whatsappicon
prajavarta logo
favicon

आपल्या शहरातील ताज्या बातम्या मिळवा मोफत

Install App

कुणे ना. मा येथील जिल्हा परिषद शाळेत मा. उपायुक्त जगन्नाथ सिन्नरकर यांच्याकडून वह्या वाटप

तारीख : 22-01-2022श्रेणी :शिक्षण

feature image
whatsapp

Maval News : ग्रामीण भागातील शैक्षणिक संस्थाचा विकास देशाच्या शैक्षणिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा - धनराज विसपुते

तारीख : 16-02-2024श्रेणी :शिक्षण

feature image

पवनानगर (Pawnanagar) : देशाचा शैक्षणिक विकास होण्याच्या दृष्टीने ग्रामीण भागातील शैक्षणिक संस्थाचा विकास होणे गरजेचे आहे, असे मत आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन धनराज विसपुते यांनी व्यक्त केले. 


संकल्प शिक्षण प्रसारक मंडळाच्या संकल्प इंग्लिश स्कूल पवनानगर या शाळेच्या  वार्षिक स्नेहसंमेलनात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. ग्रामीण भागात क्रमिक अभ्यासाबरोबरच कौशल्यावर आधारित  शिक्षणावर भर देऊन विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती होणे गरजेचे आहे त्या दृष्टीने ग्रामीण भागातील शैक्षणिक संस्थांनी प्रयत्न करायला हवे असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.


यावेळी ढोल ताशांच्या आणि लेझीमच्या गजरात विद्यार्थ्यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. सरस्वती पूजन आणि महापुरुषांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविक संस्थापक सचिव लक्ष्मण भालेराव यांनी केले.


कार्यक्रमासाठी पश्चिम महाराष्ट्र आर.पी.आय चे अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, लायन्स क्लबचे झोन चेअरमन विक्रम माने, लायन्स क्लब आकुर्डी अध्यक्षा मेघना महाजन, उद्योजक असिफ शेख, लायन्स वसंतकुमार गुजर, संकल्प शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय कालेकर, संस्थापक सचिव लक्ष्मण भालेराव, संचालक डॉ. संजय चौधरी, संचालिका विद्या गांधी, संजय गांधी निराधार योजनेचे माजी अध्यक्ष महादू कालेकर, आर.पी.आय पुणे जिल्हा सचिव गणेश गायकवाड, अनिता वाघमारे, युवक आघाडी पुणे जिल्हा अध्यक्ष समीर जाधव, काले पवनानगरचे उपसरपंच रमेश कालेकर, युवक अध्यक्ष अंकुश सोनवणे, सतीश साठे, लायन्स हिरामण गवई, संगीता विसपुते, परिमला कारंजकर, लायन्स राजेश शर्मा, लायन्स व्ही. के. शर्मा, लायन्स मंगला गवई, वसुधा गुजर, लायन्स प्रविण महाजन, लायन्स अर्चना कोळी, ग्रामपंचायत सदस्य छाया कालेकर, सोनाली संजय चौधरी, ग्रामपंचायत सदस्य उत्तम चव्हाण, शक्ति जव्हेरी, प्रफुल्ल ओव्हाळ आदी मान्यवर मंडळी व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.


विद्यार्थ्यांनी विविध कलागुण यावेळी सादर केले. यावर्षी महाराष्ट्राची    लोकधारा ही थीम निवडण्यात आली होती. यात विद्यार्थ्यांनी गणेश वंदना, भूपाळी, शेतकरी नृत्य, धनगर नृत्य, आदिवासी नृत्य, मंगळागौर, कोळीगीत, गोंधळ, लावणी असे विविध नृत्य प्रकार सादर केले. लहान गटामध्ये न्यू ट्रेंड ची विविध गीते सादर करण्यात आली. यात वका वका, बार्बी डॉल, गुलाबी शरारा, बम बम बोले, फ्रेंडशीप साँग, बादल बरसा अश्या अनेक गीतांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या गड आला पण सिंह गेला या नाटकाने सर्व उपस्थितांची मने जिंकून घेतली.


