तारीख : 24-08-2025श्रेणी :महाराष्ट्र
तारीख : 26-08-2025श्रेणी :महाराष्ट्र
तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) : “सेवा हीच खरी ओळख” या ब्रीदवाक्याने प्रेरित होऊन रोटरी क्लब ऑफ तळेगाव सीटीने गेल्या काही महिन्यांत समाजोपयोगी कामांची मालिका राबवून विक्रमी कामगिरी केली आहे. समाजातील प्रत्येक घटकासाठी उपयुक्त ठरणारे प्रकल्प राबविण्यात क्लब आघाडीवर असून, नागरिकांकडून मिळालेला प्रचंड प्रतिसाद हीच यशोगाथा आहे.
या विशेष कार्यक्रमाला संग्राम जगताप, शहा दिपक, विलास काळोखे, भगवान शिंदे, संजय मेहता आदी मान्यवर उपस्थित होते.
समाजहिताचे प्रकल्प
क्लबचे पदाधिकारी भगवान शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार —
• केवळ दोन महिन्यांत दिवसाआड प्रकल्प राबवून आतापर्यंत १० हून अधिक पुरस्कार मिळाले.
• सीआरपीएफ पाणी प्रकल्पासाठी तब्बल ५ लाख खर्च करून कार्यवाही पूर्ण.
• कृष्णराव भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप.
• विलास काळोखे यांच्या वाढदिवसानिमित्त २२ समाजोपयोगी प्रकल्प.
• पर्यावरण संवर्धनासाठी झाडे लावण्याचा उपक्रम.
• स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना.
• टीचर ट्रेनिंग, गृहिणींसाठी गणपती स्पर्धा व ‘खेळ रंगला पैठणीचा’ कार्यक्रम – महिलांना व्यासपीठ.
• स्मशानभूमीत स्वच्छतागृह व स्नानगृहांची सुविधा.
• तळेगाव एस.टी. स्टँडवर २२ लाख खर्चून सार्वजनिक शौचालय उभारणी.
• नगरपालिकेसोबत महिलांसाठी १० टॉयलेट युनिट्स.
• हेल्थ चेकअप कॅम्प, सॅनेटरी नॅपकिन वाटप, शालेय साहित्य मदत यांसारखे उपक्रम.
• गर्दीच्या ठिकाणी नो पार्किंग बोर्ड लावून अपघात रोखण्याचा प्रयत्न.
क्लबची वैशिष्ट्ये
२०१६ पासून कार्यरत असलेल्या रोटरी क्लब ऑफ तळेगाव सीटीमध्ये ३४ सभासद असून त्यात वकील, डॉक्टर, उद्योजक आणि महिलांचा मोठा सहभाग आहे. आतापर्यंत ४०० हून अधिक गरीब जोडप्यांचे विवाहसोहळे आयोजित. गोरगरीब विद्यार्थ्यांना मदत व आरोग्य शिबिरे. “एक सभासद प्रस्ताव मांडतो, इतर सर्व सदस्य पाठिंबा देतात” या पद्धतीमुळे क्लबच्या कामात गती. जिल्हास्तरावर कार्याची दखल घेत क्लबला सतत सन्मान.
भविष्यातील उद्दिष्टे
संग्राम जगताप यांनी या उपक्रमांचे कौतुक करताना म्हटले की, “रोटरी क्लबने केलेले समाजकार्य हे अनुकरणीय आहे. आगामी काळात आणखी व्यापक प्रकल्प हाती घेऊन समाजाच्या प्रत्येक घटकासाठी सेवा पोहोचेल,” अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.
तारीख : 25-08-2025श्रेणी :महाराष्ट्र
वडगाव मावळ (Vadgaon Maval) : वडगाव नगरपंचायतमार्फत स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा अभियान ६.० अंतर्गत यंदाच्या गणेशोत्सवात पर्यावरणपूरक पद्धतीने बाप्पाचे विसर्जन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांनी घरच्या घरी श्रींची पूजा, आरती करून मूर्ती विसर्जन न करता नगरपंचायत कार्यालयात उभारण्यात आलेल्या श्री गणेश मूर्ती दान केंद्रात मूर्ती दान कराव्यात, असे आवाहन नगरपंचायत मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ. प्रविण निकम यांनी केले आहे.
तसेच शहरातील विहिरी, नद्या व तलावामध्ये मूर्ती विसर्जन न करता खालील ठिकाणी तयार करण्यात आलेल्या कृत्रिम विसर्जन हौदात विसर्जन करावे:
१. केशवनगर, पाणी टाकीजवळ
२. विजयनगर कॉलनी
३. श्री पोटोबा महाराज तलावाजवळ
४. स्मशानभूमी पाठीमागे
५. माळीनगर
६. प्रभाग क्र. १६ पाणी टाकीजवळ
७. प्रभाग क्र. १७, छत्रपती संभाजी नगर
तसेच नागरिकांनी निर्माल्य (फुलं, हार, माळा इत्यादी) थेट नदीत किंवा तलावात न टाकता यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या निर्माल्य कलशात टाकावे, असेही नगरपंचायतीने स्पष्ट केले आहे.
यंदाचा गणेशोत्सव “पर्यावरणपूरक गणेशोत्सव – चला पर्यावरणाला साथ देऊया” या संकल्पनेखाली साजरा करण्याचे नगरपंचायतीचे उद्दिष्ट आहे.
