whatsappicon
prajavarta logo
favicon

आपल्या शहरातील ताज्या बातम्या मिळवा मोफत

Install App

Kamshet Accident : पिकअप चालकाने वेळीच ब्रेक मारला असता तर त्यांचे प्राण वाचले असते; कामशेतमध्ये भीषण अपघात

तारीख : 02-07-2025श्रेणी :गुन्हेगारी

feature image
whatsapp

Murder Crime : ब्रेकींग! पवना धरण परिसरात किरकोळ कारणावरून १८ वर्षीय युवकाकडून एकाचा खून

तारीख : 03-07-2025श्रेणी :गुन्हेगारी

feature image

लोणावळा (Lonavala) : आईवरुन शिवीगाळ केल्याचा राग मनात धरून १८ वर्षीय तरुणाने एकाचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आज (गुरुवार दि. ३ जुलै) रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास ठाकूरसाई (ता. मावळ) हद्दीतील एका बंगल्यावर हा प्रकार घडला.  


दिनेश लक्ष्मण गरवड (वय ३६, रा. भाजे ता. मावळ) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी ज्ञानेश्वर लक्ष्मण गरवड (वय ४०, रा. भाजे ता. माव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी प्रणव विश्वजित डेका (वय १८ रा. चव्हाण नगर, वडगाव मावळ) याला अटक करून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत दिनेश गरवड आणि आरोपी हे एकाच ठिकाणी बंगल्यावर माळीकाम करत होते. परंतु मयत दिनेश याने दारू पिऊन आपल्या सोबत काम करणाऱ्या प्रणव याला आईवरून शिवीगाळ केली. याचाच राग मनात धरून आरोपीने दिनेशच्या डोक्यात लोखंडी कुदळ मारून त्याला जीवे ठार केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत आवारे हे करत आहेत. 

whatsapp

Vadgaon Crime : तळेगाव एमआयडीसी रस्त्यावर सापळा रचून कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या तीन गायी व दोन वासरांची सुटका

तारीख : 06-06-2025श्रेणी :गुन्हेगारी

feature image

वडगाव मावळ (Vadgaon Maval) : तळेगाव एमआयडीसी रस्त्यावर सापळा रचून कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या तीन गायी व दोन वासरांची सुटका करण्यात आली. बुधवारी (दि. ४ जून) रोजी रात्री सव्वा अकरा वाजल्याच्या नंतर सतर्क गोरक्षकांकडून ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींच्या ताब्यातील पिकअप टेम्पो, त्यामधील तीन गायी व दोन वासरे असा एकूण सहा लाखांचा मुद्देमाल वडगाव मावळ पोलिसांनी हस्तगत केला आहे. 


याप्रकरणी दर्शन संजय वहिले (वय ३०, रा. छत्रपती शिवाजी महाराज चौक, वडगाव मावळ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पिकअप चालक अमर बाळासाहेब पोखरकर (वय २७, रा. घाटकोपर वेस्ट मुंबई) आणि क्लिनर प्रशांत धोंडिराम पवार (वय २०, रा. घाटकोपर वेस्ट मुंबई) यांच्यावर वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, खेड येथून देहूरोड येथे कत्तलीसाठी पिकअप टेम्पोमधून गायी आणि वासरांची वाहतूक केली जाणार असल्याची गोपनीय माहिती फिर्यादी यांना बुधवारी (दि. ४ जून) रोजी रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास मिळाली. त्यानुसार त्यांनी त्यांचे गोरक्षक साथीदार विजय मनोहर फाटक, महेश काशिनाथ गायकवाड, शुभम संजय धडवले, अजय दत्तात्रय गाडे, श्रीयोग उर्फ आकाश साहेबराव वारुळे, योगेश संजय ढोरे (सर्व रा. वडगाव ता. मावळ) यांच्या समवेत एमआयडीसी रोड, वडगांव मावळ येथे सदर पिकअप अडवण्यासाठी सापळा रचला. यावेळी महिंद्रा पिकअप एम एच ०३ ईएस १११७) हीच्यावर त्यांचा संशय बळावला असता त्यांनी तो थांबविला. त्यामध्ये तीन गायी व दोन वासरे दाटीवाटीने व चारा-पाण्याची सोय न करता भरलेली आढळून आली. तसेच आरोपी वाहनचालक आणि क्लीनरची चौकशी केली असता त्यांनी सदर जनावरे कत्तलीसाठी घेऊन जात असल्याची कबुली दिली. त्यानंतर आरोपींसह पाच लाख रुपये किमतीचा पिकअप टेम्पो त्यामधील १ लाख रुपये किमतीची जनावरे असा एकूण सहा लाखाचा मुद्देमाल वडगाव मावळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. पुढील तपास वडगाव मावळ पोलीस करत आहेत.  