दरवर्षी शाळेतून गुणवंत विद्यार्थी निवडून त्यास स्टुडंट ऑफ द इयर हा पुरस्कार देण्यात येतो. संस्थेचे संचालक डॉ. संजय चौधरी यांच्या मातोश्री गोकर्णाबाई श्रीपतराव चौधरी यांच्या स्मरणार्थ या विद्यार्थ्यांस रुपये २५ हजार रुपये बक्षीस देण्यात येतात. शैक्षणिक वर्ष २०२३/२४ चा हा पुरस्कार अनुजा यादव व तनुष्का सोनवणे यांना विभागून देण्यात आला. तर टीचर ऑफ द इयर या पुरस्काराने प्रियांका येवले यांना देऊन सन्मानित करण्यात आले. सर्व शिक्षकांचा यावेळी संस्थापक सचिव लक्ष्मण भालेराव यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.


कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक राहुल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली नीता कालेकर, सोनल गांधी, बाळू कदम, कैलास येवले, मीनाक्षी शिवणेकर, प्रियांका येवले, सुजाता वाघेरे, आशा बोरकर, मोना गांधी यांनी विशेष मेहनत घेतली. सूत्रसंचालन बाळू कदम व मीनाक्षी शिवणेकर यांनी तर आभार मुख्याध्यापक राहुल सोनवणे यांनी मानले.

whatsapp

Kamshet News : कामशेतमध्ये तालुकास्तरीय नृत्य स्पर्धा संपन्न

तारीख : 03-02-2024श्रेणी :शिक्षण

feature image

कामशेत (Kamshet) : कामशेतमध्ये शहर पत्रकार मित्र व सह्याद्री विद्यार्थी अकादमी मावळ यांच्या संयुक्त विद्यमाने लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय नायगाव येथे आंतर शालेय समूह नृत्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत मावळ तालुक्यातील एकूण ३४ शाळांनी सहभाग नोंदवून आपल्या कलागुनांचे प्रदर्शन केले. 


सदर स्पर्धा प्रत्येकी चार गटात ही स्पर्धा संपन्न झाली. यामध्ये ८ ते १० वी गटात महर्षी कर्वे आश्रम शाळेने प्रथम व पंडित नेहरू विद्यालयाने द्वितीय क्रमांक पटकावला. ५ ते ७ वी गटात जिल्हा परिषद शाळा ब्राह्मणवाडी यांनी प्रथम, जिल्हा परिषद शाळा बऊर यांनी द्वितीय तर  जि. प. शाळा कामशेत आणि जि. प. शाळा गोवित्री यांना विभागून तृतीय क्रमांक देण्यात आला. १ ते ४ थी गटात जिल्हा प्राथमिक शाळा बऊरला प्रथम, राऊंड प्राथमिक स्कूल म्हाळुंगेला द्वितीय तर तृतीय क्रमांक पवना प्राथमिक विद्या मंदिर आणि जिल्हा प्राथमिक शाळा मुंडावरे यांना विभागून देण्यात आला. तसेच बालवाडी गटाचा प्रथम क्रमांक पवना विद्या मंदिर आणि द्वितीय क्रमांक स्मार्ट बिगिनिंग स्कूल कामशेत यांना मिळाला.


याप्रसंगी डॉ. विकेश मुथा, सागर यादव, मोहन वाघमारे, संतोष कुंभार आदी मान्यवर उपस्थित होते. बक्षीस वितरण पत्रकार सुभाष भोते, निखिलेश दौंडे, चेतन वाघमारे, प्रफुल्ल ओव्हाळ, उत्तम ठाकर, निलेश ठाकर, तेजस वाघवले, सचिन मोरे, सत्यम तिकोने, किरण ढोरे, केदार डाखवे, सहदेव केदारी, सोमनाथ चोपडे, रुपाली कटके, राहूल राजीवडे, किशोर वाघमारे, सचिन शेडगे यांच्या हस्ते करण्यात आले. 


