तारीख : 21-12-2023श्रेणी :राजकारण
तारीख : 20-11-2023श्रेणी :राजकारण
वडगाव मावळ (Vadgaon Maval) : मोरया प्रतिष्ठानच्या वतीने वडगाव शहरातील मुलांसाठी गड-दुर्ग अभ्यास मोहीमेचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेच्या माध्यमातून मुलांना प्रत्येक महिन्याला एक गड-दुर्ग पाहता येणार आहे, त्याचा सखोल अभ्यास करता येणार आहे. रविवार (दि. ३ डिसेंबर २०२३) रोजी या सहलीची शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरीपासून सुरुवात होणार आहे. इयत्ता ४ थी ते १० वी पर्यंत इयत्तेतील मुले-मुली यात सहभाग घेऊ शकतात. इच्छुकांनी मंगळवार (दि. २८ नोव्हेंबर २०२३) पर्यंत नावनोंदणी करावी, असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले.
श्री. छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य निर्माण करत असताना त्यांनी जवळपास ३५० ते ४०० गडदुर्ग ताब्यात घेऊन, जिंकून, उभारून स्वराज्य स्थापन केले. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा इतिहास आपण पुस्तकातूनच वाचतो. आपल्या मुलांना छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्याबद्दल जाणून घ्यायचे असेल तर गड दुर्गांशिवाय पर्याय नाही. एवढं मोठं स्वराज्य निर्माण करत असताना त्यांना किती कष्ट सोसावे लागले असतील. त्यांच्या व मावळ्यांच्या शौर्यगाथा, महाराजांचा गणिमी कावा, मुसूदध्येगिरी, शाहीथाट, जनतेबद्दल असलेली आपुलकी हे सर्वच या दुर्गांच्या प्रत्येक दगडात मातीच्या कणात अजूनही साठलेले आहे आणि आपल्या मुलांना किंवा आपल्या भावी पिढीला याची जाणीव करून देण्यासाठी आपण हि गडदुर्गांची सहल अतिशय अल्प दरात दर महिन्यासाठी सुरू करत असल्याचे प्रतिष्ठानचे संस्थापक माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी सांगितले.
दरम्यान, या सहलीमुळे मुलांची शारीरिक तंदुरुस्ती, शारीरिक क्षमता, बुद्धीमत्ता, इतिहासाची जाण त्यामुळे येणारा आत्मविश्वास, आपला पूर्वजांबद्दल आदर, आपल्या मराठ्यांची संस्कृती व इतिहास या सर्व गोष्टी अनुभवायला मिळणार आहे. आम्ही पालकांना विश्वास देतो आपला मुलगा किंवा मुलगी यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये निश्चितपणे चांगला बदल पाहायला मिळेल. आपण या सहलीमध्ये अतिशय अनुभवी इतिहास संशोधकांबरोबर मुलांना सहज समजेल अशा सोप्या भाषेमध्ये गडदुर्गांबद्दलची माहिती व इतिहास सांगितला जाणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
तारीख : 17-08-2023श्रेणी :राजकारण
वडगाव मावळ (Vadgaon Maval) : मावळ तालुक्यातील दारुंब्रे गावातील जि.प.शाळेच्या डागडुजीसाठी आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून सुमारे ११ लक्ष निधीतून कामे करण्यात आल्याने ही शाळा आता 'बोलकी शाळा' झाली आहे. शाळेच्या वर्ग खोल्या दुरुस्तीसह, रंगकाम, भिंतीवरील चित्रे, स्वच्छतेची कामे केल्याने शाळेचे अंतर्बाह्य रुप पूर्णपणे बदलले आहे.
शाळेमध्ये गणित, भूगोल, इतिहास,सामान्य ज्ञान इ.विषयातील मुद्दे घेऊन रेखाटने करण्यात आली आहेत. शाळेत येता जाता या रेखाटलेल्या चित्रांकडे विद्यार्थ्यांचे लक्ष जात असल्याने त्याबद्दलचे कुतुहल त्यांच्या मनात नक्कीच वाढते. त्यामुळे पालकांसह, शिक्षकांनी आमदार शेळके यांचे आभार मानले आहेत. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर देखील आनंद पाहायला मिळाला.
