whatsappicon
prajavarta logo
favicon

आपल्या शहरातील ताज्या बातम्या मिळवा मोफत

Install App

खुशखबर ! सर्वपक्षीय नेत्यांच्या मागणीला यश ! अखेर सोमाटणे व वरसोली टोलनाका मावळवासीयांसाठी मोफत

तारीख : 19-02-2021श्रेणी :राजकारण

feature image
whatsapp

Lonavala News : आमदार सुनील शेळकेंच्या 'या' खोडसाळपणामुळे लोणावळ्यातील सामाजिक सलोखा धोक्यात - सूर्यकांत वाघमारे

तारीख : 20-02-2024श्रेणी :राजकारण

feature image

लोणावळा (Lonavala) : मावळचे आमदार सुनील शेळके यांचा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास विरोध आहे. तसेच नगरपरिषद इमारतीच्या समूह शिल्पात नव्याने लोकशाहीर यांचा पुतळा घुसवत त्याठिकाणी विद्रुपीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांच्या या खोडसाळपणामुळे लोणावळ्यातील सामाजिक सलोखा धोक्यात आला असल्याने आंबेडकरी जनतेमध्ये यामुळे प्रचंड असंतोष पसरला असल्याचा घणाघाती आरोप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांनी केला. 


लोणावळा शहरातील बहुप्रतिक्षित छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसराच्या सुशोभीकरण कामाचा सोमवारी (दि. १९ फेब्रुवारी) मोठ्या दिमाखात भूमिपूजन सोहळा पार पडला. मात्र या कार्यक्रमाला सर्व राजकीय पक्षांना निमंत्रण देण्यात आले असताना त्यांनी आरपीआय पक्ष व दलीत समाजाला या कार्यक्रमाला जाणीवपूर्वक डावललं. त्यामुळे या कार्यक्रमाचे मुख्य आयोजन नेमकं कोणी केलं होतं? याचा उलगडा लोणावळा नगरपरिषद प्रशासनाने करावा, असे आवाहन वाघमारे यांनी केलं आहे. तसेच दलीत समाजाला डावलल्याबद्दल प्रशासकाच्या विरोधात अनुसूचित जाती जमाती आयोगाकडे तक्रार करणार असल्याचेही वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत नमूद केले.


सदर पत्रकार परिषदेला रिपाई पश्चिम महाराष्ट्र महिला सरचिटणीस यमुना साळवे, तालुकाध्यक्ष लक्ष्मण भालेराव, गणेश गायकवाड, मालनबनसोडे, सौ. देसाई, अशोक सरवदे, संजय आडसुळे आदी उपस्थित होते.


पुढे बोलताना वाघमारे म्हणाले, आमदार शेळके व आमचे कोणत्याही प्रकारचे वैयक्तिक वाद नाहीत. मात्र बाबासाहेबांच्या बाबतीत ते काही चुकीचे वागले तर आम्ही ते सहन करणार नाही. त्यांना हा प्रश्न सोडवायचा होता तर दोन वर्षापासून स्मारकाचे काम सुरू असताना चर्चा का केली नाही. सर्व परवानग्या घेऊन व नियमाप्रमाणे काम सुरू असताना तिसऱ्या टप्प्यातील तांत्रिक मंजुरी आडवण्यात आली आहे. जाहीर सभांमधून बोलत वाद निर्माण करण्याऐवजी समोरासमोर बसून बोलायचे होते. एकीकडे आरोग्याचा प्रश्न सोडवत असताना ते दुसरीकडे सामाजिक प्रश्न उभा करत आहेत. 


लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा नगरपरिषद इमारतीच्या प्रवेशद्वारा समोर उभारण्याचे ठरलेले असताना त्या जागेत बदल करत असताना आम्हाला विश्वासात का घेतलं गेलं नाही. त्याचप्रमाणे रुग्णालयव पुतळा दोन्ही पूर्वीपासून तेथेच आहे. दोन्ही कामांचे नूतनीकरण सुरू आहे. लोणावळाकरांना याबाबत कल्पना आहे. आमदारांची जागेवर जाऊन रस्त्याची पाहणी करावी, ४० फूट जागा समोर आहे. ज्या रुग्णालयाला पार्किंग नाही, रस्ता नाही त्या कामाला परवानगी मिळाली कशी, भूमिपूजन करताना हा विषय समजला नाही का? भावनिक विषय करून नागरिकांना भडकवायचे व त्यांच्या विरोधात ज्यांनी प्रचार केला त्याच्यावर कुरघोडी करायची यामुळे शहरातील वातावरण खराब होत असल्याचे वाघमारे यांनी सांगितले.

