whatsappicon
prajavarta logo
favicon

आपल्या शहरातील ताज्या बातम्या मिळवा मोफत

Install App

Dehugaon News : गुरुजनांविषयी जिव्हाळा आणि जुन्या आठवणींना उजाळा; देहूत ३५ वर्षांनी दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

तारीख : 19-07-2025श्रेणी :महाराष्ट्र

feature image
whatsapp

Maval News : पवन मावळ ग्रामीण पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी रवी ठाकर, उपाध्यक्षपदी अभिषेक बोडके तर कार्याध्यक्षपदी विकास वाजे यांची निवड

तारीख : 21-07-2025श्रेणी :महाराष्ट्र

feature image

पवनानगर (Pawananagar) : मावळ तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील पत्रकारांना एकसंध नेतृत्व आणि प्रभावी व्यासपीठ मिळवून देण्यासाठी, मराठी पत्रकार संघ महाराष्ट्र रह्या संलग्न पवन मावळ मराठी पत्रकार संघाची स्थापना करण्यात आली. पवनानगर येथे झालेल्या भव्य कार्यक्रमात नव्या कार्यकारिणीची अधिकृत घोषणा झाली असून, रवी ठाकर यांची अध्यक्षपदी, अभिषेक बोडके यांची उपाध्यक्षपदी, तर विकास वाजे यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.


संघटनेचा उद्देश आणि पार्श्वभूमी


मावळ तालुक्यात पत्रकार म्हणून कार्यरत असणाऱ्या अनेकांनी दीर्घकाळापासून एकत्र येण्याची गरज व्यक्त केली होती. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाशी संलग्न मावळ तालुका मराठी पत्रकार संघाच्या अंतर्गत, पवन मावळ परिसरातील पत्रकारांसाठी स्वतंत्र आणि सक्रिय संघटनेची गरज होती. या पार्श्वभूमीवर पवन मावळ मराठी पत्रकार संघाची निर्मिती झाली आहे.


ही संघटना पत्रकारांच्या हक्कांचं संरक्षण, व्यावसायिक पातळीवर मार्गदर्शन, व प्रशिक्षण यासाठी काम करणार आहे. ग्रामीण पत्रकारांना संस्थात्मक पाठबळ मिळवून देणे आणि त्यांचे प्रश्न अधिक प्रभावीपणे शासनपातळीवर पोहोचवणे, हा मुख्य हेतू आहे.


नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे -


    •    रवी ठाकर – अध्यक्ष
    •    विकास वाजे – कार्याध्यक्ष
    •    अभिषेक बोडके – उपाध्यक्ष
    •    राहुल सोनवणे – सचिव
    •    बाबुराव काळे – प्रसिद्धी प्रमुख
    •    उत्तम ठाकर – खजिनदार
    •    प्राची केदारी – प्रकल्प प्रमुख
    •    ज्ञानेश्वर ठाकर – सल्लागार


इतर कार्यकारिणी सदस्य:


भारत काळे, सचिन शिंदे, बद्रीनारायण पाटील, विशाल कुंभार, रेखा भेगडे, योगेश घोडके, सुभाष भोते, नामदेव घरदाळे, प्रफुल्ल ओव्हाळ, संतोष थिटे, रमेश फडतरे, निलेश ठाकर.


कार्यक्रमाची सुरुवात स्वागतपर भाषणाने झाली, ज्यामध्ये मावळ तालुका मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष भारत काळे यांनी सर्व उपस्थितांचे मनःपूर्वक स्वागत केले. यानंतर ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश्वर ठाकर यांनी संघटनेच्या स्थापनेमागचा इतिहास, उद्देश आणि भविष्यातील दृष्टीकोन स्पष्ट केला.