तारीख : 07-02-2023श्रेणी :राजकारण
वडगाव मावळ (Vadgaon Maval) : मावळ तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या निवडणूकीत भक्ती शक्ती पॅनलने आपले निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करत १९ पैकी तब्बल ११ जागांवर विजय मिळवला आहे. तर संघशक्ती परिवर्तन पॅनलने ४ जागा आणि लोकशाही स्वाभीमानी सहकार पॅनलने ४ जागांवर विजय मिळाला. ही निवडणूक प्रक्रिया रविवारी (दि. ५) पार पडली.
१९ जागांसाठी ५५ उमेदवारांनी आजमावले नशीब
मावळ तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या या निवडणूकीत १९ जागांसाठी ५५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यात सर्वसाधारण १४ जागांसाठी ४१, महिला राखीव दोन जागांसाठी सहा, अनुसूचित जाती-जमातीच्या एका जागेसाठी तीन, इतर मागासवर्गाच्या एका जागेसाठी तीन व भटक्या विमुक्त जाती जमातीच्या एका जागेसाठी दोन जणांचा समावेश होता.
या निवडणुकीत भक्ती शक्ती पॅनल, संघशक्ती परिवर्तन पॅनल, लोकशाही स्वाभीमानी सहकार पॅनलने या तीन पॅनलमुळे निवडणूकीत रंगत निर्माण झाली होती. रविवारी उत्साहाच्या वातावरणात झालेल्या मतदान प्रक्रियेत एकूण ६४८ मतदारांपैकी ६३६ (९८.१४ टक्के) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर लगेच मतमोजणी प्रक्रिया पार पडली.
या निवडणुकीत शिक्षक नेत्या शोभा वहिले, शालिनी ढवळे, रघुनाथराव रोकडे, बाबासाहेब औटी, दिलीपकुमार वेदपाठक, श्रीकांत दळवी, बाळासाहेब शिंगाडे, विलास थोरात, राजू लोंढे, सुहास धस, गोरख जांभूळकर यांच्या नेतृत्वाखालील व नारायण कांबळे, निर्मला काळे यांच्या अध्यक्षतेखाली (शिवाजीराव पाटील गट) भक्ती शक्ती पॅनलने १९ पैकी ११ जागा जिंकून पुन्हा एकदा निर्विवाद वर्चस्व मिळवून सत्ता कायम ठेवण्यात यश मिळवले.
विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे -
सर्वसाधारण (१४ जागा)
नारायण गायकवाड (३३४ मते), मनोज भांगरे (३२५ मते), प्रमोद भोईर (२९३ मते), नारायण कांबळे (२६१ मते), अनिल कळसकर (२५५ मते), आण्णासाहेब ओहोळ (२५५ मते), संजय ठुले (२५५ मते), राहूल जाधव (२४३ मते), यशवंत काळे (२३६ मते), संदीप सकपाळ (२३३ मते), हरिभाऊ आडकर (२३० मते), राकेश चांदोरकर (२३० मते), गणेश धिवार (२२८ मते), नितिन वाघमारे (२२८ मते).
महिला प्रतिनिधी (२ जागा)
- स्नेहल औटी (३२० मते), संगिता शिरसाठ (२६५ मते)
भटक्या विमुक्त जाती (१ जागा)
- राहूल लंबाते (३१८ मते),
इतर मागास प्रवर्ग (१ जागा)
- अतुल वाघ (२३३ मते),
अनुसूचित जाती जमाती (१ जागा)
- गेणू मोरमारे (२५५ मते)
तारीख : 09-01-2023श्रेणी :राजकारण
तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) : रयत शिक्षण संस्थेचे दादा पाटील महाविद्यालय कर्जत (जि.अहमदनगर) या महाविद्यालयांमध्ये सावित्रीबाईं फुले यांच्या जयंतीनिमित्त भारतातील पहिले स्त्री शिक्षिका साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार देऊन स्नेहल दत्तात्रय बाळसराफ यांना सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या निमित्ताने संमेलनाध्यक्ष डॉ. प्रतिभा अहिरे तसेच निमंत्रक आमदार रोहित पवार, स्वागताध्यक्ष राजेंद्र फाळके, संस्थेच्या मीनाताई जगधने आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर इत्यादी उपस्थित होते.
