तारीख : 16-07-2021श्रेणी :खेळ
तारीख : 02-02-2024श्रेणी :खेळ
वडगाव मावळ (Vadgaon Maval) : वडगावमध्ये लहान मुलांसाठी अल्पदरात साहसी मल्लखांब, रोप मल्लखांब, योगासने, बेसिक जिम्सॅटिक व इतर खेळ-व्यायामाचे प्रशिक्षण सुरू करण्यात येत आहे. मोरया प्रतिष्ठान, रमेश कुमार सहानी स्कूल व इंद्रायणी स्पोर्ट्स अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रशिक्षण घेण्यात येत आहे. मान्यवरांच्या उपस्थितीत नुकताच प्रशिक्षणाचा शुभारंभ करण्यात आला.
या मल्लखांब मैदानी खेळाची मुख्य शारिरीक वैशिष्ट्ये म्हणजे शारिरीक ताकद, लवचिकता, गती, एकाग्रता, उंची वाढवण्यासाठी या गोष्टींचा १४ वर्षांखालील मुलांमुलींचा शारीरिक व मानसिकदृष्ट्या विकास होण्यासाठी उपयुक्त अशा तज्ञ प्रशिक्षकांकडून शास्त्रशुद्ध पद्धतीने प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण दिले जाणार आहे.
याप्रसंगी मा. नगराध्यक्ष मयूर ढोरे, श्री. रमेशकुमार सहानी स्कूलचे संस्थापक राजेंद्र म्हाळसकर, राजेंद्र वहिले, नंदकुमार म्हाळसकर, अर्जुन ढोरे, सचिन ढोरे, प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अबोली ढोरे, गणेश जाधव, मा. नगरसेविका पुनम जाधव, चेतना ढोरे, इंद्रायणी अकादमीचे सचिन शिंदे आणि पालक विद्यार्थी आदींजण उपस्थित होते.
श्री. रमेश कुमार सहानी स्कूलच्या मैदानावर दररोज सायंकाळी सात ते आठ या वेळेत चौदा वर्षांखालील मुलांमुलींना अल्पदरात प्रशिक्षण दिले जाणार आहे. तरी शहरातील पालक वर्गाने आपापल्या मुलांच्या शारिरीक तंदुरुस्तीसाठी या प्रशिक्षणात सहभागी करावे, असे आवाहन मोरया महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अबोली ढोरे यांनी केले.
तारीख : 08-01-2024श्रेणी :खेळ
पवनानगर (Pawnanagar) : मावळ तालुका कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने व नामदार बाळासाहेब भेगडे स्नेह ग्रुप व पै. बाळासाहेब घोटकुले युवा मंचच्या वतीने माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळासाहेब भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मावळ केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत शिवली गावचा राष्ट्रीय खेळाडू विपुल नारायण आडकर याने मळवंडी ठुले गावच्या दिनेश ज्ञानेश्वर ठुले याचा पराभव करून मानाच्या मावळ केसरी कुस्ती किताबावर आपले नाव कोरले. तर तळेगावचा युवा मल्ल समर्थ गोवेकर याने जांभूळच्या सागर जांभूळकरचा पराभव करून कुमार मावळ केसरी तसेच सोमाटणेच्या सनम शेखने जांभूळच्या भक्ती जांभूळकरचा पराभव करून महिला केसरी किताब पटकावला.
अखिल भारतीय विद्यापीठ चॅम्पियन पै. चंद्रकांत सातकर व ऑलिंपिकवीर आणि शिवछत्रपती पुरस्कार सन्मानित पै. मारुती (आण्णा) आडकर यांच्या अध्यक्षतेखाली ही कुस्ती स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत मावळ तालुक्यातील सुमारे १९३ कुस्तीगीरांनी सहभाग घेतला. स्पर्धेचे उद्घाटन पै. मारुती (आण्णा) आडकर, राष्ट्रीय कुस्तीगीर पै.संभाजी राक्षे, भाजपा निवडणूक प्रमुख रवींद्र भेगडे, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब गुंड, मावळ तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पै. खंडू वाळूंज, धोंडिबा आडकर, स्पर्धा संयोजक व भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पै. बाळासाहेब घोटकुले, अखिल भारतीय विद्यापीठ चॅम्पियन पै. सचिन घोटकुले, पै. तानाजी कारके, शिवाजी येवले यांच्या हस्ते झाले.
