whatsappicon
prajavarta logo
favicon

आपल्या शहरातील ताज्या बातम्या मिळवा मोफत

Install App

Pune Collector Jitendra Doody : ब्रेकिंग! पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची बदली; जितेंद्र डूडी नवे जिल्हाधिकारी

तारीख : 03-01-2025श्रेणी :महाराष्ट्र

feature image
whatsapp

Vadgaon News : श्री पोटोबा महाराज प्रासादिक पायी दिंडीचे ग्रामस्थांच्या उपस्थितीत पंढरपूरच्या दिशेने उत्साहात प्रस्थान

तारीख : 19-06-2025श्रेणी :महाराष्ट्र

feature image

वडगाव मावळ (Vadgaon Maval) : जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त दरवर्षी प्रमाणे आपल्या वडगाव शहरातील श्री पोटोबा महाराज प्रासादिक पायी दिंडींचे श्री क्षेत्र पंढरपूरकडे आनंदी वातावरणात प्रस्थान झाले.


प्रथमता वारकरी संप्रदायातील भाविक आणि शहरातील सर्वच मान्यवरांनी तसेच नागरिक व महिला भगिनींनी विणापूजन करत सर्वांच्या उपस्थितीत आरती करून ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिरास प्रदक्षिणा घालून टाळ-मृदंगाच्या गजरात, विठूनामाच्या जयघोषात, भगव्या पताका खांद्यावर घेतलेले वारकरी, मृदुंगमणी, टाळकरी, डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन सहभागी झालेल्या महिलांनी भक्तिमय वातावरणात फुगडीचा फेर धरत दिंडीचे बाजारपेठेतून प्रस्थान झाले. यावेळी शहरातील जैन समाजाच्या वतीने पायी दिंडीवर फुलांची उधळण करत एकात्मतेचे दर्शन घडवले.


मा. नगराध्यक्ष मयूर ढोरे, अबोली ढोरे यांच्या पुढाकाराने हभप श्री. महेंद्र दत्तात्रय ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली आठ वर्षांपूर्वी वडगाव शहर आणि कातवी, सांगवी, साते, मोहितेवाडी, जांभूळ, ब्राह्मणवाडी, विनोदेवाडी, वारंगवाडी या परिसरातील वारकऱ्यांच्या सोयीसाठी श्री पोटोबा महाराज प्रासादिक पायी दिंडी सुरू केली.


यावेळी मा. सरपंच बाळासाहेब ढोरे, मंगेश काका ढोरे, देवस्थानचे विश्वस्त किरण भिलारे, पंढरीनाथ ढोरे, विश्वस्त अरुण चव्हाण, अशोकराव ढमाले, अर्जुन ढोरे, अबोली ढोरे, पुनम जाधव, श्रीधर ढोरे, सुभाष जाधव, गोरख ढोरे, शांताराम कुडे, बाळकृष्ण ढोरे, सुरेशराव कुडे, अतुल वायकर, सतीश ढोरे, राजेंद्र वहिले, राजेंद्र म्हाळसकर,चंदुकाका ढोरे, अजित देशपांडे, नंदाताई ढोरे, गुलाबराव म्हाळसकर, तुकाराम ढोरे, राजेंद्र कुडे, आबा चव्हाण, पप्पू कुडे, युवराज ढोरे, वैभव पिंपळे, ज्योती जाधव, सुवर्णा चव्हाण, सचिन ढोरे, नरेंद्र ढोरे, बजरंग ढोरे, नितीन चव्हाण, सचिन कडू, अमर चव्हाण, शेखर वहिले, रमेश ढोरे, अनंता कुडे, सिद्धेश ढोरे आणि दिंडीचे पदाधिकारी, शहरातील नागरिक व पंचक्रोशीतील भाविक, भगिनी पत्रकार बांधव, जैन बांधव, मोरया महिला प्रतिष्ठानच्या  पदाधिकारी, संचालिका महिला भगिनी, सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध सोसायटीतील मित्रपरिवार, हितचिंतक आणि समस्त ग्रामस्थ या सोहळ्यानिमित्ताने शहरातील सर्वच मान्यवर मंडळी एकत्रितपणे मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 


याप्रसंगी मा. नगराध्यक्ष मयूर ढोरे, दिंडी अध्यक्ष महेंद्र ढोरे यांनी उपस्थित असलेल्या सर्व वारकरी भाविकांचे स्वागत करत पायी दिंडीला निघालेल्या वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

whatsapp

Maval News : पुणे पीपल्स बँकेच्या वतीने वारकऱ्यांसाठी मदतीचा हात

तारीख : 19-06-2025श्रेणी :महाराष्ट्र

feature image

टाकवे बुद्रूक (Takwe Budruk) : पुणे पीपल्स बँकेच्या वतीने व संचालक संजीव असवले यांच्या संकल्पनेतून जगद्‌गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा नामदेव वारकरी दिंडी क्र. : १०२ मु.पो. टाकवे बु।।, ता. मावळ देहू ते पंढरपूर पायी दिंडीतील वारकऱ्यांसाठी जेवण बनवण्यासाठी भांडी देण्यात आली.


