तारीख : 20-07-2025श्रेणी :लाईफस्टाइल
विषय :
तारीख : 24-04-2024श्रेणी :लाईफस्टाइल
पुणे (Pune) : बारामती, शिरूर, मावळ आणि पुणे लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्यात येत्या २९ एप्रिल रोजी जाहीर सभा घेणार आहे. याशिवाय, पंतप्रधान मोदी यांचा पुण्यात एक रोड शो आयोजित करण्यात आला आहे.
मोदी यांच्या 'रोड शो'साठी महायुतीकडून संयुक्त तयारी करण्यात येत असून महायुतीच्या सर्व घटक पक्षांचे नेते या सभेला उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, राज ठाकरे यांच्या उपस्थितीबाबत तूर्त निश्चित नसल्याचे मनसेकडून सांगण्यात येत आहे.
महायुतीचे मोहोळ आणि आढळराव पाटील उद्या उमेदवारी अर्ज भरणार
महायुतीचे पुणे लोकसभा मतदारसंघ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार गुरुवारी (दि. २५) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यात सकाळी ९ वाजता कोथरूड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यापर्यंत पदयात्रा काढली जाणार आहे.
मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस-पवारांच्या उपस्थिती पुण्यात जाहीर सभा
त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नदीपात्रालगतच्या मैदानात जाहीर सभा होणार आहे. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांसह भाजपचे राज्य पातळीवरील अनेक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.