 

येत्या २२ फेब्रुवारीला सर्व मुद्द्यांसाठी व शहरातील विकास कामांच्या मागण्यांसाठी बेमुदत उपोषण करणार - वाघमारे

 

येत्या २२ फेब्रुवारी रोजी या सर्व मुद्द्यांसाठी व शहरातील विकास कामांच्या मागण्यांसाठी बेमुदत उपोषण करणार असल्याचे सूर्यकांत वाघमारे यांनी सांगितले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत आम्हाला काहींनी डावलले असेल तरी आम्ही देखील महाराजांच्या सोबत आहोत हे दाखवून देणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहे, त्यांच्या पुतळा सुशोभीकरणाचे काम अधिक दर्जेदार व्हावे याकरीता आमच्यावर येईल ती जबाबदारी आम्ही पार पडणार असल्याचे सांगितले. 


पुतळा सुशोभीकरण काम नगरपरिषद निधीतून व्हावे - सूर्यकांत वाघमारे


लोणावळा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सुशोभीकरण काम हे लोणावळा नगरपरिषदेने स्वनिधीमधून करावे. वलवण तलावाशेजारी जागा घेण्यासाठी लोणावळा नगरपरिषदेकडे १४ कोटी रुपये आहे. रस्ते व गटारे बनवण्यासाठी पैसे आहे मग शिवाजी महाराज यांचा पुतळा परिसर सुशोभीकरण कामासाठी निधी नाही का? ज्या छत्रपतींनी स्वराज्याचे सुराज्य केले त्यांच्या पुतळा परिसराचे सुशोभीकरण करण्यासाठी नगरपरिषद निधी खर्च करू शकत नसेल तर यापेक्षा दुदैवी घटना दुसरी असू शकत नाही. याकरिता आमची मागणी आहे की हे काम लोणावळा नगरपरिषदेने स्वनिधितून करावे.


कार्यक्रमाचे आयोजन मी केले नव्हते, हा विषय वैयक्तिक न घेता सामाजिक विषय म्हणून सहकार्य करा - आमदार सुनील शेळके


लोणावळ्यात काल झालेले छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन हा कार्यक्रम मी नव्हे तर लोणावळा नागरिकांनी आयोजित केला होता. त्या कार्यक्रमाला कोणाला निमंत्रण द्यायचे हे त्यांनी ठरवले असताना माझ्यावर निशाणा साधने योग्य नाही असे स्पष्टीकरण आमदार सुनील शेळके यांनी दिले आहे. लोणावळ्यात उपजिल्हा रुग्णालयाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. हे रुग्णालय सुरू झाल्यावर लोणावळा शहर व परिसरातील नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न सुटणार आहे. हे काम करताना खूप अडचणी आल्या मात्र त्यावर मात करत हे काम पूर्णत्वास येत आहे. याठिकाणी सुरू असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या कामास आमचा विरोध नाही मात्र रुग्णालयात रुग्णवाहिका येण्यास मुबलक रस्ता असावा याकरिता सहकार्य करावे ही आमची मागणी आहे. शेवटी हे रुग्णालय लोणावळा व परिसरातील नागरिकांच्या सुविधेसाठी असणार आहे. त्यांची गैरसोय होऊ नये हीच अपेक्षा असून कोणीही हा विषय वैयक्तिक न घेता सामाजिक विषय म्हणून सहकार्य करावे असे आवाहन आमदार शेळके यांनी पत्रकारांशी बोलताना केले.

whatsapp

MLA Sunil Shelke : मावळात आदिम सेवा अभियानाची प्रभावी अंमलबजावणी; कुणे ना.मा. येथील ६८ कातकरी-ठाकर बांधवांना जात प्रमाणपत्रांचे वाटप

तारीख : 18-02-2024श्रेणी :राजकारण

feature image

वडगाव मावळ (Vadgaon Maval) : मावळात आदिम सेवा अभियानाची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. त्याअंतर्गत आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून संपुर्ण मावळ तालुक्यात राबविण्यात आलेल्या या अभियानांतर्गत कुणे ना.मा. येथील ६८ कातकरी व ठाकर बांधवांना जात प्रमाणपत्रांचे शनिवारी (दि. १७) वाटप करण्यात आले.


