whatsappicon
prajavarta logo
favicon

आपल्या शहरातील ताज्या बातम्या मिळवा मोफत

Install App

Ashadhi Wari 2025 : पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने वाहतूक बदलाबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

तारीख : 18-06-2025श्रेणी :महाराष्ट्र

feature image
whatsapp

Vadgaon News : श्री पोटोबा महाराज प्रासादिक पायी दिंडीचे ग्रामस्थांच्या उपस्थितीत पंढरपूरच्या दिशेने उत्साहात प्रस्थान

तारीख : 19-06-2025श्रेणी :महाराष्ट्र

feature image

वडगाव मावळ (Vadgaon Maval) : जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त दरवर्षी प्रमाणे आपल्या वडगाव शहरातील श्री पोटोबा महाराज प्रासादिक पायी दिंडींचे श्री क्षेत्र पंढरपूरकडे आनंदी वातावरणात प्रस्थान झाले.


प्रथमता वारकरी संप्रदायातील भाविक आणि शहरातील सर्वच मान्यवरांनी तसेच नागरिक व महिला भगिनींनी विणापूजन करत सर्वांच्या उपस्थितीत आरती करून ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिरास प्रदक्षिणा घालून टाळ-मृदंगाच्या गजरात, विठूनामाच्या जयघोषात, भगव्या पताका खांद्यावर घेतलेले वारकरी, मृदुंगमणी, टाळकरी, डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन सहभागी झालेल्या महिलांनी भक्तिमय वातावरणात फुगडीचा फेर धरत दिंडीचे बाजारपेठेतून प्रस्थान झाले. यावेळी शहरातील जैन समाजाच्या वतीने पायी दिंडीवर फुलांची उधळण करत एकात्मतेचे दर्शन घडवले.


मा. नगराध्यक्ष मयूर ढोरे, अबोली ढोरे यांच्या पुढाकाराने हभप श्री. महेंद्र दत्तात्रय ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली आठ वर्षांपूर्वी वडगाव शहर आणि कातवी, सांगवी, साते, मोहितेवाडी, जांभूळ, ब्राह्मणवाडी, विनोदेवाडी, वारंगवाडी या परिसरातील वारकऱ्यांच्या सोयीसाठी श्री पोटोबा महाराज प्रासादिक पायी दिंडी सुरू केली.


यावेळी मा. सरपंच बाळासाहेब ढोरे, मंगेश काका ढोरे, देवस्थानचे विश्वस्त किरण भिलारे, पंढरीनाथ ढोरे, विश्वस्त अरुण चव्हाण, अशोकराव ढमाले, अर्जुन ढोरे, अबोली ढोरे, पुनम जाधव, श्रीधर ढोरे, सुभाष जाधव, गोरख ढोरे, शांताराम कुडे, बाळकृष्ण ढोरे, सुरेशराव कुडे, अतुल वायकर, सतीश ढोरे, राजेंद्र वहिले, राजेंद्र म्हाळसकर,चंदुकाका ढोरे, अजित देशपांडे, नंदाताई ढोरे, गुलाबराव म्हाळसकर, तुकाराम ढोरे, राजेंद्र कुडे, आबा चव्हाण, पप्पू कुडे, युवराज ढोरे, वैभव पिंपळे, ज्योती जाधव, सुवर्णा चव्हाण, सचिन ढोरे, नरेंद्र ढोरे, बजरंग ढोरे, नितीन चव्हाण, सचिन कडू, अमर चव्हाण, शेखर वहिले, रमेश ढोरे, अनंता कुडे, सिद्धेश ढोरे आणि दिंडीचे पदाधिकारी, शहरातील नागरिक व पंचक्रोशीतील भाविक, भगिनी पत्रकार बांधव, जैन बांधव, मोरया महिला प्रतिष्ठानच्या  पदाधिकारी, संचालिका महिला भगिनी, सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध सोसायटीतील मित्रपरिवार, हितचिंतक आणि समस्त ग्रामस्थ या सोहळ्यानिमित्ताने शहरातील सर्वच मान्यवर मंडळी एकत्रितपणे मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 


याप्रसंगी मा. नगराध्यक्ष मयूर ढोरे, दिंडी अध्यक्ष महेंद्र ढोरे यांनी उपस्थित असलेल्या सर्व वारकरी भाविकांचे स्वागत करत पायी दिंडीला निघालेल्या वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

whatsapp

Maval News : पुणे पीपल्स बँकेच्या वतीने वारकऱ्यांसाठी मदतीचा हात

तारीख : 19-06-2025श्रेणी :महाराष्ट्र

feature image

टाकवे बुद्रूक (Takwe Budruk) : पुणे पीपल्स बँकेच्या वतीने व संचालक संजीव असवले यांच्या संकल्पनेतून जगद्‌गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा नामदेव वारकरी दिंडी क्र. : १०२ मु.पो. टाकवे बु।।, ता. मावळ देहू ते पंढरपूर पायी दिंडीतील वारकऱ्यांसाठी जेवण बनवण्यासाठी भांडी देण्यात आली.


