तारीख : 29-07-2025श्रेणी :खेळ
तारीख : 12-01-2025श्रेणी :खेळ
पवनानगर (Pawnanagar) : राज्यमंत्री चषकावर पवना चॅलेंजर्स क्रिकेट क्लब काले या संघाने विजेते पदावर मोहर उमटवली तर लकी ११ शेवती वसाहत हा संघ उपविजेते पदाचा मानकरी ठरला आहे. या संघांना आयोजकांकडून पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
सदर स्पर्धेमध्ये १६ संघांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी पवना चॅलेंजर्स क्रिकेट क्लब काले या संघाने प्रथम, लकी ११ शेवती वसाहत संघाने द्वितीय, तिकोना ट्रेकर्स या संघाने तृतीय तर जय हनुमान क्रिकेट क्लब लोहगड चौथ्या क्रमाकांचा मानकरी ठरला. तसेच उत्कृष्ट गोलंदाज म्हणुन रोहित उर्फ बाळा पांडे, उत्कृष्ट फलंदाज ऋषी कालेकर व मालिकाविर सोहेल शेख यांना अशी विविध पारितोषिके देण्यात आली.
ही स्पर्धा माजी राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त येळसे येथे भरत ठाकर प्रतिष्ठान, शहिद कांताबाई ठाकर प्रतिष्ठान व शंभुराजे क्रिकेट क्लब यांच्या वतीने भव्य हाफपिच क्रिकेट स्पर्धा १ जानेवारी ते ५ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली होती. तीन दिवस पवन मावळ हाफ, चौथ्या दिवशी मावळ तालुका हाफ, पाचव्या दिवशी फायनल या प्रमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेतील चषके ही स्पर्धेचे मुख्य आकर्षण ठरले असून स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल झालेल्या काले संघ व शेवती संघ या संघामध्ये शेवटच्या सामन्यामध्ये चुरस पहायला मिळाली. या अटीतटीच्या लढतीमध्ये काले संघाने विजेतेपदावर शिक्कामोर्तब केला. या स्पर्धेला माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, जिल्हा परिषद सदस्य, विविध पक्षांचे तालुकाध्यक्ष, पंचायत समिती सदस्य यांच्यासह मावळ तालुक्यातील विविध मान्यवरांनी उपस्थिती लावली.
बक्षीस वितरण मा. सभापती गुलाबराव म्हाळसकर, महाराष्ट्र राज्य भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा उपाध्यक्ष बाळासाहेब घोटकुले, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष रविंद्र मु-हे, हरिश घारे, लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रशांत आवारे, पवना फूल उत्पादक संघाचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर ठाकर, महागाव गण भाजपा अध्यक्ष नारायण बोडके, अनंता वर्वे, संदीप भुतडा, भाऊसाहेब वरघडे, शंकर मोहोळ आदींच्या हस्ते करण्यात आले.
या स्पर्धेचे मुख्य आयोजन मावळ भाजपा उपाध्यक्ष गणेश ठाकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शंभुराजे क्रिकेट कल्ब संघाच्या कार्यकर्त्यानी विषेश मेहनत घेतली.