यावेळी पुणे पिंपल्स बँकेचे विद्यामान संचालक संजीव असवले, जेष्ठ कारभारी दत्तोबा असवले, मा.उपसरपंच तानाजी असवले, चेअरमन तानाजी गुणाट, विठ्ठल रुक्मिणी ट्रस्टी शांताराम असवले, सोसायटी संचालक अनंता असवले, उद्योजक दत्तात्रय असवले, फॉरेस्ट ऑफिसर कोडींराम जांभुळकर, शिवाजी लोंढे, निवृत्ती गायकवाड, सुरेश असवले, मा.चेअरमन दत्ता घोजगे, शिवाजी असवले, काशिनाथ जांभुळकर, बाळासाहेब पिंगळे आदीजण उपस्थित होते.

whatsapp

Pawana Dam : पवना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची तुफान बॅटिंग; दोन दिवसात तब्बल चार टक्क्यांनी वाढ, एकूण पाणीसाठा किती?

तारीख : 19-06-2025श्रेणी :महाराष्ट्र

feature image

पवनानगर (Pawananagar) : गेल्या दोन दिवसांपासून पवन मावळवासियांना मुसळधार पावसाने चांगलेच झोडपले आहे. दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. कधी मध्यम तर कधी मुसळधार सरी कोसळत होत्या. यामुळे पवना धरणाच्या पाणी पातळीत मात्र घसघशीत वाढ होताना दिसत आहे. गेल्या दोन दिवसांच्या आकडेवारीनुसार पवना धरणाच्या पाणीसाठ्यात तब्बल चार टक्क्यांनी वाढ झाली. त्यामुळे आज (गुरुवार दि. १९ जून) सायंकाळी चार वाजताच्या आकडेवारीनुसार एकूण पाणीसाठा ३७.८५ टक्क्यांवर पोहोचला आहे. 


पवना धरण हे पिंपरी चिंचवड औद्योगिक नगरी आणि बहुतांश मावळ परिसराचे पिण्याच्या पाण्याचे मुख्य स्रोत आहे. पवना धरणाची पाणी साठवण क्षमता ही १० टीएमसी एवढी असून सद्यस्थितीला धरणात एकूण ८.५१ टीएमसी पाणी साठवले जाते. मागील वर्षी जून महिन्यात कमी पाऊस पडला. मात्र गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस लवकर सुरू झाला. जून महिन्यात सुरू होणार पाऊस मी महिन्यातच सुरू झाला. आजमितीला ८८ मिमी तर १ जून २०२५ पासून तब्बल ४८८ मिमी पाऊस पडला. केवळ १९ दिवसात धरणातील पाणीसाठा ३७.८५ टक्क्यांवर पोहोचला. 


दरम्यान, हवामान विभागाच्या आजपर्यंतच्या अंदाजानुसार यावर्षी पाऊस कमी दिवसात मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पावसाळी पर्यटन सुरक्षितरित्या करावे. पाण्याच्या प्रवाहात साहसीपणा दाखवू नये, सेल्फीचा मोह आवरावा असे आवाहन करण्यात येत आहे. 

whatsapp

Malwandi Thule Dam : अलर्ट! मावळातील मळवंडी ठुले धरण १०० टक्के भरले

तारीख : 19-06-2025श्रेणी :महाराष्ट्र

feature image

पवनानगर (Pawananagar) : गेल्या काही दिवसांपासून मावळात मुसळधार पाऊस कोसळत असून सर्वच ओढे-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. या तुडुंब ओढे-नाल्यांमुळे पवन मावळ परिसरातील मळवंडी ठुले धरण १०० टक्के भरले आहे. कार्यकारी अभियंता खडकवासला पाटबंधारे विभाग, पुणे यांच्या वतीने ही माहिती देण्यात आली.


मावळात पावसाचा जोर वाढला असून परिसरातील धरणांच्या पाणीसाठ्यात घसघशीत वाढ होताना दिसत आहे. येथील मळवंडी ठुले धरण आज (गुरुवार दि. १९) सकाळी १०० टक्के भरले आहे. धरणात ३.६९ द.ल.घ.मी पाणीसाठा आहे. सदर तलाव हा "द्वारविरहित" म्हणजेच Ungated आहे. त्यामुळे धरण १०० टक्के भरून कोथुर्णे ओढ्याद्वारे पवना नदीमध्ये अनियंत्रित विसर्ग सुरु झालेला आहे.