कार्यक्रमात उपस्थित प्रमुख मान्यवरांमध्ये मावळ तालुका पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष सुदेश गिरमे, ज्येष्ठ पत्रकार व सल्लागार सोनबा गोपाळे गुरुजी, बबनराव भसे, सचिव रामदास वाडेकर, तळेगाव पत्रकार संघाच्या अध्यक्षा रेश्मा फडतरे, कामशेत पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन वाघमारे यांचा विशेष सहभाग होता.


मार्गदर्शकांचे विचार


प्रमुख मार्गदर्शकांनी संघटनेच्या कामकाजात पारदर्शकता, एकता, आणि व्यावसायिक पद्धती यांचा आग्रह धरला. बबनराव भसे सरांनी संघटनेने आपले स्वतंत्र अस्तित्व राखून मावळ तालुका पत्रकार संघाशी सहकार्याने काम करावे, असे स्पष्ट मत मांडले.


सोनबा गोपाळे गुरुजींनी पत्रकार भवनाच्या संकल्पनेबद्दल माहिती दिली व तालुक्यात स्थायी स्वरूपातील कार्यालय लवकरच उभारण्यात येईल, अशी घोषणा केली.


पुढील दिशा आणि कार्ययोजना


संघटनेचा उद्देश केवळ प्रतिष्ठेच्या निवडीपुरता मर्यादित नसून, पत्रकारांच्या हक्क, प्रशिक्षण, आणि सामाजिक जबाबदाऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा समावेश यामध्ये असेल.


रवी ठाकर यांनी अध्यक्षपद स्वीकारताना सांगितले की, “सर्व पत्रकार बांधवांना सोबत घेऊन संघटनेचा विकास करणार असून, निष्पक्ष व निडर पत्रकारितेसाठी आम्ही सदैव सज्ज आहोत.”

whatsapp

Dehugaon News : तब्बल १७ वर्षांनंतर तुकोबांची पालखी आळंदी मार्गे देहूत परतणार

तारीख : 15-07-2025श्रेणी :महाराष्ट्र

feature image

देहूगाव (Dehugaon) : तब्बल १७ वर्षांनंतर जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी पुन्हा एकदा आळंदी मार्गे देहू नगरीत परतणार आहे. ही ऐतिहासिक माहिती श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या प्रसिद्धी पत्रकातून देण्यात आली आहे.


श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या निमंत्रणाला मान


श्री संत तुकाराम महाराजांची पालखी श्री क्षेत्र देहूगाव येथे आपला ३५ दिवसांचा प्रवास संपवून पुन्हा देहू नगरीत २१ जुलैला येणार आहे. यंदा श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे ३४० वे वर्ष व संत ज्ञानेश्वर महाराजांचे ७५० वे जयंती वर्ष व श्री संत तुकाराम महाराजांचे ३७५ वे वैंकुठगमण वर्षाचा दुग्धशर्करा योग असल्याने श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानने ११ जुलै २०२५ रोजी श्री संत तुकाराम महाराज संस्थानला आपण २० जुलै २०२२५ रोजी आळंदी येथे पालखी मुक्कामी आणावी असे निमंत्रण दिले होते. याचा स्विकार करून श्री संत तुकाराम महाराज संस्थानने २० जुलैला आपला आळंदी मुक्काम निश्चित केला आहे. 


३५ दिवसांच्या वारीनंतर २१ जुलैला पालखीचे देहूला आगमन


यासाठी पालखी सोहळा प्रमुखांनी पुण्यातील एक मुक्काम कमी करून १९ जुलैला पालखी नेहमीच्या मार्गाने पिंपरीगांव येथे विठ्ठल मंदिरात मुक्कामी येणार असून २० जुलैवा पालखी सकाळी भोसरी मार्गे आळंदीकडे मार्गस्थ होईल. २० जुलैला तारखेलाचा मुक्काम करून पालखी डुडुळगाव, मोशी, टाळगाव चिखली, तळवडे, विठ्ठलनगर मार्गे देहूत २१ जुलैला दुपारी २ वाजता दाखल होईल. 


