तारीख : 23-01-2025श्रेणी :शिक्षण
तारीख : 28-05-2026श्रेणी :शिक्षण
पवनानगर (Pawananagar) : प्रतिकूल परिस्थिती, दुर्गम भागातील नोकरी, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि सामाजिक बांधिलकी या सगळ्यांचा समतोल साधत एका प्राथमिक शिक्षकाने डॉक्टरेटचे स्वप्न साकार केले आहे. पुणे जिल्हा परिषद अंतर्गत मावळ तालुक्यातील अतिदुर्गम घेरेवाडी येथे शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या बाबासाहेब लक्ष्मण काळे यांनी अथक परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर पीएच.डी. पदवी संपादन करत शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवले आहे.
आदिवासी समाजाच्या आर्थिक वास्तवावर सखोल संशोधन
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागातून त्यांनी “आदिवासी समाजातील लोकांच्या आर्थिक व सामाजिक परिस्थितीचा अभ्यास” या विषयावर संशोधन पूर्ण केले. ग्रामीण आणि आदिवासी भागातील आर्थिक विषमता, रोजगार, सामाजिक स्थिती तसेच ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम यांचा त्यांनी सखोल अभ्यास केला आहे.
ग्रामीण-शहरी दरी कमी करण्यावर भर
संशोधनादरम्यान ग्रामीण आणि शहरी भागातील आर्थिक दरी कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना, शासकीय योजनांचा प्रभाव आणि आदिवासी अर्थव्यवस्थेला स्थैर्य देण्यासाठी कोणती पावले उचलली पाहिजेत यावर त्यांनी विस्तृत विवेचन केले. त्यांच्या अभ्यासपूर्ण संशोधनाला डॉ. गव्हाळे यांचे मार्गदर्शन लाभले.
नोकरी सांभाळत पूर्ण केला संशोधनाचा प्रवास
दुर्गम भागात शिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळत संशोधन करणे हे मोठे आव्हान होते. मात्र कोणत्याही परिस्थितीत शिक्षणाची जिद्द न सोडता बाबासाहेब काळे यांनी दिवस-रात्र मेहनत घेत संशोधन पूर्ण केले. कुटुंबीयांचा पाठिंबा आणि स्वतःची चिकाटी यामुळे त्यांनी हा कठीण प्रवास यशस्वीपणे पूर्ण केला.
गरजू विद्यार्थ्यांसाठीही उचलला मदतीचा हात
शिक्षक म्हणून कार्य करत असताना त्यांनी अनेक गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणासाठी मदत केली. सामाजिक बांधिलकी जपत शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या आयुष्यात बदल घडवण्याचे काम त्यांनी सातत्याने केले आहे.
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधनपत्रांचे सादरीकरण
संशोधन क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. “Global Economic Trends” हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधन पेपर तसेच “Rural Development and Self Empowerment: Issues and Challenges” हा राष्ट्रीय स्तरावर प्रकाशित झालेला अभ्यासपूर्ण पेपर विशेष चर्चेत राहिला आहे.
विद्यापीठाकडून संशोधनाचे विशेष कौतुक
त्यांच्या संशोधन कार्याचे पुणे विद्यापीठातील विविध विभाग प्रमुखांनी कौतुक केले. अर्थशास्त्र विभाग प्रमुख सुरभी जैन, व्हाईवा चेअरमन अमिता यादवाडकर तसेच ग्रंथालय व प्रकाशन विभाग प्रमुख शुभदा नगरकर यांनी त्यांच्या संशोधनातील वास्तववादी दृष्टिकोनाचे अभिनंदन केले.
ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी प्रवास
बाबासाहेब काळे यांचा संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवास ग्रामीण भागातील विद्यार्थी, स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे युवक आणि उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आदर्श ठरत आहे. “परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द आणि शिक्षणावरील विश्वास असेल तर कोणतेही ध्येय गाठता येते,” हे त्यांनी आपल्या यशातून सिद्ध करून दाखवले आहे.
विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव
पिंपरी-चिंचवड येथे वास्तव्यास असलेल्या बाबासाहेब काळे यांच्या या यशाबद्दल शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
तारीख : 13-05-2026श्रेणी :शिक्षण
तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) : आर्थिक परिस्थितीमुळे अकरावी-बारावीचे शिक्षण अर्धवट सोडणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तळेगाव दाभाडे नगर परिषदेकडून मोठा शैक्षणिक निर्णय घेण्यात आला आहे. आगामी शैक्षणिक वर्षापासून नगर परिषद आणि शिक्षण मंडळाच्या माध्यमातून कला आणि वाणिज्य शाखांचे कनिष्ठ महाविद्यालय सुरू करण्यात येणार असून विद्यार्थ्यांना पूर्णपणे मोफत शिक्षण दिले जाणार आहे. (Free Junior College)
नगराध्यक्ष संतोष दाभाडे यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या निर्णयामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल, होतकरू आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक शिक्षणासाठी मोठा आधार मिळणार असल्याची भावना पालकांकडून व्यक्त होत आहे.