यावेळी पुणे पिंपल्स बँकेचे विद्यामान संचालक संजीव असवले, जेष्ठ कारभारी दत्तोबा असवले, मा.उपसरपंच तानाजी असवले, चेअरमन तानाजी गुणाट, विठ्ठल रुक्मिणी ट्रस्टी शांताराम असवले, सोसायटी संचालक अनंता असवले, उद्योजक दत्तात्रय असवले, फॉरेस्ट ऑफिसर कोडींराम जांभुळकर, शिवाजी लोंढे, निवृत्ती गायकवाड, सुरेश असवले, मा.चेअरमन दत्ता घोजगे, शिवाजी असवले, काशिनाथ जांभुळकर, बाळासाहेब पिंगळे आदीजण उपस्थित होते.

whatsapp

Pawana Dam : पवना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची तुफान बॅटिंग; दोन दिवसात तब्बल चार टक्क्यांनी वाढ, एकूण पाणीसाठा किती?

तारीख : 19-06-2025श्रेणी :महाराष्ट्र

feature image

पवनानगर (Pawananagar) : गेल्या दोन दिवसांपासून पवन मावळवासियांना मुसळधार पावसाने चांगलेच झोडपले आहे. दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. कधी मध्यम तर कधी मुसळधार सरी कोसळत होत्या. यामुळे पवना धरणाच्या पाणी पातळीत मात्र घसघशीत वाढ होताना दिसत आहे. गेल्या दोन दिवसांच्या आकडेवारीनुसार पवना धरणाच्या पाणीसाठ्यात तब्बल चार टक्क्यांनी वाढ झाली. त्यामुळे आज (गुरुवार दि. १९ जून) सायंकाळी चार वाजताच्या आकडेवारीनुसार एकूण पाणीसाठा ३७.८५ टक्क्यांवर पोहोचला आहे. 


पवना धरण हे पिंपरी चिंचवड औद्योगिक नगरी आणि बहुतांश मावळ परिसराचे पिण्याच्या पाण्याचे मुख्य स्रोत आहे. पवना धरणाची पाणी साठवण क्षमता ही १० टीएमसी एवढी असून सद्यस्थितीला धरणात एकूण ८.५१ टीएमसी पाणी साठवले जाते. मागील वर्षी जून महिन्यात कमी पाऊस पडला. मात्र गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस लवकर सुरू झाला. जून महिन्यात सुरू होणार पाऊस मी महिन्यातच सुरू झाला. आजमितीला ८८ मिमी तर १ जून २०२५ पासून तब्बल ४८८ मिमी पाऊस पडला. केवळ १९ दिवसात धरणातील पाणीसाठा ३७.८५ टक्क्यांवर पोहोचला. 


दरम्यान, हवामान विभागाच्या आजपर्यंतच्या अंदाजानुसार यावर्षी पाऊस कमी दिवसात मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पावसाळी पर्यटन सुरक्षितरित्या करावे. पाण्याच्या प्रवाहात साहसीपणा दाखवू नये, सेल्फीचा मोह आवरावा असे आवाहन करण्यात येत आहे. 

whatsapp

Malwandi Thule Dam : अलर्ट! मावळातील मळवंडी ठुले धरण १०० टक्के भरले

तारीख : 19-06-2025श्रेणी :महाराष्ट्र

feature image

पवनानगर (Pawananagar) : गेल्या काही दिवसांपासून मावळात मुसळधार पाऊस कोसळत असून सर्वच ओढे-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. या तुडुंब ओढे-नाल्यांमुळे पवन मावळ परिसरातील मळवंडी ठुले धरण १०० टक्के भरले आहे. कार्यकारी अभियंता खडकवासला पाटबंधारे विभाग, पुणे यांच्या वतीने ही माहिती देण्यात आली.


