तारीख : 29-05-2025श्रेणी :राजकारण
तारीख : 30-05-2025श्रेणी :राजकारण
पवनानगर (Pawnanagar) : कोथुर्णे विविध विकास कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी बाळासाहेब मसुरकर तर उपाध्यक्षपदी दादु कदम यांची बिनविरोध निवड झाली.
मावळते अध्यक्ष यशवंत बोडके व उपाध्यक्ष गबळू काळे यांनी ठरलेल्या कालखंडात राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी नुकतीच निवडणूक घेण्यात आली. यामध्ये सोसायटीच्या अध्यक्षपदी मसुरकर यांची बिनविरोध तर उपाध्यक्षपदी कदम यांची निवड करण्यात आली. ही निवडणूक प्रक्रिया निवडणूक अधिकारी राकेश निखारे व सचिव रामदास पाठारे, संदिप साबळे यांच्या यांनी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली आहे.
यावेळी संचालक ज्ञानेश्वर निंबळे, लक्ष्मण काळे, वाघू दळवी, यशवंत बोडके, संभाजी काळे, मथाबाई काळे, बाळु दळवी, गबळु काळे, सरपंच सुरेश दळवी, ज्ञानदेव सोनवणे, राम नढे, विठ्ठल दळवी, भरत दळवी, संजय मोहोळ, रमेश कालेकर, बाळासाहेब मोहोळ, भिमराव दळवी, सुर्यकांत दळवी, संजय दळवी, शिवाजी निंबळे, नामदेव दळवी, मारुती दळवी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवडीनंतर बोलताना बाळासाहेब मसुरकर म्हणाले की, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या माध्यमातून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्यासाठी प्रयत्नशील राहील.
तारीख : 27-05-2025श्रेणी :राजकारण
प्रजावार्ता : बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाच्या आढावा बैठकीत मावळ तालुक्याच्या कृषी विकासावर लक्ष केंद्रित करत आमदार सुनील शेळके यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी महत्त्वपूर्ण मागण्या मांडल्या. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या या बैठकीत मावळ तालुक्यात शीतगृह, सेंद्रिय शेती, इंद्रायणी तांदूळ व गुलाब फुलांवर प्रक्रिया करणारी केंद्रे उभारण्यासाठी आवश्यक जागा स्थानिक शेतकऱ्यांना भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.
या प्रकल्पांतर्गत राज्यात १२५० कृषी प्रकल्प मंजूर असून त्यापैकी ५५० प्रकल्प यशस्वीरित्या सुरू आहेत. यामध्ये धान्य गोदाम, कांदा चाळ, शीतगृह, राईस मिल, ऑईल मिल, पशुखाद्य युनिट यांसारख्या उपक्रमांचा समावेश आहे. विशेष म्हणजे ३० टक्के प्रकल्प महिला शेतकरी भगिनींसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणासाठी हे मोठे पाऊल ठरत आहे.
आमदार सुनील शेळके यांनी आपल्या मावळ तालुक्याला या योजनांचा अधिकाधिक लाभ मिळावा यासाठी बैठकित ठोस मागण्या मांडल्या. जिल्हास्तरीय स्वतंत्र आढावा बैठक घेऊन मावळ तालुक्याचे प्रश्न मार्गी लावावेत, अशी विनंती त्यांनी कृषिमंत्र्यांकडे केली. तसेच स्मार्ट प्रोजेक्टमध्ये जे प्रस्ताव मंजूर झाले आहेत त्यांना वेळेत निधी वितरित व्हावा यासाठी टाईम आऊट मिळावा, अशीही सूचना त्यांनी केली.
या प्रकल्पांमुळे मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उत्पादनाला बाजारपेठ मिळण्यास मदत होणार असून स्थानिक आर्थिक व्यवहारांनाही चालना मिळणार आहे. शेतकऱ्यांना साठवणूक, प्रक्रिया आणि विक्री यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्यास त्यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होईल, असा विश्वास आमदार शेळके यांनी व्यक्त केला.
या बैठकीस आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, प्रकल्प संचालक हेमंत वसेकर, राज्य वखार महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, कृषी व पणन विभागाचे प्रधान सचिव, कृषी विभागाचे संचालक, तसेच ज्येष्ठ नेते माऊली दाभाडे, दीपक हुलावळे, बाळासाहेब भानुसघरे, बबनराव भोंगाडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आधुनिक आणि उपयुक्त कृषी प्रकल्प राबवण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असा ठाम शब्द आमदार शेळके यांनी या वेळी दिला.
तारीख : 23-05-2025श्रेणी :राजकारण
तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) : तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या हद्दीतील मारुती मंदिर चौक ते गणपती मंदिर चौक हा डीपी रस्ता १८ मीटर ऐवजी १२ मीटर करावा. तसेच या रस्त्याचे काम पावसाळ्यानंतर करावे अशी आग्रही मागणी माजी उपनगराध्यक्ष किशोर छबुराव भेगडे व माजी नगरसेवक, माहिती अधिकार कार्यकर्ते अरुण बबनराव माने यांनी निवेदनाद्वारे केली. तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांना दिलेल्या निवेदनात ही मागणी करण्यात आली आहे.
नगरपरिषदेने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर डीपी रस्त्याच्या रुंदीकरणाचा घाट घातला आहे. नगरपरिषदेने हा रस्ता १८ मीटर रुंदी करण्यासाठी या रस्त्यालगत असलेल्या ६९ कुटुंबियांची घरे पाडावी लागतील. अशी कुटुंबे बाधित होऊ नये म्हणून सध्याच्या रस्त्याची रुंदी वाढविण्याऐवजी १२ मीटर रुंदी करून रस्ता करावा. तसेच हे रुंदीकरण पावसाळा संपल्यानंतर करावे अशी मागणी करण्यात आली आहे.
