एकाच खोलीत राहत होते. आर्यन ड्रग्ज पेडलर्सच्या संपर्कात होता. आर्यन आता नाही तर खूप वर्षांपासून ड्रग्ज सेवन करतो. क्रूझवर ११ जण भेटणार असल्याचे कळले होते आणि त्यापैकी आठ जणांना एनसीबीने अटक केली. म्हणून आम्ही कटकारस्थान असल्याचे कलम २८ आणि २९ लावले.
त्यामुळे जामीन मिळण्याविषयीच्या कठोर अटींचे कलम ३७ लागू होते. आर्यन आणि इतरांच्या अटकेच्यावेळी अटक मेमोमध्ये कलम २८ आणि २९ लावले नसले तरी मॅजिस्ट्रेट कोर्टाकडून पहिल्यांदा कोठडी मिळवताना रिमांड अर्जात ते कलम लावलेले होते असं अनिल सिंग यांनी हायकोर्टात युक्तिवाद केला.
तारीख : 22-06-2021श्रेणी :गुन्हेगारी
मुंबई : राज्यात गाजलेल्या बनावट टीआरपी प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. मुंबई पोलिसांनी अर्नबला पुरवणी आरोपपत्रात आरोपी बनविले आहे.
मुंबई पोलिसांनी ९ महिन्यांपूर्वी याप्रकरणी एफआयआर नोंदविला होता. तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अर्णब गोस्वामी यांनाही या टीआरपी घोटाळ्यामध्ये सामील असल्याचे सांगितले होते. आरोपपत्रात पोलिसांनी अर्णबसह पाच जणांची नावे दिली आहेत. अर्णब व्यतिरिक्त एआरजी आउटलेटर मीडिया मधील चार लोकांची नावे आहेत. पोलिसांनी कोर्टात दाखल केलेल्या १८०० पानांच्या आरोपपत्रात याचा उल्लेख केला आहे.
या प्रकरणात सह आरोपी म्हणून सीओओ प्रिया मुखर्जी, शिवेंदु मुलेकर, शिव सुंदरम अशीही नावे आहेत. जे यापूर्वी हवे होते. आतापर्यंत पोलिसांनी १५ लोकांविरूद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. ज्यामध्ये बीएआरसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थो दास गुप्ता आणि रिपब्लिक टीव्हीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास खानचंदानी यांचा समावेश आहे.
तारीख : 18-06-2021श्रेणी :गुन्हेगारी
मुंबई : ‘क्राईम पेट्रोल’, ‘सावधान इंडिया’ यासारख्या गुन्हेविषयक मालिकांमध्ये भूमिका साकारणाऱ्या दोन अभिनेत्रींना मुंबईतील उच्चभ्रू इमारतीत चोरी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. कोरोना काळात मालिकांचं शूटिंग बंद असल्यामुळे दोघींची पावले गुन्हेगारीकडे वळल्याचे दिसत आहे.
मालिकांचे चित्रीकरण बंद असल्यामुळे दोघी अभिनेत्रींना पैशांची कमतरता जाणवत होती. त्यांचा एक मित्र गोरेगावच्या आरे कॉलनी परिसरात पेईंग गेस्टची व्यवस्था करतो. आरे कॉलनीतील रॉयल पाम या उच्चभ्रू इमारतीत राहणाऱ्या एका व्यक्तीच्या घरात १८ मे रोजी त्या पेईंग गेस्ट म्हणून गेल्या. दरम्यानच्या काळात या घरात आधीपासून राहणाऱ्या पेईंग गेस्टकडे त्यांनी चोरी केली. लॉकरमध्ये ठेवलेली ३ लाख २८ हजार रुपये घेऊन त्या पसार झाल्या.
सुरभी सुरेंद्र लाल श्रीवास्तव आणि मोसिना मुख्तार शेख या दोघींनी आपले पैसे चोरल्याचा संशय तक्रारदाराने पोलिसांकडे व्यक्त केला. पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेज तपासल्यानंतर दोघीही इमारतीतून बाहेर पळून जाताना दिसल्या.
पोलिसांनी दोघींना ताब्यात घेत चौकशी केली, मात्र त्यांनी गुन्हा कबूल करण्यास इन्कार केला. अखेर पोलिसांनी त्यांना सीसीटीव्ही फूटेजमध्ये त्यांच्या हातात असलेली पैशांची थैली दाखवली, तेव्हा दोघींचा बांध फुटला आणि त्यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. कोरोना काळात मालिकांचे शूटिंग बंद असल्यामुळे आपल्याला पैशांची तंगी जाणवत असल्याचे त्यांनी सांगितले.