तरी वारू, कोथुर्णे, ब्राह्मनोली, कालेपर्यंतच्या सर्व ओढ्याकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देत आहे. नागरिकांनी नदीकाठी जाणे टाळावे, आणि सतर्क राहावे असे आवाहन कार्यकारी अभियंता खडकवासला पाटबंधारे विभाग, पुणे यांच्या वतीने करण्यात येत आहे. 

whatsapp

Ashadhi Wari 2025 : पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने वाहतूक बदलाबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

तारीख : 18-06-2025श्रेणी :महाराष्ट्र

feature image

पुणे (Pune) : श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने जिल्ह्यातील ग्रामीण भागात सोहळा प्रस्थानाच्यावेळी वाहतूक वळविण्यासोबत पर्यायी मार्गाबाबतचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी जारी केले आहेत.


श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीच्या अनुषंगाने वाहतूक बदल:


श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा २२ जून २०२५ रोजी पुणे ते सासवड दरम्यान सासवड येथे मुक्कामी असणार आहे. यावेळी पहाटे २ वा. पासून ते २४ जून २०२५ रोजीचे रात्री १२ वाजेपर्यंत पुण्याकडून सासवडकडे दिवेघाट व बोपदेवघाट मार्गे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. ही वाहतूक खडी मशीन चौक-कात्रज-कापूरहोळ मार्गे तसेच सासवडकडून पुण्याकडे येणारी वाहतूक गराडे-खेड शिवापूर मार्गे वळविण्यात येणार आहे.


२४ ते २५ जून २०२५ रोजी सासवड- जेजुरी-ते वाल्हे दरम्यान जेजुरी आणि वाल्हे येथे मुक्कामी असणार आहे. २४  जून रोजी पहाटे २ वा. पासून ते २५ जून रोजी रात्री १२ वाजेदरम्यान पुणे येथून सासवड-जेजुरी-वाल्हे-नीराकडे तसेच नीराकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक झेंडेवाडी-पारगाव मेमाणे-सुपे-मोरगाव-नीरा मार्गे वळविण्यात येणार आहे.


२६ जून २०२५ रोजी लोणंद येथे मुक्कामी असणार असून दरम्यान २६ जून रोजी सकाळी २ वा. पासून ते २६ जून रोजीचे सायं. ५ वा.पर्यंत पुणे येथून सासवड-जेजुरी-वाल्हे-निराकडे तसेच निराकडून पुण्याकडे जाणारी जाणारी वाहतूक सासवड-जेजुरी-मोरगाव मार्गे वळविण्यात येणार आहे.


२६ जून ते २८ जून या कालावधीत लोणंद येथून फलटणकडे पालखी प्रस्थान करणार असून या कालावधीत फलटण लोणंद येथून पुण्याकडे जाणारी तसेच पुण्याहून फलटण व लोणंदकडे जाणारी वाहतुक शिरवळमार्गे वळविण्यात येणार आहे.


श्री संत तुकाराम महाराज पालखीच्या अनुषंगाने वाहतूक बदल:


पालखी २३ जून रोजी लोणीकाळभोर ते यवत दरम्यान यवत येथे मुक्कामी असणार असून दरम्यान २३ जून रोजी पहाटे २ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत पुण्याकडून सोलापूरकडे जाणारी वाहतूक वाघोली-केसनंद-राहू-पारगाव-चौफुला तसेच सोलापूरकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक चौफुला-पारगाव-राहू-केसनंद-वाघोली या मार्गे वळविण्यात येणार आहे.


२४ जून रोजी यवत ते वरवंड दरम्यान वरवंड येथे मुक्कामी असणार दरम्यान २४ जून रोजी पहाटे २ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत पुण्याहून सोलापूरकडे जाणारी वाहतूक थेऊर फाटा-केसनंद-राहू-पारगाव-न्हावरे-काष्टी-दौंड-कुरकुंभ तसेच सोलापूरहून पुण्याकडे जाणारी वाहतूक कुरकुंभ-दौंड-काष्टी-न्हावरे-पारगाव-राहू-वाघोली-पुणे या मार्गे वळविण्यात येणार आहे.


