whatsappicon
prajavarta logo
favicon

आपल्या शहरातील ताज्या बातम्या मिळवा मोफत

Install App

Maval News : शेलारवाडी आणि तळेगाव मधील डीआरडीओ संपादित जमिनींना वाढीव मोबदला, शेतकऱ्यांच्या २२ वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला यश

तारीख : 02-08-2024श्रेणी :राजकारण

feature image

तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) : २००२ साली डीआरडीओ रक्षा मंत्रालयातर्फे संपादित केलेल्या शेलारवाडी आणि तळेगाव मधील जमिनींना वाढीव मोबदला मिळावा यासाठी दोन्ही गावातील शेतकऱ्यांनी न्यायालयीन लढा उभारला होता. यासंबंधीचा खटला जिल्हा न्यायालय, वडगाव येथे सुरू होता. आज अखेर न्यायालयाने दोन्ही बाजूंचे वाद-प्रतिवाद ऐकून २२ वर्षांनी डीआरडीओला शेतकऱ्यांना वाढीव मोबदला देण्याचे निर्देश दिले.


शेतकऱ्यांच्या बाजूने ॲड. विलास कुलकर्णी, ॲड. रितेश कुलकर्णी व ॲड. मुरकुटे साहेब यांनी काम पाहिले. शेतकऱ्यांना वाढीव मोबदल्याचा लढा उभारण्यासाठी स्वर्गीय माजी आमदार दिगंबरदादा भेगडे यांचे महत्त्वाचे योगदान तथा पुढाकार होता त्यांची आज प्रकर्षाने आठवण निकालाने संतुष्ट झालेल्या सर्व शेतकऱ्यांना झाली. 


स्वर्गीय दिगंबरदादा भेगडे यांच्या सोबतच शंकरराव शेलार, माजी आमदार कृष्णराव भेगडे, माजी मंत्री बाळा भेगडे, बबनराव भेगडे, बापूसाहेब भेगडे, गणेश भेगडे, रवींद्र भेगडे, स्वर्गीय पांडुरंग शेलार, स्वर्गीय काशिनाथ शेलार, स्वर्गीय हरिद्वार भेगडे, विश्वनाथ काशिनाथ शेलार, उध्दव शेलार, पोपटराव भेगडे, बाळासाहेब शेलार, अशोकराव शेलार, लाहुमामा शेलार, किसन भेगडे, विठ्ठल भेगडे, वसंत भेगडे पाटील, अनंत चंद्रचुड, जगन्नाथ भेगडे, सतीश वाळुंज, गणेश पांडुरंग शेलार, दिलीप शेलार, योगेश शेलार, विश्वनाथ शेलार, अमित भेगडे, अतुल शेलार, निलेश भेगडे, अजित शेलार, संजय शेलर, श्रीकृष्ण भेगडे, अभिजीत भेगडे या सर्वांचे योगदान या संपूर्ण खटल्यात लाभले.


भारतीय जनता मोर्चाचे प्रदेश सचिव रघुवीर उद्धव शेलार आणि 
शंकरराव शेलार व उद्धवराव शेलार यांनी ॲड. विलास कुलकर्णी,ॲड. रितेश कुलकर्णी, ॲड. पल्लवी नादवटे यांचे आज प्रभू श्रीरामचंद्रांच्या आयोध्यातील मंदिराची प्रतिकृती देऊन अभिनंदन केले.

whatsapp

Vadgaon News : पुणे रिंगरोड भूसंपादनातील बाधित शेतकऱ्यांना त्वरित मोबदला द्यावा, वडगाव शहर भाजपची मागणी

तारीख : 03-07-2024श्रेणी :राजकारण

feature image

वडगाव मावळ (Vadgaon Maval) : पुणे रिंगरोड भूसंपादनाबाबत उपविभागीय अधिकारी यांनी ८ एप्रिल रोजी भूमी अधिक्षक कार्यालयाकडे पत्राद्वारे बाधित शेतकऱ्यांचा अहवाल मागवला होता. परंतु तीन महिने उलटून देखील बाधित शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नाही. त्यामुळे पुणे रिंगरोड भूसंपादनातील बाधित शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई मोबदला द्यावा, अशी मागणी वडगाव शहर भाजपच्या वतीने तहसीलदार विक्रम देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. 


शहर भाजपने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मावळ तालुक्यात वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी भुसंपादन झाले. परिस्थितीनुसार शेतकरी बांधवानी प्रशासनाला सहकार्य देखील केले. पुणे (पुर्व) चक्राकार रस्त्याच्या कामासाठी वडगाव, कातवी आणि आंबी येथील बाधित शेतकऱ्यांनी सदैव सहकार्य दर्शविले असताना शेतकऱ्यांची शासनाकडून अडवणूक व पिळवणूक होत आहे. शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर भुसंपादनाची नोंद झाली, मात्र त्याचा मोबदला मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना शासन दरबारी अनेक खेपा माराव्या लागत आहेत. हा वडगाव, कातवी आणि आंबी येथील बाधित शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. त्यामुळे पुणे रिंगरोड भूसंपादनातील बाधित शेतकऱ्यांना त्वरित मोबदला द्यावा, असे निवेदनात म्हटले आहे. 