या कार्यक्रम दरम्यान परिक्षक म्हणून अमोल साळवे, प्रसाद मंचरे, शिवानंद कांबळे यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक लक्ष्मण शेलार व प्रसाद कुटे यांनी केले. दीप प्रज्वलन सरपंच रुपेश गायकवाड, निलेश दाभाडे, अमर चौरे, दत्तात्रय रावते यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रफुल्ल ओव्हाळ यांनी मानले.

whatsapp

Maval News : मावळातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरीय साहित्य साधने मोजमाप शिबिर संपन्न

तारीख : 28-12-2023श्रेणी :शिक्षण

feature image

वडगाव मावळ (Vadgaon Maval) : पुणे जिल्हा परिषद, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पुणे आयोजित पंचायत समिती मावळ शिक्षण विभाग समावेशित शिक्षण मावळचे गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज व पुणे जिल्हा परिषदेचे जिल्हा समन्वयक ज्ञानदेव देवकाते यांच्या मार्गदर्शनाखाली फियाट इंडिया ऑटोमोबाईल्स कंपनी शिरूर व CSR अंतर्गत मावळ तालुकास्तरीय दिव्यांग विद्यार्थ्यांना साहित्य देण्यासाठी मोजमाप शिबिर बुधवारी (दि. २७) रोजी जिल्हा परिषद शाळा वडगाव (ता. मावळ) येथे घेण्यात आले.


सदर शिबिरात कर्णदोष, अस्थिव्यंग, बहुविकलांग, सेरेब्रल पाल्सी, अंध प्रवर्गातील ५१ दिव्यांग विद्यार्थ्यांची त्यांच्या गरजेनुसार तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून श्रवण यंत्र, व्हीलचेअर, कॅलिपर, मॉडीफाय चेअर, स्मार्टफोन, व्हाईट केन इत्यादी साहित्य साधनांसाठी संदर्भित करण्यात आले. यावेळी गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज व जिल्हा समन्वयक ज्ञानेश्वर देवकाते यांनी शिबिरास उपस्थित राहून दिव्यांग विद्यार्थी व पालक यांच्याशी संवांद साधला. (Taluka level material equipment measurement camp for disabled students in Maval completed)


याप्रसंगी फियाट इंडिया ऑटोमोबाईल प्रायव्हेट लिमिटेड रांजणगाव कंपनीचे सीएसआर व्यवस्थापक अमोल फटाले व त्यांची अलिम्को टीम, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्रीमती साबळे मॅडम, राजश्री घोरपडे व शिक्षक वृंद, समावेशित शिक्षण विशेष साधन व्यक्ती शितल शिशुपाल, विशेष शिक्षक स्मिता जगताप, साधना काळे, शकीला शेख, सुमित्रा कचरे, लता वनवे इत्यादी उपस्थित होते. 

whatsapp

Maval News : पवना शिक्षण संकुलात युपीएल कंपनीच्या ५० लाखांच्या देणगीतून उभारलेल्या स्वच्छतागृहाचे लोकार्पण

तारीख : 22-12-2023श्रेणी :शिक्षण

feature image

पवनानगर (Pawnanagar) : यु.पी.एल लिमीटेड कंपनी व पवना प्रॉपर्टी असोसिएशनच्या माध्यमातून पवना विद्या मंदिर शाळेसाठी सुमारे ५० लाख रुपये खर्च करून अद्ययावत स्वच्छतागृह बांधून दिले. या स्वच्छतागृहाचा लोकार्पण सोहळा नुकताच संपन्न झाला.  


पवना शिक्षण संकुल हे पवन मावळातील अंगणवाडी ते ज्युनिअर कॉलेजपर्यंतचे शिक्षण देणारी अग्रगण्य शाळा असून संकुलात सद्यस्थितीला १२०० विद्यार्थी ज्ञानाचे धडे गिरवत आहेत. येथील विद्यार्थ्यांच्या शौचालयाची गरज ओळखून परिसरातील नामांकित पवना प्रॉपर्टी असोसिएशन व युपीएल कंपनीनच्या सामाजिक उत्तरदायित्वातून अद्ययावत स्वच्छतागृह बांधून देण्यात आले आहे.
या स्वच्छतागृहाचे लोकार्पण आज उद्योजक पद्मभूषण रज्जू श्रॉफ व सॅन्ड्रा श्रॉफ यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे हे होते. (Inauguration of the toilet built with the donation of 50 lakhs by UPL Company in Pavana Education Complex)


यावेळी बोलताना संतोष खांडगे म्हणाले, सध्या समाजामध्ये स्वच्छतेबाबत जागृती होत असते. त्याचाच आधार घेऊन ग्रामीण भागातील शाळांसाठी पवना प्रॉपर्टी असोसिएशन व युपीएल कंपनीनच्या सामाजिक उत्तरदायित्वातून सुसज्ज असे स्वच्छतागृह उपलब्ध झाले आहे. या दोन्ही सामजिक संस्थेचे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील योगदान हे वाखाणण्याजोगे आहे. 