२५ जून रोजी वरवंड ते उंडवडी ता. बारामती दरम्यान उंडवडी येथे मुक्कामी असणार आहे. यावेळी २५ जून रोजी पहाटे २ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत पुण्याहून सोलापूरकडे जाणारी वाहतूक चौफुला-पारगाव-न्हावरे-काष्टी-दौंड-कुरकुंभ तसेच सोलापूरहून पुण्याकडे जाणारी जाणारी वाहतूक कुंरकुंभ-दौंड-काष्टी-न्हावरे-पारगाव-चौफुला-पुणे या मार्गे वळविण्यात येणार आहे.


तसेच पहाटे २ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत बारामती ते पाटस व बारामती ते दौंड रस्ता बंद करण्यात येणार दरम्यान या मार्गावरील वाहतूक भिगवणमार्गे बारामती आणि बारामतीकडून येताना भिगवणमार्गे सोलापूर-पुणे महामार्गावर येतील. बारामतीहून पाटसकडे जाणारी वाहतूक बारामती-लोणीपाटी-सुपा-चौफुला-पाटस तसेच तसेच पाटसहून बारामतीकडे जाणारी वाहने पाटस-चौफुला-सुपा-लोणीपाटी-बारामतीकडे येतील.


२६ जून रोजी उंडवडी ते बारामती दरम्यान बारामती शहरात मुक्कामी असणार असून दरम्यान २६ जून रोजी पहाटे २ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत बारामती ते पाटस व बारामती ते दौंड रस्ता बंद करण्यात येणार आहे. या मार्गावरील वाहतूक भिगवणमार्गे बारामती आणि बारामतीकडून भिगवणमार्गे सोलापूर-पुणे महामार्गावर येतील.


२७ जून रोजी पालखी सणसर येथे मुक्कामी असणार असून दरम्यान २७ जून रोजी सकाळी २ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत जंक्शन ते बारामती वाहतुकीचा रस्ता बंद करण्यात येणार असून वालचंदनगर व इंदापूरकडून येणारी वाहतूक जंक्शन येथून कळसमार्गे बारामती अष्टीकडे तसेच बारामतीकडून येणारी वाहतूक भिगवण कळसमार्गे जंक्शनकडे वळविण्यात येणार आहे.


२८ जून रोजी सणसर ते अंथुर्णे दरम्यान निमगाव केतकी येथे मुक्कामी असणार असून २८ जून रोजी पहाटे २ वाजल्यापासून ते २९ जून रोजी रात्री १२ वाजेपर्यंत बारामतीकडून इंदापूरकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने बारामती-कळंब-बावडा-इंदापूर, बारामती-भिगवण-इंदापूर तसेच इंदापूरकडून बारामतीकडे जाणारी वाहतूक  इंदापूर-बावडा-कळंब-बारामती आणि इंदापूर-भिगवण-बारामती यामार्गे वळविण्यात येणार आहे.


२९ जून रोजी निमगाव केतकी ते इंदापूर दरम्यान इंदापूर येथे मुक्कामी असून पहाटे २ वाजल्यापासून रात्री १२ वाजेपर्यंत निमगाव केतकीकडून इंदापूरकडे जाणारी वाहतुक बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे इंदापूरकडून बारामतीकडे जाणारी वाहतूक लोणी देवकर-कळस -जंक्शन मार्गे बारामती किंवा लोणी-देवकर-भिगवण मार्गे बारामतीकडे यामार्गे वळविण्यात येणार आहे.


३० जून रोजी पहाटे ४ वाजल्यापासून ते रात्री ८ वाजेपर्यंत अकलूजकडून बारामतीकडे जाणारी वाहतूक अकलुज-बावडा-नातेपूते बारामती तसेच अकलूजकडून बारामती व पुण्याकडे जाण्याकरीता इंदापूर मुख्य हायवेचा वापर करावा. ३० जून रोजी इंदापूर शहरातील जुना पुणे-सोलापूर रोड वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार वाहतूक मालोजीराजे चौक ते महात्मा फुले चौक अशी बाह्यमार्गान वळविण्यात येणार आहे.


१ जुलै रोजी इंदापूर ते सराटी दरम्यान सराटी येथे मुक्कामी असून पहाटे २ वाजल्यापासून रात्रौ १२.० ० वाजेपर्यंत तसेच ३ जुलै रोजी पहाटे २ वा पासून ते दुपारी १२ वाजेपर्यंत इंदापूर अकलूज रोडवरील वाहतुक पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. इंदापूर ते अकलूज या मार्गावरील वाहने इंदापूर-हिंगणगाव-टेंभुर्णी-गणेशगाव-माळीनगर-अकलूज आणि अकलूज ते इंदापूर मार्गावरील वाहतूक अकलूज-नातेपूते-वालचंदनगर-जंक्शन-भिगवण या मार्गे वळविण्यात येणार आहे, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

whatsapp