सदर निवेदन तहसीलदारांना सुपूर्द करण्याप्रसंगी मा. सभापती गुलाबराव म्हाळसकर, वडगाव शहर भाजपा अध्यक्ष संभाजी म्हाळसकर, मुकेश शिंदे, नगरसेवक किरण म्हाळसकर, रविंद्र म्हाळसकर, अमोल ढिडे यांसह कार्यकर्ते उपस्थित होते. 

whatsapp

Takwe News : पांदण रस्ता खुला करा, अन्यथा.....; आक्रमक टाकवे ग्रामस्थांनी अडवले जलजीवन मिशनचे काम

तारीख : 14-03-2024श्रेणी :राजकारण

feature image

टाकवे बुद्रुक (Takwe Budruk) : टाकवे बुद्रुक येथील मुख्य रस्ता ते जाकवेलपर्यंत जाणारा पांदण रस्ता खुला करुन द्यावा, यासाठी टाकवे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. तशी निवेदनाद्वारे देखील नायब तहसीलदार अमोल पाटील यांच्याकडे मागणी करण्यात आली आहे. तर याच मागणीसाठी आक्रमक ग्रामस्थांनी जल जीवन मिशनच्या मुख्य पाइपलाईनचेही काम काही दिवसांपासून अडवले आहे. त्यामुळे यावर संबंधित प्रशासन वेळेत आणि योग्य निर्णय घेणार का? हे पाहणे महत्वाचे ठरत आहे.


ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पांदण रस्ता खुला करण्यात यावा यासाठी दोन महिन्यांपूर्वी तहसील विभागाकडून पांदण रस्त्याची प्रत्यक्ष स्थळपाहणी करण्यात आली. ज्या शेतकऱ्यांच्या जागेतून रस्ता होणार आहे, अशा सर्व शेतकऱ्यांसोबत चर्चा करण्यात आली. यावर पुढील काही दिवसात तहसीलदार स्वतः येऊन रस्ता खुला करुन देतील असे आश्वासन शेतकऱ्यांना महसूल विभागाने दिले होते. मात्र शेतकऱ्यांनी पुढे दोन महिने वाट पाहिल्यानंतर देखील महसूल विभागाने यावर उचित कार्यवाही केली नाही.


दरम्यान, ग्रामपंचायतकडून एका बाजूने पांदण रस्ता करण्यास सुरुवात झाली होती. मात्र पुढे एका खासगी कंपनीकडून पुन्हा काम थांबविण्यात आले असल्याने नागरिकांनी आज तहसीलदार यांची भेट घेऊन पांदण रस्ता खुला करण्याबाबत पुढील कार्यवाही तात्काळ करण्यात यावी असे निवेदनात म्हटले आहे. 


यावेळी सरपंच सुवर्णा असवले, ग्रामविकास अधिकारी सुभाष बांगर, माजी सरपंच भुषण असवले, पो. पाटील अतुल असवले, विश्वनाथ असवले, अनिल असवले, देवराम असवले, गोरख असवले, योगेश मोढवे, काळुराम असवले आदीजण उपस्थित होते.


पांदण रस्ता खुला करण्यासाठी ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा, परंतु त्यामागचं कारण काय?


टाकवेतील जाकवेलकडे जाणारा रस्ता सध्या खाजगी जागेतून जात आहे. कालांतराने हा रस्ता देखील बंद झाल्यास जाकवेलकडे जाण्यासाठी पांदण रस्ता एकमेव मार्ग असल्याने जलजीवन मिशन कामासोबतच पांदण रस्ता देखील मोकळा करावा अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांसह ग्रामपंचायतची देखील आहे. परंतु पाइपलाईन झाल्यानंतर पांदण रस्ता होईल का नाही? याची शाश्वती स्थानिक शेतकऱ्यांना नसल्याने जलजीवन मिशन पाईपलाईन देखील सध्या अडविण्यात आली आहे.

whatsapp

Maval News : भाजपा किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडेंच्या नेतृत्वात मावळात 'ग्राम परिक्रमा यात्रेचा' शुभारंभ

तारीख : 03-03-2024श्रेणी :राजकारण

feature image

शिरगाव (Shirgaon) : भाजपा किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडेंच्या नेतृत्वात उर्से (ता. मावळ) येथे 'ग्राम परिक्रमा यात्रेचा' शुभारंभ करण्यात आला. यावेळी मावळ भाजपा किसान मोर्चाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे यांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले.


यावेळी बोलताना गणेश भेगडे म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी बांधवांसाठी राबविलेल्या विविध जनकल्याणकारी योजनांची व शेती क्षेत्रासाठी केलेल्या विकास कामांची माहिती ग्राम परिक्रमा अभियानाच्या माध्यमातून तालुक्यातील शेतकरी बांधवांना दिली जाणार असून त्याचा जास्तीत जास्त प्रचार प्रसार करण्याचे कार्य देखील यानिमित्ताने केले जाणार असल्याचे सांगितले.


याप्रसंगी भाजपा मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रवींद्र भेगडे, जेष्ठ नेते बाबूलाल गराडे, किसान मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष धामणकर, उपाध्यक्ष बाळासाहेब गाडे, मावळ तालुका किसान मोर्चाचे अध्यक्ष सूर्यकांत सोरटे, कार्याध्यक्ष विकास शेलार, भाजप उर्से गाव अध्यक्ष रोहिदास धामणकर, नगरसेवक अरुण भेगडे पाटील, भारत ठाकूर आदी मान्यवर व शेतकरी बांधव उपस्थित होते.

whatsapp