यावेळी कार्यक्रमासाठी लायन्स क्लब ऑफ राहटणीचे संस्थापक वसंत कोकणे, अध्यक्ष अमोल दापूरकर, संस्थेचे जेष्ठ संचालक दामोदर शिंदे, सोनबा गोपाळे, महेशभाई शहा, शंकरराव नारखेडे, पवना शिक्षण संकुलाचे पालक सदस्य सुनिल भोंगाडे, पवना प्रॉपर्टी असोसिएशन मॅनेजर रोहितलाल श्रीवास्तव, मावळ तालुका कॉग्रेसचे अध्यक्ष यशवंत मोहोळ, पंचायत समितीच्या शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती शोभाताई वहिले, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका अंजली जांभूळकर, काले गावच्या उपसरपंच छाया कालेकर, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष काशिनाथ निंबळे, मुख्याध्यापक पांडूरंग ठाकर, शालेय समितीचे सदस्य प्रल्हाद कालेकर, नारायण कालेकर, विश्वनाथ जाधव, करूंजचे सरपंच सदाशिव शेंडगे, माजी सरपंच शंकर लोखंडे, अभय गांधी, कालेचे केंद्र प्रमुख पांडुरंग डेंगळे, वारुचे केंद्र प्रमुख राजेश राऊत, मावळ तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे संचालक नितीन वाघमारे, संजय ठुले, गोरख जांभूळकर, धोंडीबा घारे यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


यावेळी बोलताना श्रॉफ म्हणाले, पुढील काळात पवना प्रॉपर्टी असोसिएशन व युपीएल कंपनीनच्या माध्यमातून पवना परिसरातील डिजीटल शाळा तसेच पर्यावरणपूरक शाळा करण्यासाठी लागणारी सर्व प्रकारची मदत केली जाईल. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संकुलाचे प्राचार्य भाऊसाहेब आगळमे यांनी केले. सुत्रसंचालन रोशनी मराडे, वैशाली वराडे व भारत काळे यांनी केले. तर आभार पर्यवेक्षिका अर्चना शेडगे यांनी मानले.

whatsapp

Lonavala News : विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना रुजवण्यासाठी लोणावळ्यात नेव्ही बँड कॉन्सर्टचे आयोजन

तारीख : 07-12-2023श्रेणी :शिक्षण

feature image

लोणावळा (Lonavala) : विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना रुजवण्यासाठी लोणावळ्यात नेव्ही बँड कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय नौदलाचे आय.एन.एस. शिवाजी व लोणावळा नगरपरिषद यांच्या संयुक्‍त विद्यमाने रविवारी (दि. १० डिसेंबर) सायंकाळी पाच वाजता डॉ. बी.एन. पुरंदरे बहुविध विद्यालयाच्या प्रांगणात ‘नेव्‍ही डे‘ अंतर्गत या नेव्ही बँड कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती लोणावळा नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्‍याधिकारी अशोक साबळे यांनी दिली.

 

शूरविरांच्या स्‍मरणार्थ व सांस्कृतिक वारसा जपण्‍यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना रुजावी या हेतूने हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच या कार्यक्रमास नगरपरिषद परिक्षेत्रातील सर्व सन्‍माननीय मान्‍यवर, माजी पदाधिकारी, पत्रकार, माजी सैनिक, सर्व नागरिक, विद्यार्थी, पालक, शिक्षक, सामाजिक संस्‍था व इतर सर्व मान्‍यवरांनी मोठया संख्‍येने उपस्थित रहावे असे आवाहन देखील केले आहे.

whatsapp