खासदार सुप्रिया सुळे यांनी स्त्री शिक्षिका साहित्य संमेलन आयोजित केल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नगरकर यांचे कौतुक केले. तसेच महिलांनी सावित्रीबाई फुले यांच्या साहसी वृत्तीचे आचरण करून आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे असे सांगून सामाजिक चळवळीमध्ये महिलांचा सहभाग एवढा वाढेल तेवढा विकास झपाट्यांना होईल असे मत स्पष्ट केले.
त्याचप्रमाणे आमदार रोहित पवार यांनी या संमेलनाविषयी मार्गदर्शन करताना महिलांविषयी आरक्षण निर्णय प्रक्रियेतील शरदराव पवार यांचा सहभागाचा खास उल्लेख करून महिलांनी सक्षम होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजे, असे आवाहन केले. समाजातील विविध क्षेत्रातील महिला आपापल्या परीने सामाजिक योगदान करीत आहेत त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केल्यामुळे समाजात चांगला संदेश जाणार आहे, आणि त्यामुळे महिला देखील मोठ्या संख्येने सहभागी होतील असा विश्वास व्यक्त केला.
याप्रसंगी महाविद्यालयाने आजच्या स्त्री मनोविश्वातून सावित्री हरवत चालली आहे का ? या विषयावर परिसंवाद आयोजित केला होता. या परिसंवादामध्ये एकविसाव्या शतकातील महिलाना जरी शिक्षणाने आत्मविश्वास निर्माण झाला. महिला अर्थार्जन करू लागल्या. त्यामुळे महिला आत्मनिर्भर झाल्या तरी निर्णय प्रक्रियेमध्ये थोड्याशा पाठीमागे राहत असल्याची स्नेहल बाळसराफ यांनी खंत व्यक्त केली. आधुनिक काळातील महिला संस्कारक्षम कुटुंब पद्धती देण्यामध्ये काही प्रमाणात मागे राहिलेल्या आहेत असे सांगून बाळसराफ यांनी महिलांनी सर्व क्षेत्रात पुढाकार घेऊन मिळालेल्या संधीचे सोने करावे असे आवाहन केले.
परिसंवादातील विषयावर आपले स्पष्ट मत मांडताना स्त्री मनोविश्वातून सावित्री हरवत चालली आहे. अशी खंत व्यक्त केली. त्यासाठी महिलांना स्वातंत्र्य देऊन त्यांच्या पंखांमध्ये बळ दिले तरच गरुड भरारी मारू शकतात, असे आग्रही मत स्नेहल बाळसराफ यांनी प्रतिपादन केले.
तारीख : 03-01-2023श्रेणी :राजकारण
तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) : शाळा हे सुसंस्कृत, वैचारिक तरुण पिढी घडविणाऱ्या संस्कार केंद्र असल्याचे मत मावळचे आमदार सुनील शेळके यांनी
नवीन समर्थ विद्यालय येथे व्यक्त केले. नवीन समर्थ विद्यालय व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्सच्या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ नुकताच संपन्न झाला.
यावेळी प्रमुख पाहुणे मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके हे होते. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव संतोष खांडगे हे होते. यावेळी नूतन संगणक कक्षाचे उद्घाटन करण्यात त्यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच स्नेहसंमेलनाला नवीन समर्थ विद्यालयाचे माजी विद्यार्थी एडवोकेट धनंजय काटे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करून करण्यात आले.