whatsapp

Maval Crime : खळबळजनक! मावळातील एका बड्या नेत्याची जमीन व्यवहारात “बनवाबनवी”

तारीख : 03-06-2025श्रेणी :गुन्हेगारी

feature image

लोणावळा (Lonavala) : मावळ तालुक्यात जमीन व्यवहारात झालेली फसवणूक ही काय नवीन घटना नाही. अनेकवेळा जमीन व्यवहारात अडकलेल्या आरोपींचे न्यान्यालयाने जामीनही फेटाळले आहेत. आता अशाच एका जमीन व्यवहारात मावळातील एक बडा नेता चांगलाच अडकल्याची बातमी समोर आली आहे. मावळ तालुका काँग्रेस (आय) पक्षाचे तालुकाध्यक्ष यांच्यावर जमीन व्यवहाराबाबत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. 


यशवंत रावजी मोहोळ (रा. तिकोना, ता. मावळ) असे गुन्हा दाखल झालेल्या तालुकाध्यक्षाचे नाव आहे. याप्रकरणी सुनील दिनदयाल गुप्ता (वय ५३, रा. भांगरवाडी, लोणावळा) यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.


लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुकाध्यक्ष मोहोळ यांनी फिर्यादीची फसवणुक करण्याच्या उद्देशाने त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या स्वतःच्या नावावर असलेली जमीन न दाखवता ठक्कर नावाच्या व्यक्तीच्या मालकीची पवना डॅम व्हीव व रस्त्यालगत असलेली जमीन दाखवली. व्यवहार करून फिर्यादीला  दिलेल्या जमिनीच्या खरेदीखतात दाखवलेल्या चर्तुः सिमा व नकाशाप्रमाणे जमीन दिल्याचे भासवले. प्रत्यक्षात मात्र दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर असलेली जमीन दाखवून त्यांचा विश्वासघात  करून आर्थिक फसवणुक केली. तसेच खरेदीखतात दिलेली जागा ही देखील फिर्यादीच्या आधी नथु केदारी (रा. अजिवली, ता. मावळ) यांना विसार पावतीद्वारे विकण्याचा प्रयत्न केला.


याबाबत फिर्यादी हे मोहोळ यांना जाब विचारण्यासाठी गेले असता त्यांनी फिर्यादीला शिवीगाळ करून ते राजकीय पक्षाचे नेते असल्याचे सांगून जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ हे करत आहेत.

whatsapp

Lonavala : गोरक्षकांची सतर्कता अन् पाळीव जनावरांना भूल देऊन पळवण्याचा कसायांचा डाव फसला

तारीख : 03-06-2025श्रेणी :गुन्हेगारी

feature image

कामशेत (Kamshet) : मावळ तालुक्यातील लोणावळा शहरालगत असलेल्या डोंगरगाव येथे पाळीव जनावरांना भूल देऊन पळवून नेण्याचा प्रयत्न कसायांनी केला. मात्र सतर्क गोरक्षक आणि नागरिकांनी कसायांचा हा धाव उधळून लावत तीन पाळीव जनावरांना जीवनदान दिले. रविवारी (दि. १ जून) पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

 

एक गाय व दोन बैल यांना भूल देण्यात आली असून या जनावरांवर उपचार सुरू आहेत. मागील काही दिवसात हिंदुराष्ट्र सेना व बजरंग दल संघटनेकडून कत्तलखान्यात घेऊन जाणाऱ्या अनेक जनावरांना जीवदान दिले होते. त्यामध्ये ५६ हजार टन गोमांस भरलेले दोन कंटेनर पकडण्यात आले होते.


स्थानिक नागरिकांनी जागरूक राहून आपल्या आजूबाजूला असे काही प्रकार घडत असतील तर गोरक्षकानां तत्काळ कळवावे असे आवाहन करण्यात आले आहे. या कारवाईसाठी सरपंच सुनिल येवले, संजय तिखे, दिनेश पाठारे, शैलेश धरपाळे, मयूर खैरे, अक्षय ठुले, संकेत निकम, हिंदुराष्ट्र सेना गोरक्षक चंद्रकांत बोंबले, माऊली आंद्रे, अजय शिळावणे, डॉ. सागर लोखंडे व शिवदुर्ग रेस्क्यू टिम सुनिल गायकवाड हे उपस्थित होते.