तारीख : 20-08-2025श्रेणी :महाराष्ट्र
लोणावळा (Lonavala) : घाटमाथ्यावर पुन्हा एकदा पावसाने थैमान घातले आहे. अवघ्या एका दिवसात म्हणजेच १९ ऑगस्ट रोजी लोणावळ्यात तब्बल ४३२ मिमी (१७ इंचांहून अधिक) पाऊस झाला असून शहराचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.
रस्ते जलमय
• नांगरगाव, वलवण, बापदेव रोड, नारायणी धाम मार्ग, भांगरवाडी व रायवूड परिसरातील रस्ते पूर्णपणे पाण्याखाली गेले.
• मुख्य बाजारपेठ, बसस्थानक रस्ता आणि नवीन पोलिस स्टेशनजवळील मार्गावर वाहनचालकांना अक्षरशः कसरत करावी लागत आहे.
पावसाची तुलना
• यावर्षी लोणावळ्यातील पावसाची एकूण नोंद: ४८१० मिमी (१८९ इंच)
• मागील वर्षी याच तारखेपर्यंत: ४५१४ मिमी (१७७ इंच)
नद्या-नाले उफाळले
इंद्रायणी नदी धोक्याच्या पातळीवर वाहू लागली आहे, तर अनेक नाले ओसंडून रस्त्यांवर आले आहेत. त्यामुळे नागरिकांना वाहतुकीत मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
हवामान विभागाने पुढील २४ तासांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. यामुळे लोणावळा नगरपरिषदेनं तातडीचा निर्णय घेत सर्व शाळांना दोन दिवसांची सुट्टी जाहीर केली.
नगरपरिषदेनं नागरिकांना अनावश्यक कारणाशिवाय बाहेर न पडण्याचे, पाणी साचलेल्या भागात न जाण्याचे आणि झाडाखाली उभे न राहण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, तज्ज्ञांच्या माहितीनुसार धरणांमध्ये अजून साठवण क्षमतेची जागा असल्याने तातडीचा पूर धोका नाही, मात्र मुसळधार पावसामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तारीख : 19-08-2025श्रेणी :महाराष्ट्र
पवनानगर (Pawananagar) : मुसळधार पावसामुळे पवना धरण शंभर टक्के क्षमतेने भरले असून मंगळवारी सकाळी (दि. १०) वाजण्याच्या सुमारास धरण प्रशासनाने ४३०० क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील नागरिकांसाठी ही दिलासादायक बाब असली तरी पवना नदीकाठच्या गावांना मात्र सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पवना धरणाची एकूण साठवण क्षमता सुमारे १०.७७ टीएमसी असून सध्या धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी विसर्ग सुरू करण्यात आला आहे. या पाणलोट क्षेत्रातील सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे पुढील काही दिवस विसर्ग सुरू राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
धरणातून विसर्ग सुरू झाल्यानंतर पवना नदीपात्रातील पाणीपातळी झपाट्याने वाढत असून शेतकऱ्यांनी नदीपात्रातील शेतीकाम त्वरित थांबवावे, पवना पुल व घाट परिसरात अनावश्यक गर्दी टाळावी तसेच नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन महसूल व आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आले आहे.
धरण शंभर टक्के भरल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. “या वर्षी पाणीटंचाईचा प्रश्न उद्भवणार नाही, खरीप आणि रब्बी हंगाम सुरळीत पार पडेल,” अशी भावना स्थानिक शेतकरी व्यक्त करत आहेत. तर काही ग्रामस्थांनी विसर्गामुळे होणाऱ्या पुराच्या धोक्याबद्दल चिंता व्यक्त केली.
तारीख : 17-08-2025श्रेणी :महाराष्ट्र
वडगाव मावळ (Vadgaon Maval) : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचे सन २०२५ हे वर्ष सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी ७५०वे जयंती वर्ष म्हणून साजरे होत आहे. महाराष्ट्र शासनाच्या सूचनांनुसार वडगाव नगरपंचायतच्या वतीने शुक्रवार, दि. १५ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत पालखी मिरवणुकीचे भव्य आयोजन करण्यात आले.
पालखीचे प्रस्थान पोटोबा महाराज देवस्थान मंदिरापासून झाले. पुढे खंडोबा मंदिर मार्गे नगरपंचायत कार्यालयापर्यंत पालखी मिरवणुकीची शोभायात्रा पार पडली. पालखीचे पूजन मुख्याधिकारी डॉ. प्रविण निकम आणि पोटोबा देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त यांच्या हस्ते संपन्न झाले.
मिरवणुकीत वडगाव शहरातील वारकरी संप्रदाय, सर्वपक्षीय पदाधिकारी, मान्यवर, नगरपंचायत अधिकारी–कर्मचारी व भाविक नागरिक मोठ्या संख्येने पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले.
आळंदी येथील वारकरी शिक्षण संस्थेच्या चिमुकल्यांनी टाळ–मृदूंगाच्या गजरात भक्तिगीतांद्वारे मिरवणुकीची शोभा दुणावली. वातावरणात हरिनामाचा गजर आणि भक्तिरस ओसंडून वाहत होता. नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेऊन या पालखी मिरवणुकीला भव्य श्रद्धामय आणि ऐतिहासिक रूप प्राप्त करून दिले.