बक्षीस समारंभ ट्रीपल महाराष्ट्र केसरी पै. विजय चौधरी, रुस्तम हिंद अमोल बुचडे, भारत केसरी विजय गावडे, पोलीस उपअधीक्षक राहुल आवारे, अर्जुनविर पुरस्कार विजेते काकासाहेब पवार, राष्ट्रीय उपाध्यक्ष विजय बराटे, युवा महाराष्ट्र केसरी किशोर नखाते,माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी, माजी सभापती एकनाथराव टिळे, युवा मोर्चा मावळ तालुका अध्यक्ष नितीन मराठे, सभापती गुलाबराव म्हाळसकर, उपसभापती शांताराम कदम, किरण राक्षे, माजी पंचायत समिती सदस्य दत्तात्रय माळी, सरपंच कुलदीप बोडके, उपसरपंच योगेश राक्षे, तसेच महिला भाजपा तालुका अध्यक्ष सायली बोत्रे, राणी म्हाळसकर, माजी उपसभापती कल्याणी ठाकर, सुमित्रा जाधव, सरपंच सुवर्णा घोटकुले तसेच मावळ तालुक्यातील सर्व मान्यवर व आजी माजी पैलवान उपस्थित होते.
- स्पर्धेचा अंतिम निकाल पुढीलप्रमाणे -
१४ वर्षाखालील बाल गट
२२ किलो : चेतन चिमटे (कुसवली), जयेश गायकवाड (उर्से)
२५ किलो : श्रवण बोडके (गहुंजे), आर्यन सातकर (कान्हे)
२८ किलो : ओम पवार (काले), अनुज डुकरे (सोमाटणे)
३२ किलो : स्वराज बोडके (गहुंजे)
३५ किलो : मयुर सुपे (माळेगांव), राजवर्धन घारे (बेबडओहोळ)
३८ किलो : अथर्व गोपाळे (शिरगाव)
४२ किलो : इंद्रजित जांभूळकर (तळेगाव), साईनाथ ठाकर (येळसे)
१७ वर्षाखालील कुमार गट
४५ किलो : वेदांत भोईर (आढले खुर्द), यश भालेकर (धामणे)
४८ किलो : कार्तिक आडकर (शिवली), स्वराज पाटील (सोमाटणे)
५१ किलो : धिरज शिंदे (उर्से), समीर ननावरे (टाकवे बुद्रुक)
५५ किलो : तेजस कारके (आढे), शौर्य गोपाळे (शिरगाव)
६० किलो : युवराज सातकर (कान्हे), दर्शन मोरमारे (वडेश्वर)
६१ ते ८० किलो कुमार केसरी गट : समर्थ गोवेकर (तळेगाव),
सागर जांभूळकर (जांभूळ)
- वरिष्ठ विभाग -
५७ किलो : सिध्देश वाघोले (दारुंब्रे), आकाश कालेकर (काले)
६१ किलो : अभिषेक हिंगे (पिंपळखुंटे), रोहन जगताप (कशाळ)
६५ किलो : साहिल शेळके (कडधे), दिपक कालेकर (काले)
७० किलो : प्रतिक येवले (गोडूंब्रे), ओंकार भोते (परंदवडी)
७१ ते १२५ किलो (मावळ केसरी गट)
विपुल आडकर (शिवली)
दिनेश ठुले (मळवंडी ठुले)
- महिला विभाग -
२८ ते ३२ किलो : ईश्वरी झुंझुरके (सोमाटणे), मुग्धा वाघोले (दारुंब्रे)
३३ ते ३५ किलो : आस्मी लोणारी (तळेगाव), समिक्षा तिकोणे (पाटण)
३८ ते ४२ किलो : खुशी बोडके (गहुंजे), आराध्या भेगडे (तळेगाव)
४३ ते ४६ किलो : अनुष्का दहिभाते (बेडसे), हर्षदा बोडके (गहुंजे)
४७ ते ५२ किलो : सिध्दी दाभाडे (तळेगाव), अक्षरा वाडेकर (डोणे)
५५ ते ७२ किलो (महिला केसरी गट) : सनम शेख (शिरगाव),
२) भक्ती जांभूळकर (जांभूळ)
मावळ केसरी विजेत्या खेळाडूस स्व. पै. सचिनभाऊ शेळके यांच्या स्मरणार्थ शेळके परिवाराच्या वतीने चांदीची गदा तसेच कुमार केसरी विजेत्या खेळाडूस भारतीय जनता पक्ष प्रदेश सचिव जितेंद्र बोत्रे यांच्या वतीने चांदीची गदा, महिला केसरी विजेत्या खेळाडूस पै. सचिनभाऊ शेळके स्मरणार्थ समस्त शेळके परिवार यांच्या वतीने चांदीची गदा तसेच विजेता व उपविजेता यांस उपसरपंच योगेश राक्षे यांच्या वतीने भव्य चषक देण्यात आले. तसेच कुस्ती स्पर्धेतील प्रत्येक गटातील विजेत्यांना सायकल व रोख रक्कम, द्वितीय क्रमांकास चषक व रोख रक्कम बक्षीस देण्यात आले.