मावळात पावसाचा जोर वाढला असून परिसरातील धरणांच्या पाणीसाठ्यात घसघशीत वाढ होताना दिसत आहे. येथील मळवंडी ठुले धरण आज (गुरुवार दि. १९) सकाळी १०० टक्के भरले आहे. धरणात ३.६९ द.ल.घ.मी पाणीसाठा आहे. सदर तलाव हा "द्वारविरहित" म्हणजेच Ungated आहे. त्यामुळे धरण १०० टक्के भरून कोथुर्णे ओढ्याद्वारे पवना नदीमध्ये अनियंत्रित विसर्ग सुरु झालेला आहे.


तरी वारू, कोथुर्णे, ब्राह्मनोली, कालेपर्यंतच्या सर्व ओढ्याकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देत आहे. नागरिकांनी नदीकाठी जाणे टाळावे, आणि सतर्क राहावे असे आवाहन कार्यकारी अभियंता खडकवासला पाटबंधारे विभाग, पुणे यांच्या वतीने करण्यात येत आहे. 

whatsapp

Pune News : ब्रेकिंग! मावळातील लोणावळा, कार्ला लेणी, आणि पवना धरणासह 'या' पर्यटनस्थळांवर ३१ ऑगस्टपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

तारीख : 11-06-2025श्रेणी :महाराष्ट्र

feature image

पुणे (Pune) : जिल्ह्यातील लोणावळा परिसरातील तसेच मावळ तालुक्यातील ऐतिहासिक वास्तू, गड, किल्ले व स्मारके, पर्यटनस्थळे, धरणे आदी ठिकाणी वर्षाविहार, पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डूडी यांनी पर्यटनस्थळ परिसरात ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता-२०२३ चे कलम १६३ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.


लोणावळा परिसरातील एकविरा देवी, कार्ला लेणी, भाजे लेणी, भाजे धबधबा, लोहगड किल्ला, विसापूर किल्ला, तिकोणा किल्ला, टायगर पॉईंट, लायन्स पॉईंट, शिवलिंग पॉईंट, पवना धरण या परिसरात प्रामुख्याने पावसाळी पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होते. अशावेळी नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून सदर ठिकाणांच्या अनुषंगाने हे आदेश देण्यात आले आहेत.


या आदेशानुसार पावसामुळे वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उतरणे व पोहणे, धबधब्यावर जाणे अथवा पाण्याच्या प्रवाहाखाली बसणे, पावसामुळे धोकादायक झालेली ठिकाणे, धबधबे, दऱ्यांचे कठडे, थोकादायक वळणे आदी ठिकाणी सेल्फी काढण्यास व कोणत्याही स्वरुपाचे चित्रीकरण करण्यास प्रतिबंध राहील.


पावसामुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक धबधब्याच्या परिसरामध्ये मद्यपान करणे, मद्यधुंद अवस्थेत प्रवेश, मद्य बाळगणे, मद्य वाहतूक करणे, अनधिकृत मद्य विक्री करणे व उघड्यावर मद्य सेवन करणे, वाहतुकीचे रस्ते तसेच धोकादायक ठिकाणी वाहने थांबविणे, वाहनांची ने-आण करताना बेदरकारपणे वाहन चालवणे, धोकादायक स्थितीत वाहन ओव्हरटेक करणे, सार्वजनिक ठिकाणी खाद्यपदार्थ, कचरा, काचेच्या व प्लास्टिकच्या बाटल्या, थर्माकॉलचे व प्लास्टिकचे साहित्य उघड्यावर व इतरत्र फेकण्यासही प्रतिबंध राहील.


सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या महिलांची छेडछाड करणे, टिंगल टवाळी करणे, महिलांशी असभ्य वर्तन करणे, असभ्य अश्लिल हावभाव करणे, शेरेबाजी करणे अथवा लज्जा निर्माण होईल असे कोणतेही वर्तन करणे, सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजात संगीत यंत्रणा वाजविणे, डिजे यंत्रणा वाजविणे, गाडीतील स्पीकर, वूफर मोठ्या आवाज वाजविणे व त्यामुळे ध्वनीप्रदूषण करणे, ज्या कृतीमुळे ध्वनी, वायु व जल प्रदूषण होईल अशी कोणतीही कृती करण्यास प्रतिबंध असेल. धबधबे, धरणे व नदी आदी परिसरात सर्व दुचाकी, तीनचाकी, चारचाकी व सहा चाकी वाहनांना प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. केवळ अत्यावश्यक सेवेतील वाहनांना अनुमती असेल. 


या आदेशाचे कोणतीही व्यक्ती, संस्था, संघटना यांनी उल्लघंन केल्यास ते भारतीय न्याय संहिता, २०२३ चे कलम २२३ नुसार दंडनीय अथवा कायदेशीर कारवाईस पात्र राहतील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

whatsapp