यावेळी नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे, नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक उपाध्यक्ष गणेश खांडगे, लायन्स क्लब ऑफ राजगुरुनगरच्या अध्यक्षा कु.अक्षदा कान्हुरकर, उद्योजक विलास काळोखे, पुणे जिल्हा कला शिक्षक संघाचे अध्यक्ष मिलिंद शेलार, लायन्स क्लब ऑफ तळेगाव दाभाडेचे अध्यक्ष मयूर राजगुरव, रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीचे अध्यक्ष विन्सेंट सालेर, दादासाहेब उर्हे, नगरसेविका श्रीमती संगीताताई शेळके, रमाकांत नायडू , दामोदर शिंदे, यादवेंद्र खळदे, सोनबा गोपाळे, चंद्रकांत शेटे, शंकर नारखेडे, शैलेश शहा, डॉ. शाळीग्राम भंडारी संस्थेच्या सर्व शाळांचे मुख्याध्यापक, माजी शिक्षक मुख्याध्यापक इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
आमदार सुनील शेळके पुढे बोलताना म्हणाले, नवीन समर्थ विद्यालय ही एक ऐतिहासिक वास्तू स्वातंत्र्यपूर्व काळापासून राष्ट्रीय शिक्षण देणारी शाळा आहे. या शाळेने मला घडविले. आजही वारंगवाडी, कातवी आंबी यांसारख्या भागातून सामान्य कुटुंबातून विद्यार्थी या शाळेत शिकण्यासाठी येतात. सध्या तरुण पिढीमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढत आहे. त्याला आळा घालण्यासाठी व भारत देशाच्या उज्वल भविष्यासाठी सुसंस्कृत पिढी तयार करण्याचे काम शिक्षक आणि शाळांवर आहे.
यावेळी बोलताना संतोष खांडगे म्हणाले की, शाळा या समाज विकासासाठी नेहमीच केंद्रस्थानी राहिल्या आहेत. नवीन समर्थ विद्यालय ही एक राष्ट्रीय वास्तू स्वातंत्र्यपूर्व काळात हुतात्मा क्रांतिरत्न विष्णू गणेश पिंगळे यांसारख्या विद्यार्थ्यांना घडविणारी ही शाळा आजही खेळ, स्पर्धा परीक्षा यांच्या माध्यमातून विद्यालय अग्रेसर आहे. विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेता शाळेत नूतन वस्तूची गरज भासत आहे. माजी विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून नवीन समर्थ विद्यालयाची नूतन वास्तु लवकरच उभी राहील असा मानस असून त्यासाठी दानशूर व्यक्तींनी मदत करण्याचे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमाची प्रास्ताविक शालेय समिती अध्यक्ष महेशभाई शहा यांनी केले. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. माझा देश माझा स्वाभिमान हे सूत्र केंद्रस्थानी मानून संपूर्ण स्नेहसंमेलनाची रूपरेषा स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवावर आधारित होतीm विद्यालयातील जवळपास १९५ विद्यार्थ्यांनी गायन, नृत्य, नाट्य अभिनय याद्वारे आपल्या कला सादर केल्या.
यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या निरंजन या हस्तलिखिताचे प्रकाशन नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. तसेच रांगोळी, कला, विज्ञान दालनांची सुंदर उभारणी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली केली होती. मान्यवरांच्या शुभहस्ते या दालनांची उद्घाटने करण्यात आली.
अक्षदा कान्हुरकर, धनंजय काटे इत्यादी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. मान्यवरांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांना आंतरशालेय बौद्धिक व क्रीडा स्पर्धांची बक्षीस देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभा काळे व शारदा वाघमारे यांनी केले. उपस्थित मान्यवरांचे आभार विद्यालयाचे प्राचार्य संजय वंजारे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य संजय वंजारे, पर्यवेक्षक भाऊसाहेब आगळमे, सायन्स कॉलेज विभाग प्रमुख विजया देशपांडे, शिक्षक प्रतिनिधी शारदा वाघमारे, बाळासाहेब जाधव, संमेलन प्रमुख सविता चव्हाण, प्रीती गौड, प्रवीण राऊत, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी प्रतिनिधी यांनी विशेष श्रम घेतले.