 

दिवस रात्र निःस्वार्थ भावनेने गोरक्षण करणे गोरक्षकांच्या जिवावर बेतत असताना देखील मावळचे गोरक्षक निर्भीड पणे कसायांना सामोरे जाऊन गोरक्षण करत आहेत. कसायांना तोडीस तोड उत्तर गोरक्षण करून गोरक्षक देत असल्याने त्याचा राग मनात धरून गोरक्षकांच्या जिवावर हे कसाई उठले आहेत. मावळमधील एका जरी गोरक्षकाच्या जीवाचे काही बरे वाईट झाले तर मावळ तालुका हे कदापी सहन करणार नाही. इतर ठिकाणी जसे मुक मोर्चे निघतात तसा मावळ तालुका काढणार नाही. तर संपूर्ण जग दखल घेईल असा तो मोर्चा असेल.
- अजय शिलवणे (गोरक्षक)

 

ग्रामीण भागामधून पुणे, मुंबई व जुन्नर यासारख्या ठिकाणांवर जनावरे कापण्यासाठी पाठवले जातात. परंतु या जनावरांना सुद्धा जगण्याचा अधिकार आहे. अशा तस्करीच्या अनेक घटना मावळ तालुक्यामध्ये घडत आहेत. मागच्या महिन्यामध्ये दोन कंटेनर भरून ५६ हजार टन गोमांस लोणावळ्यात पकडण्यात आले होते. तरीसुद्धा लोणावळ्यात आता भूल देऊन जनावरांना कापण्यासाठी नेण्याची शक्कल कसायांनी लढवली. परंतु गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे व स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे त्यांचे हे प्रयत्न निष्फळ होत आहेत.
- माऊली आंद्रे (गोरक्षक)

 

मावळ तालुक्यामध्ये गोमांस तस्करीचे व जनावरांना कत्तलीसाठी घेऊन जाण्याचे प्रकार अनेकदा उघडकीस आले आहेत. परंतु कसायांकडून जेवढे प्रयत्न झाले ते निष्फळ ठरले. यामुळे जर गोरक्षकांनाच लक्ष करून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला तर हिंदुराष्ट्र सेनेच्या वतीने त्यांना त्याच भाषेत उत्तर देण्यात येईल. त्यामुळे प्रशासनाने वेळेत याची दखल घ्यावी अन्यथा हिंदुराष्ट्र सेना याची दखल घेईल.
- चंद्रकांत बोंबले (तालुकाप्रमुख, हिंदुराष्ट्र सेना मावळ)
whatsapp

Lonavala News : दुर्दैवी! लोणावळा शहराजवळील वलवन धरणात बुडून १७ वर्षीय युवकाचा मृत्यू

तारीख : 31-05-2025श्रेणी :गुन्हेगारी

feature image

लोणावळा (Lonavala) : लोणावळा शहराजवळील वलवन धरणात बुडून एका सतरा वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. शुक्रवारी (दि. ३०) सायंकाळच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. सदर मुलाचा मृतदेह शिवदुर्ग मित्र, लोणावळा रेस्क्यू पथकाच्या मदतीने पाण्यातून बाहेर काढून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.


निलेश शिंदे (वय अंदाजे १७, रा. कासारवाडी, पुणे) पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. आपल्या १२ मित्रांबरोबर तो लोणावळा परिसर फिरण्यासाठी आला होता. त्यासाठी ते वरसोली येथून वलवण धरणाच्या मागील बाजूला गेले. आणि पोहण्याचा मोह अनावर झाल्याने ते पाण्यात उतरले परंतु पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने निलेश याचा पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाला.


घटनेची माहिती मिळताच शिवदुर्ग मित्र रेस्क्यू पथक सर्व साहित्यासह घटनास्थळी दाखल झाले. पाणबुडीच्या सहाय्याने शोध मोहीम राबवत मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. यासाठी शिवदुर्ग रेस्क्यू पथकातील वैभव दुर्गे, योगेश दळवी, मयूर दळवी, सागर दळवी, कपिल दळवी, आकाश मोरे, रोहित मोरे, महेश मसने, कुणाल कडू, महादेव भवर, पिंटू मानकर, सतीश सगर, सुनील गायकवाड यांनी अथक परिश्रम घेतले. पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करत आहेत.

whatsapp