लोणावळा शहराच्या जवळ असलेल्या कुणे गावातील ठाकर व कातकरी समाजातील अनेक नागरिकांकडे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंरही जातीचे दाखले उपलब्ध नाहीत. शैक्षणिक कामांसाठी, शासकीय योजनांचा लाभ मिळविण्यासाठी जात प्रमाणपत्र आवश्यक असते. परंतु ज्यांचे पूर्वज शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर होते. अशा कुटुंबातील नागरिकांना जात प्रमाणपत्र काढण्यासाठी खुप त्रास सहन करावा लागतो व दाखला मिळत नसल्याने विविध शासकीय योजनांपासून वंचित रहावे लागते. आजपर्यंत विविध शिबिरे, योजनांच्या नावाखाली केवळ कागदपत्रे जमा केली जातात. परंतु सर्व प्रक्रिया पूर्ण करुन दाखले कोणीही मिळवून देत नव्हते. त्यामुळे आश्वासनांशिवाय या नागरिकांच्या पदरात काहीच पडले नव्हते.


परंतु आमदार शेळके यांनी आदिम सेवा अभियान प्रभावीपणे राबवित तालुक्यातील प्रत्येक वाडी-वस्तीवर जाऊन नागरिकांच्या कागदपत्रांची पूर्तता करुन घेणे व शासन दरबारी सातत्यपूर्ण पाठपुरावा करणे यामुळे या नागरिकांना अखेर जातीचे प्रमाणपत्र उपलब्ध झाले आहेत. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जातीचे दाखले मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.


या कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य सागर उंबरे, सुरेश होले, अशोक गोजे, कमलबाई वाघमारे, अश्विनी वाघमारे, रामदास शेलार, माजी पंचायत समिती सदस्य महादू उघडे, अविनाश लोमटे, बाळू गोजे, हरीश तांडील, शंकर भस्मे, खंडू ठोंबरे, भागू होले, अनंता मेंगाळ, चंदर ठोंबरे, सागर गोणते, अमित शिवणेकर, यशवंत ठोंबरे, गणेश जाधव, बाळू होले, आमदार जनसंपर्क कार्यालयाचे सचिन वामन, नबीलाल आत्तार, रुपेश सोनुने व ग्रामस्थ उपस्थित होते.

whatsapp

Congress Bank account freezed : बिग ब्रेकिंग! आयकर विभागाने काँग्रेसची बँक खाती गोठवली

तारीख : 16-02-2024श्रेणी :राजकारण

feature image

प्रजावार्ता : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. काँग्रेस आणि युवक काँग्रेसचे बँक अकाऊंट गोठवल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला आहे. काँग्रेस नेते अजय माकन यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली. 


पत्रकार परिषदेत पक्षाचे बँक अकाऊंट फ्रीज केल्याने सर्व व्यवहार ठप्प झाले असल्याचं म्हटलं. याबाबत अधिक माहिती देताना माकन म्हणाले, देशातील प्रमुख विरोधी पक्षाची सर्व बँक खाती गोठवण्यात आली असल्याचं आम्हाला सांगितलं आहे. आम्हाला समजलं की काँग्रेस पक्ष आणि युवक काँग्रेसची बँक खाती गोठवण्यात आली आहेत. आयकराने युवक काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाकडून २१० कोटी रुपयांची वसुली मागितली आहे. आमच्या खात्यातील क्राउड फंडिंगचे पैसे गोठवण्यात आले आहेत. निवडणुकीच्या दोन आठवडे आधी जेव्हा विरोधी पक्षांची खाती गोठवली जातात तेव्हा हे लोकशाही गोठवण्यासारखेच आहे, असा दावा अजय माकन यांनी केलाय.


भाजपने जमा केलेला असंवैधानिक पैसा ते निवडणुकीसाठी वापरतील


काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी देखील आपल्या ट्वीटर अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. सत्तेची नशा केलेल्या मोदी सरकारने लोकसभेच्या निवडणुकीसाठी सर्वात जुन्या, सर्वात मोठ्या विरोधी पक्ष काँग्रेसची खाती गोठवली आहेत. हा लोकशाही मोठा आघात आहे. भाजपने जे असंवैधानिक धन जमा केलं आहे, त्याचा वापर ते निवडणुकीत करतील, असं खरगेंनी म्हटलंय.


भविष्यात कोणत्याही निवडणुका होणार नाहीत


आम्ही क्राउड फंडिंगद्वारे जो पैसा जमा केला, तो फ्रीज करण्यात आला आहे. त्यामुळे आम्ही म्हणतोय भविष्यात कोणत्याही निवडणुका होणार नाहीत. आमचं न्यायव्यवस्थेला आवाहन आहे की, देशातील बहुपक्षीय प्रणाली सुरक्षित ठेवा आणि लोकशाही सुरक्षित ठेवा. आम्ही या हुकूमशाहीविरोधात लढा देऊ, असे मल्लिकार्जुन खरगे यांनी ट्वीट करत म्हटलं आहे.


काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील ट्वीट करत भाजपवर हल्लाबोल केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पूर्वसंध्येला इनकम टॅक्स विभागाने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची सर्व बँक खाती गोठवली आहेत. एक भ्याड आणि चिंताग्रस्त हुकूमशहा सत्तेसाठी काहीही करण्यास तयार आहे, असं नाना पटोलेंनी ट्वीटमध्ये म्हटलंय.

whatsapp

Maval News : कोथूर्णे सोसायटीच्या चेअरमनपदी गणपत काळे यांची बिनविरोध निवड

तारीख : 12-02-2024श्रेणी :राजकारण

feature image

तिकोणा (Tikona) : कोथूर्णे विविध विकास कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी गणपत गोपाळ काळे यांची तर व्हॉईस चेअरमनपदी नामदेव दळवी यांची बिनविरोध निवड झाली.


मावळते चेअरमन लक्ष्मण काळे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी नुकतीच निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत काळे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची सोसायटीच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली. 


सदर निवडणुक प्रक्रिया ही निवडणूक अधिकारी मंगेश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. दरम्यान, निवडीनंतर ग्रामस्थ, सभासद यांनी गुलाल-भंडाऱ्याची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला.


यावेळी ज्ञानेश्वर निंबळे, रामदास पाठारे, संदिप साबळे, लक्ष्मण काळे, बाळासाहेब दळवी, वाघु दळवी, बाळासाहेब मसुरकर, युवा उद्योजक मुकुंद ठाकर, नवनाथ ठाकर, शोभाताई वहिले, संभाजी काळे, यशवंत बोडके, सीताबाई मोहोळ, एकनाथ काळे, शहाजी काळे, रामजी काळे, संदिप दळवी, शेखर दळवी, सुनिल निंबळे, अनंता निंबळे, एकनाथ निंबळे, मारुती काळे, अंकुश जांभूळकर आदी उपस्थित होते. 
 

प्रजावार्ता न्यूज नेटवर्क : बाबुराव काळे (9923366051)

whatsapp

Ashok Chavan : ब्रेकिंग! शिवसेना, राष्ट्रवादी पाठोपाठ काँग्रेसवर राजकीय संकट; मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकी आणि अशोक चव्हाण पाठोपाठ अमर राजूरकर यांचा काँग्रेसला रामराम

तारीख : 12-02-2024श्रेणी :राजकारण

feature image

प्रजावार्ता : गेल्या काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे बडे नेते मिलिंद देवरा, ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसला रामराम केला असताना आता राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र काँग्रेसमधील मातब्बर नेत्यांपैकी एक म्हणून लौकिक असलेले ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी यांनी काँग्रेस पक्ष आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला. ते लवकरच भाजपच्या वाटेवर जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत असतानाच काँग्रेस नेते व माजी आमदार अमर राजूरकर यांनी देखील पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय.

चव्हाण यांनी देखील आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपविला आहे. तसेच त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन चर्चाही केली. या दोघांमध्ये झालेल्या चर्चेचा तपशील अद्याप उघड झालेला नाही. परंतु, या सगळ्या घडामोडी पाहता अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे.

दरम्यान, अशोक चव्‍हाण हे भाजपमध्‍ये प्रवेश करणार असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्‍या उपस्‍थितीत ते गुरुवार, १५ फेब्रुवारी रोजी भाजपमध्‍ये प्रवेश करणार असल्‍याचे वृत्त ‘इलेक्ट्रॉनिक मीडिया’ने दिले आहे. त्यामुळे अखेर आता ते १५ फेब्रुवारी रोजी भाजपमध्‍ये प्रवेश करतील, असे मानले जात आहे. (Ashok Chavan and Amar Rajurkar Resigned Congress)

‘आगे आगे देखिए होता है क्या’, - देवेंद्र फडणवीस

चव्हाणांच्या राजीनाम्याबद्दल पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर फडणवीस म्हणाले की, इतर पक्षातील अनेक दिग्गज नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश घ्यायचा आहे. विशेषत: काँग्रेसचे अनेक नेते वरिष्ठ नेत्यांच्या वागणुकीमुळे आमच्या संपर्कात आहेत. त्यांना त्यांच्या पक्षात गुदमरल्यासारखे वाटत आहे. कोण आमच्या संपर्कात आहोत ते लवकरच उघड होईल. ‘आगे आगे देखिए होता है क्या’, असे सुचक संकेत फडणवीस यांनी दिले.

whatsapp