यावेळी शिक्षण समिती सभापती भारती धोत्रे, प्रभारी प्राचार्य वर्षा थोरात, नगरसेविका शोभा परदेशी, स्नेहा खांडगे, सोनाली दरेकर, ऋतुजा भगत तसेच शिक्षण समिती सदस्य उपस्थित होते.
नगर परिषदेकडून सुरू होणाऱ्या या कनिष्ठ महाविद्यालयात कला आणि वाणिज्य शाखेसाठी प्रत्येकी ८० विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता असणार आहे. विशेष म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणासोबत आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
सध्या शासनाच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेद्वारे इयत्ता अकरावीचे प्रवेश सुरू झाले असून विद्यार्थ्यांना आणि पालकांना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी नगर परिषद माध्यमिक विद्यालय क्रमांक २, मारुती मंदिर चौक येथे विशेष मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आले आहे.
महाविद्यालयासाठी सुरुवातीला शहरातील क्रीडा संकुलामध्ये तात्पुरती जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पुढील दोन वर्षांत स्वतंत्र आणि सुसज्ज इमारत उभारण्याचा नगर परिषदेचा मानस असून यासाठी चालू अर्थसंकल्पात २७ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच CSR फंडाच्या माध्यमातून विविध कंपन्या आणि स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती नगराध्यक्ष संतोष दाभाडे यांनी दिली.
तळेगाव परिसरात खासगी शिक्षणाचा वाढता खर्च आणि मर्यादित शासकीय सुविधा यामुळे अनेक पालक चिंतेत होते. अशा परिस्थितीत नगर परिषदेकडून सुरू होणाऱ्या मोफत कनिष्ठ महाविद्यालयाचे पालक आणि विद्यार्थ्यांकडून स्वागत होत आहे.
शिक्षण समिती सभापती भारती धोत्रे यांनी सांगितले की,
“नगर परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत क्रीडा, कला, स्पोकन इंग्लिश आणि विविध उपक्रमांमध्ये उल्लेखनीय यश मिळवले आहे. आता कनिष्ठ महाविद्यालयामुळे स्थानिक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी बाहेर जाण्याची गरज कमी होईल.”
प्रभारी प्राचार्य वर्षा थोरात यांनी पालकांना आवाहन करताना सांगितले की, “उच्च माध्यमिक शिक्षणापासून एकही विद्यार्थी वंचित राहू नये, हा या उपक्रमामागचा मुख्य उद्देश आहे. गुणवत्तापूर्ण आणि मोफत शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा.”
या महाविद्यालयामुळे तळेगाव आणि परिसरातील शेकडो विद्यार्थ्यांना कमी खर्चात दर्जेदार शिक्षणाची नवी दिशा मिळणार असल्याचे चित्र आहे.
तारीख : 30-03-2026श्रेणी :शिक्षण
लोणावळा (Lonavala) : शहरातील नामांकित शैक्षणिक संस्था असलेल्या लोणावळा एज्युकेशन ट्रस्टच्या कार्यकारिणीमध्ये बदल करण्यात आले असून संस्थेच्या अध्यक्षपदी दत्तात्रय पांडुरंग पाळेकर तर उपाध्यक्षपदी नंदकुमार सोनू वाळंज यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. (Lonavala Education News)
३५ वर्षांचा अनुभव; पाळेकर यांच्यावर विश्वास
दत्तात्रय पाळेकर हे गेल्या ३५ वर्षांपासून लोणावळा एज्युकेशन ट्रस्टशी जोडलेले आहेत. त्यांनी विश्वस्त, संचालक, खजिनदार, सचिव आणि उपाध्यक्ष अशा विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. त्यांच्या या प्रदीर्घ अनुभवाच्या जोरावर आणि शिक्षण क्षेत्रातील योगदानामुळे त्यांची अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे. तसेच ते पुणे जिल्हा संस्थाचालक संघटनेचे संस्थापक सदस्य म्हणूनही कार्यरत असून शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान उल्लेखनीय मानले जाते. (Education Leadership Lonavala)
वाळंज यांचा सामाजिक अनुभव; ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी नवी दिशा
उपाध्यक्षपदी निवड झालेले नंदकुमार वाळंज हे लोणावळा व परिसरातील ज्येष्ठ सामाजिक व्यक्तिमत्व आणि उद्योजक म्हणून ओळखले जातात. समाजातील विविध घटकांसाठी केलेले कार्य आणि ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी शिक्षण क्षेत्रात दिलेले योगदान लक्षात घेऊन त्यांची निवड करण्यात आली आहे. (Maval Education Development)
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध
निवडीनंतर बोलताना दत्तात्रय पाळेकर यांनी सांगितले की,
“विश्वस्त मंडळाने दिलेल्या जबाबदारीला न्याय देत लोणावळा शहर आणि परिसरातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध राहू.” तर नंदकुमार वाळंज यांनी मावळ व मुळशी तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक सुविधा, नवीन कोर्सेस आणि स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्यावर भर देणार असल्याचे स्पष्ट केले.
