तारीख : 19-07-2023श्रेणी :गुन्हेगारी
तारीख : 20-02-2024श्रेणी :गुन्हेगारी
कामशेत (Kamshet) : कामशेत शहरातील बेकायदेशीर जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली. रविवारी (दि. १८) रोजी कामशेत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नाणे रेल्वे गेट जवळील एका बंदीस्त खोलीमध्ये ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी दहा जणांना ताब्यात घेतले आहे.
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल रहिस मुलाणी यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार दहा आरोपींवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियमच्या विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपींकडून तब्बल ११ लाख ४३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. (Police raid illegal gambling den in Kamshet city)
लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलिस अधिक्षक सत्यसाई कार्तिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, कामशेत पोलीस ठाण्याच्या हद्दीत खडकाळे (ता. मावळ) येथे नाणे रेल्वे गेट जवळील एका बंदीस्त खोलीमध्ये काहीजण अवैधरित्या जुगार अड्डा चालवत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार कामशेत पोलिसांकडील पथकाने रविवारी (दि. १८) त्याठिकाणी जाऊन छापा मारला असता जुगार अड्डा चालवणारा एजंट व जुगार खेळणारे असे एकूण १० आरोपींना ताब्यात घेण्यात आले. आरोपींकडून रोख रक्कम, गाड्या व मोबाईल फोन असा एकूण ११ लाख ४३ हजार ४७० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास कामशेत पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शुभम चव्हाण करत आहेत.
सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहा. पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, सपोनि सचिन राऊळ, पोसई शुभम चव्हाण, पोहवा नितेश (बंटी) कवडे, पो.कॉ रहिस मुलाणी यांच्या पथकाने केली आहे.
तारीख : 20-02-2024श्रेणी :गुन्हेगारी
तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) : कंपनीच्या कर्मचाऱ्यानेच तिजोरीतील साडे चौदा लाखांच्या रोख रक्कमेवर डल्ला मारला. हा प्रकार ३० जानेवारी २०२४ ते १५ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत सोमाटणे (ता. मावळ) टोलनाकाजवळ जापलूप इक्वेस्ट्रियन कंपनीमध्ये घडला.
याप्रकरणी रोहन समिर मोरे (वय ४३, सोमाटणे टोलनाक्याजवळ, तळेगाव दाभाडे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अकिल गुलाब शेख (वय २४, रा. परभणी, सध्या रा. सोमाटणे) यांच्यावर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
(A cash amount of fourteen and a half lakhs was stolen from the treasury by the employee)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादीच्या जापलूप इक्वेस्ट्रीयन सेंटर प्रा. लि. कंपनीमध्ये कामाला असून आरोपीने कंपनीच्या ऑफीसमधील लाकडी कपाटात लॉक करून ठेवलेली ३ हजार रुपयांची लोखंडी तिजोरी व त्यातील १४ लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण १४ लाख ५३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी करून नेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलीस करत आहेत.
तारीख : 16-02-2024श्रेणी :गुन्हेगारी
तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) : बनावट खात्याद्वारे कर्मचाऱ्याकडून बांधकाम व्यवसायिकाची तब्बल ५५ लाखांची फसवणूक करण्यात आली. सन २०१६ ते दि. १ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत जी.पी. पारसिक सहकारी बँक, तळेगाव दाभाडे (ता. मावळ) येथे हा प्रकार घडला.
गिरीष हरिश्चंद्र करंडे (वय ४९, व्य. अधिराज लॅण्ड डेव्हलपर्स, रा. मुरलीधर मंदीराजवळ, बुधवार पेठ, तळेगाव दाभाडे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रतिक मच्छिंद्र पाबळे (वय ३०, रा. मनोहर नगर, तळेगाव दाभाडे) यांच्यावर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पाबळे याने फिर्यादीकडून सन २०१६ पासून नोकरीवर असताना फिर्यादी यांच्या अधीराज लॅण्ड डेव्हलपर्स या व्यवसायाच्या नावाने जीपी पारसिक सहकारी बँक, तळेगाव दाभाडेमध्ये बोगस खाते उघडून फिर्यादीच्या व्यवसायाचे येणारे पेमेंट सन २०१६ पासून ते आतापर्यंत त्या बोगस खात्यामध्ये घेतले. आणि आतापर्यंत फिर्यादीची तब्बल ५५ लाख ३ हजार ३६७ रूपयांची आर्थिक फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलीस करत आहेत.
तारीख : 15-02-2024श्रेणी :गुन्हेगारी
शिरगाव (Shirgaon) : पवना नदीकाठी सुरु असलेल्या अवैध गावठी दारू भट्टीवर पोलिसांनी छापा टाकला. सोमवारी (दि. १२) दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास शिरगाव (ता. मावळ) पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली.
याप्रकरणी पोलीस शिपाई भरत श्रीमंत माने यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका महिला आरोपीवर शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला ही हातभट्टी दारू तयार करण्यासाठी ४ लाख ५०० रुपये किंमतीचे ४ हजार ली. गूळ मिश्रीत रसायन भिजत घालताना मिळुन आली व पोलीस आल्याची चाहूल लागताच पवना नदी काठी असलेले झाडाझुडपाच्या आडोशाचा फायदा घेवून पळून गेली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास शिरगाव-परंदवडी पोलीस करत आहेत.
तारीख : 12-02-2024श्रेणी :गुन्हेगारी
पुणे (Pune) : आगामी सार्वत्रिक लोकसभा निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने अवैध दारू निर्मिती, वाहतूक व विक्रीवर आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागीय भरारी पथकाने जिल्ह्यात सहा गावात छापे टाकत ९९५ लिटर गावठी हातभट्टी दारूसह ७ लाख ९० हजार ५५० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
भरारी पथकाने गेल्या दोन दिवसात सोरतापवाडी, शिंदवणे, गाडामोडी, डाळींब, राजेवाडी व आंबळे या ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत ५ वारस व ३ बेवारस अशा ८ गुन्ह्यांची नोंद करून ९९५ लिटर गावठी हातभट्टी दारू, २५ हजार लिटर रसायण, ३ दुचाकी वाहने व गावठी हातभट्टी दारू निर्मितीचे साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या गुन्ह्यातील आरोपी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेवून फरार झाले असून त्यांचा शोध घेण्याची कारवाई सुरू आहे. ही कारवाई दुय्यम निरीक्षक ए. बी. पाटील, व्ही. एम. माने व इतर कर्मचाऱ्यांनी केली. (Raids in six villages of district including Maval for illegal liquor)
यापुढे देखील पुणे विभागाचे राज्य उत्पादन शुल्क उप आयुक्त सागर धोमकर यांच्या आदेशानुसार अशा प्रकारच्या मोहिमा आखून अवैध दारू व्यवसायावर सातत्याने कारवाई करण्यात येणार असल्याचे पुणे विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक नरेंद्र थोरात यांनी दिली आहे.