तत्पूर्वी मारुती मंदिर चौकातील तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या मुख्य इमारतीपासून छत्रपती संभाजीनगर मार्गे साईनाथ कॉलनी ते डाळ आळी गणपती मंदिर पर्यंत १८ मीटर रस्ता रुंदीकरणाचे नियोजन करून नगरपरिषदेने या रस्त्यालगत असलेल्या ६९ कुटुंबीयांना नोटिसा दिल्या होत्या. या नोटीसा ६९ कुटुंबियांना मिळाल्यानंतर या रस्त्यावरील कुटुंबीयांची घबराट झाली.
ऐन पावसाळ्याच्या तोंडावर या रस्त्याचे काम सुरू होणार असल्याने येथील सर्व नागरिक हवालदिल झाले होते. त्या सर्व ६९ कुटुंबीयांनी मोठ्या संख्येने माजी उपनगराध्यक्ष किशोर भेगडे व माजी नगरसेवक अरुण माने यांची भेट घेऊन सदरील कारवाई थांबवावी अशी मागणी केली. त्यानुसार किशोर भेगडे व अरुण माने मैदानात उतरले आहेत.
तारीख : 22-05-2025श्रेणी :राजकारण
प्रजावार्ता : मावळ तालुक्यातील वडीवळे धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यांचे बंदिस्तीकरण तसेच आढले-डोणे उपसा जलसिंचन योजनेला गती देण्यासाठी बुधवारी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. ही बैठक मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आली होती.
वडीवळे धरणाच्या कालव्यांद्वारे सुमारे ४४०६ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येते. मात्र या उघड्या कालव्यांतून होणाऱ्या पाणी गळतीमुळे परिसरातील अनेक शेतजमिनी पाणथळ होऊन नापिकीस सामोऱ्या जात आहेत. त्यामुळे कालव्यांचे बंदिस्तीकरण करण्याची शेतकऱ्यांची दीर्घकालीन मागणी होती. यामुळे पाणीटंचाईवर मात करत सिंचनक्षेत्रात वाढ होणार आहे.
त्याचप्रमाणे आढले-डोणे परिसरातील कायमस्वरूपी पाणी समस्येच्या पार्श्वभूमीवर, पवना नदीवरून उपसा जलसिंचन योजना राबवण्याचीही शिफारस करण्यात आली. या योजनांसाठी आवश्यक विकास आराखडा (DPR) तात्काळ शासनाकडे सादर करण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
या बैठकीस पुनर्वसन मंत्री मकरंद (आबा) जाधव, आमदार सुनील शेळके, जलसंपदा विभागाचे सचिव, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक, मुख्य अभियंता तसेच इतर संबंधित अधिकारीही उपस्थित होते.
या निर्णयांमुळे मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून, दीर्घकालीन जलसिंचनाच्या दृष्टीने ही बैठक मैलाचा दगड ठरणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
तारीख : 12-05-2025श्रेणी :राजकारण
तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) : इंदोरी ते सांगुर्डी या मुख्य रस्त्याच्या सुधारणा कामाचे भूमिपूजन आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते रविवारी उत्साहात पार पडले. मावळ व खेड या दोन तालुक्यांना जोडणारा हा महत्त्वाचा रस्ता अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. यासाठी आमदार शेळके यांनी केलेल्या विशेष प्रयत्नांमुळे PMRDAच्या माध्यमातून ७.६४ कोटींचा निधी मंजूर होऊन कामाला गती मिळाली आहे.
हा रस्ता तयार झाल्याने नोकरी, व्यवसाय, शिक्षणासाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून सांगुर्डी व इंदोरी गावांमध्ये सुरक्षित, सुगम आणि सक्षम दळणवळणाची सुविधा निर्माण होणार आहे.
कार्यक्रमात मावळ पंचायत समितीचे माजी सभापती विठ्ठल शिंदे, PMRDA सदस्य वसंत भसे, उमेश बोडके, प्रकाश हगवणे, सरपंच संगीताताई भसे, सरपंच शशिकांत शिंदे, यांच्यासह ग्रामस्थ आणि विविध मान्यवर उपस्थित होते. आमदार शेळके यांनी या कामासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.
शांताई रेसिडेन्सीमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
शांताई रेसिडेन्सी को-ऑपरेटिव हौसिंग सोसायटीमध्ये अंतर्गत रस्ता डांबरीकरण व सीमाभिंतीच्या बांधकामाचे भूमिपूजन आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते पार पडले. सोसायटीतील पायाभूत सुविधा अधिक मजबूत आणि सुरक्षित करण्याच्या उद्देशाने हे काम हाती घेण्यात आले आहे.
या कार्यक्रमास माजी नगरसेवक संतोष दाभाडे, सुरेश दाभाडे तसेच संजय बाविस्कर, राजश्री कुलकर्णी, सुधीर सपाटे यांच्यासह सोसायटीचे सर्व सभासद आणि रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार शेळके यांनी आपल्या भाषणात, “मावळ परिसरात नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे प्राधान्याने लक्ष देत असून, सर्वांगीण विकासाचा ध्यास घेऊनच काम सुरू आहे,” असे सांगितले.
मावळच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने झटत असलेल्या आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकारामुळे दोन्ही कामांना गती मिळाल्याने ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.