अभिनंदनाचा वर्षाव; शिक्षण क्षेत्रात उत्साह
या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत असून, लोणावळा एज्युकेशन ट्रस्टचे विश्वस्त, पदाधिकारी, लोणावळा महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी नव्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. (Lonavala College Update)
नव्या नेतृत्वाकडून अपेक्षा वाढल्या
लोणावळा आणि परिसरातील विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार शिक्षण, आधुनिक सुविधा आणि करिअरच्या नव्या संधी निर्माण करण्यासाठी हे नेतृत्व महत्त्वाची भूमिका बजावेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (Maval Students Future)
तारीख : 16-03-2026श्रेणी :शिक्षण
पुणे (Pune) : राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये कार्यरत शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर नियुक्ती देण्यासाठी घेण्यात आलेल्या ‘समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२५’चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. (Kendrapramukh Exam Result Maharashtra, MSCE Pune Result)
या परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांनी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET/CTET) उत्तीर्ण असल्याची माहिती २१ मार्च २०२६ पर्यंत अधिकृत संकेतस्थळावर भरावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच परीक्षेची गुणपडताळणी करण्यासाठी ३१ मार्च २०२६ पर्यंत मुदत देण्यात आली असून, उमेदवारांना त्यासाठी प्रति पेपर ५०० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. शुल्क भरल्यानंतर १५ दिवसांच्या आत उमेदवारांच्या ई-मेलवर गुणपडताळणी उपलब्ध करून देण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, परीक्षेत उत्तीर्ण झाल्याची माहिती तसेच गुणपडताळणीसाठीची नोंद केवळ दिलेल्या अधिकृत लिंकवरच करावी, ई-मेल, पत्र किंवा इतर माध्यमातून पाठवलेली माहिती ग्राह्य धरली जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. यासंदर्भात कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी दिली आहे.
तारीख : 07-03-2026श्रेणी :शिक्षण
लोणावळा (Lonavala) : Lonavala Education Trust संचलित वलवण येथील Lonavala College च्या वाणिज्य विभागामार्फत विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता, उद्योजकता आणि टीमवर्क विकसित करण्याच्या उद्देशाने ‘फन फेअर’ (Fun Fair Event Lonavala College) या आकर्षक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम मंगळवार (११ मार्च २०२६) रोजी सकाळी ९.३० ते दुपारी २.०० या वेळेत महाविद्यालयाच्या परिसरात होणार आहे.
या फन फेअरमध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या विविध चविष्ट खाद्यपदार्थांचे स्टॉल्स तसेच मनोरंजनात्मक आणि कौशल्यवर्धक खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये लोणावळा शहरातील नागरिक, आजी-माजी विद्यार्थी, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होऊ शकतात. (Lonavala College Fun Fair Event)
या उपक्रमातून विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञान, आर्थिक नियोजन, व्यवस्थापन कौशल्य आणि संघभावना यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेची भावना विकसित होऊन आत्मविश्वास वाढण्यास मदत होते, असे महाविद्यालय प्रशासनाने सांगितले. (Student Entrepreneurship Activities)
दरम्यान, लोणावळा शहरातील सर्व नागरिक, माजी विद्यार्थी, पालक, प्राध्यापक आणि कर्मचारी यांनी या फन फेअरला उपस्थित राहून विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पदार्थांचा आस्वाद घेत त्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन प्राचार्य Dr. Narendra Deshmukh आणि वाणिज्य विभाग प्रमुख Dr. Dhanashree Padhye यांनी केले आहे.