पालखीचा ऐतिहासिक मार्ग पुन्हा एकदा सजीव


२००८ साली अखेरच्या वेळेस पालखी आळंदी मार्गे देहूला आली होती. त्यावेळी चिखली व टाळगाव परिसरातील नागरिकांनी भव्य स्वागत केले होते. यंदाही ही परंपरा जपली जाणार आहे.


देहू-आळंदी मार्गावरील गावांमध्ये भक्तांचा उत्साह; संस्थानचे विशेष आवाहन 


पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर डुडुळगाव, मोशी, चिखली, तळवडे या गावांतील भाविक आणि ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या ऐतिहासिक प्रसंगी श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे, तसेच पालखी प्रमुख दिलीप महाराज मोरे, वैभव महाराज मोरे, गणेश महाराज मोरे, इत्यादींनी पालखीचे शिस्तबद्ध, भक्तिपूर्ण आणि पारंपरिक स्वागत करण्याचे आवाहन केले आहे. 

whatsapp

Ujjwal Nikam : मोठी बातमी! २६/११ घटनेचे सरकारी वकील उज्ज्वल निकम जाणार संसदेत

तारीख : 13-07-2025श्रेणी :महाराष्ट्र

feature image

प्रजावार्ता : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यसभेसाठी चार नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती केली आहे. यामध्ये प्रख्यात कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम, भारताचे माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला, शिक्षणतज्ज्ञ सी. सदानंदन मास्ते आणि इतिहासकार मीनाक्षी जैन यांचा समावेश आहे.


कोण आहेत उज्ज्वल निकम?


प्रसिद्ध सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी २६/११ मुंबई दहशतवादी हल्ला, १९९३ बॉम्बस्फोट, गुलशन कुमार हत्या प्रकरण आणि इतर अनेक महत्त्वाच्या खटल्यांमध्ये यशस्वी बाजू मांडली आहे. मुंबई लोकसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी मिळाली होती. मात्र काँग्रेसचे वर्षा गायकवाड यांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर आता राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे. 


हर्षवर्धन शृंगला – परराष्ट्र धोरणातील दिग्गज


भारताचे माजी परराष्ट्र सचिव असलेले शृंगला यांनी अमेरिकेत आणि बांग्लादेशात भारताचे राजदूत म्हणून काम पाहिले. ते G20 भारताध्यक्षतेचे समन्वयकही होते.


शैक्षणिक क्षेत्रातील दोन नावे

सी. सदानंदन मास्ते हे केरळमधील शिक्षण आणि सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. तर मीनाक्षी जैन – इतिहास लेखिका, ज्यांना पद्मश्रीने गौरवण्यात आले आहे. ‘राम आणि अयोध्या’, ‘सती’ यांसारखी पुस्तके त्यांची प्रसिद्ध आहेत. 


या चार नावांची निवड का झाली?


पूर्वीचे नामनिर्देशित सदस्य निवृत्त झाल्यामुळे या जागा रिक्त झाल्या होत्या. राष्ट्रपतींनी त्यांच्या अधिकारांचा वापर करून या नव्या सदस्यांची नियुक्ती केली आहे. या निर्णयाची माहिती केंद्र सरकारकडून अधिकृतरित्या ट्विटर (X) वरून देण्यात आली आहे.

whatsapp

Job Alert : पुण्यात १३ जुलै रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन; २००० हून अधिक नोकरीच्या संधी

तारीख : 10-07-2025श्रेणी :महाराष्ट्र

feature image

पुणे (Pune) : पुण्यात १३ जुलै रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा मंगळवार, १५ जुलै ऐवजी रविवार, १३ जुलै २०२५ रोजी सकाळी १० वाजता हरीभाई व्ही देसाई महाविद्यालय, ५९६, बुधवार पेठ, शनिवारवाड्याच्या पाठीमागे, पुणे येथे पार पडणार आहे. याबाबतची माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्रभारी सहायक आयुक्त सागर मोहिते यांनी दिली.


या रोजगार मेळाव्याचे आयोजन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, पुणे पोलीस आयुक्तालय, आणि हरीभाई व्ही देसाई कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.


२००० हून अधिक नोकरीच्या संधी उपलब्ध


या मेळाव्यात पुणे जिल्ह्यातील विविध औद्योगिक कंपन्यांकडून २ हजारांहून अधिक रिक्त पदांची मागणी करण्यात आली आहे. ही पदे १०वी, १२वी, पदवीधर, आयटीआय, डिप्लोमा धारक व प्रशिक्षणार्थी (ट्रेनी) उमेदवारांसाठी खुली आहेत.


ऑनलाईन नोंदणी आवश्यक


रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे.


उमेदवारांनी सोबत काय आणावे?


▪️ शैक्षणिक कागदपत्रांच्या छायांकित प्रती
▪️ पासपोर्ट साइज फोटो
▪️ अर्ज / रेझ्युमे (Resume)


अधिक माहितीसाठी संपर्क:


जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,
४८१, रास्ता पेठ, सरदार मुदलीयार रोड, पुणे - ४११००१
दूरध्वनी: ०२०-२६१३३६०६

whatsapp

Takwe News : अवजड वाहतूकीमुळे राजपुरी-टाकवे रस्त्याची दुरवस्था; नागरिकांची होतीये कसरत

तारीख : 07-07-2025श्रेणी :महाराष्ट्र

feature image

टाकवे बुद्रुक (Takwe Budruk) : पावसाळा सुरू होताच राजपुरी बेलज टाकवेला जोडणाऱ्या रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडल्याने नागरीकांना तसेच वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. सदर रस्त्यावरुन विद्यार्थी, कामगार, दुग्धव्यवसायिक यांना दररोज जावे लागत आहे. बेलज ते राजपुरी रस्त्यावर २०१७ नंतर शासनाचा कोणताही निधी पडला नसल्याचे सांगण्यात येत असुन परिसरात मुसळधार पाऊस पडत असल्याने रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांतुन साचलेल्या पाण्यातून नागरिकांना वाट काढुन चालावे लागत आहे.


टाकवे तसेच आंदर मावळातील अनेक कामगार याच रस्त्यावरुन नवलाख उंबरे या ठिकाणी औद्योगिक वसाहतीमध्ये कामावर जाण्यासाठी ये-जा करत आहेत. सदर रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थ करत आहेत.


रस्त्यावर वाढत चालीये अवजड वाहतूक


राजपुरी तसेज बेलज परिसरात देखील आता क्रशर-खाणीची संख्या वाढत चाली असल्याने त्याची वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. यामुळे देखील रस्ता अधिक प्रमाणात खचत असल्याने याठिकाणी रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडत आहेत. याचा छोट्या वाहनांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. 

 

"टाकवे राजपुरी रस्त्याकडे शासनाने पुर्णपणे दुर्लक्ष केले आहे. इतर ठिकाणी अनेकवेळा निधी उपलब्ध होतो, मग हा रस्ता करण्यासाठी शासनाकडे पैसे का नाहीत का? टाकवे तसेच तालुक्याच्या गावाला जाण्यासाठी आम्हाला हाच मुख्य मार्ग असल्याने शासनाने हा रस्ता तात्काळ दुरुस्त करावा" 
- बाजीराव ओव्हाळ (स्थानिक नागरिक, बेलज)

 

"२०१७ पासून बेलज ते राजपुरी या रस्त्यावर डागडुजीसाठी एकदा सुद्धा निधी उपलब्ध झाला नाही. अनेकवेळा आम्ही मागणी करुन देखील रस्त्याची दुरुस्ती होत नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत" 
- पप्पू गायकवाड (स्थानिक नागरिक, राजपुरी)
whatsapp