यावेळी बाबूलाल गराडे व हरीश घारे यांनी सूत्रसंचालन केले व पैलवान चंद्रकांत सातकर म्हणाले, आजपर्यंत एवढी मोठी मावळ केसरी कुस्ती स्पर्धा झाली नव्हती. मा.राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी आपलं मनोगत व्यक्त केले. सर्व विजयी पैलवानांना शुभेच्छा देऊन आगामी काळात चमकदार कामगिरी करणाऱ्या पैलवान यांना चांगल्या ठिकाणी नोकरी देण्याच्या आश्वासन बाळा भेगडे यांनी दिले. त्यानंतर सर्व स्पर्धक आणि सर्व पाहुण्यांचे आभार बाळासाहेब घोटकुले यांनी मानले. पंच म्हणून आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच रोहिदास आमले, राष्ट्रीय पंच संदीप वांजळे, ॲड.पप्पू कालेकर, निलेश मारणे, प्रविण राजीवडे, विजय कुटे, राकेश सोरटे, भानुदास घारे, सुरेश आडकर व समीर शिंदे यांनी काम पाहिले.
तारीख : 30-11-2023श्रेणी :खेळ
देहू (Dehu) : स्व. प्रशांतदादा जगताप स्पोर्ट्स फाऊंडेशन व साई ग्रुप देहु यांच्या वतीने श्री क्षेत्र देहू येथे आयोजित करण्यात आलेल्या 'आमदार चषक-फुल पिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा' बक्षीस वितरण समारंभ नुकताच पार पडला. यावेळी आमदार सुनील शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना सायकल व स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले
क्रिकेट स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे विजेते आदिश्री इलेव्हन पिंपरी-चिंचवड, उप विजेते नायरा इलेव्हन वराळे व सर्व विजेत्या खेळाडूंना आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते पारितोषिक देऊन आमदार शेळके यांनी त्यांचे अभिनंदन केले.
याप्रसंगी आमदार सुनील शेळके, नगराध्यक्षा पूजा दिवटे, उपनगराध्यक्ष सुधीर काळोखे, प्रकाश हगवणे, कांतीलाल काळोखे, बाळासाहेब काळोखे, राजेंद्र काळोखे, दिलीप काळोखे, बेबीताई हगवणे, देहू नगरपंचायत सर्व नगरसेवक, आजी-माजी पदाधिकारी तसेच आमदार सुनिल आण्णा शेळके युवा मंचचे सहकारी उपस्थित होते.
तारीख : 20-10-2023श्रेणी :खेळ
तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) : गिर्यारोहकांच्या साहसाला आव्हान देणारा महाराष्ट्रातील सर्वात अवघड असलेला तीनशे फूट उंचीच्या वजीर सुळक्यावरून मावळचे आमदार सुनिल शेळके यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या. पॉईंट ब्रेक ॲडवेंचर ग्रुपच्या मार्गदर्शनाखाली नऊ वर्ष वयाच्या कु. साई नारायण मालपोटे, आठ वर्ष वयाची कु. ध्रुवी गणेश पडवळ आणि विशाल गोपाळे यांनी वजीर सुळका सर करुन अनोख्या पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
या मोहिमेत नारायण मालपोटे, नितीन पिंगळे, प्रकाश वरघडे, अजित गोपाळे, पांडुरंग जाचक, बनी शिंदे, राजश्री चौधरी, समीर भिसे, विवेक सूर्यवंशी, शुभम अहिरे, अक्षय ठाकरे, रोहित पगारे, तेजस जाधव यांनी सहभाग घेऊन मोहीम यशस्वीपणे पार पाडली.
बुद्धिबळाच्या पटावर जसा वजीर असतो तसा हा सुळका दिमाखात उभा आहे. हा उंच सुळका सर करण्याचे प्रत्येक गिर्यारोहकाचे स्वप्न असते. ठाणे जिल्ह्यातील शहापूर विभागात माहूली किल्ला आहे. याच परिसरात असलेल्या तीनशे फूट उंचीच्या वजीर सुळका गिर्यारोहणासाठी अतिकठीण श्रेणीत गणला जातो. त्याच्या पायथ्याशी पोहोचण्यासाठी वांद्रे गावातून तीन तासाची दमछाक करणारी पायपीट करावी लागते. दुर्गम परिसर, उंच टेकड्या, घनदाट जंगल आणि पाठीवर ओझे असा प्रवास करून त्यानंतर वजीर सुळक्याची अडीचशे फुटांची नव्वद अंशातील सरळ उभी अतिकठीण चढाई करावी लागते.
शारीरिक आणि मानसिकतेचा कस पाहणारी मोहीम म्हणून वजीर मोहिमेकडे पाहिले जाते. परंतु हा अवघड वजीर सुळका सर करुन आमदार सुनिल शेळके यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याचे ध्येय उराशी बाळगून जिद्द, चिकाटी आणि साहसाच्या जोरावर या धडाकेबाज गिर्यारोहकांनी आमदार शेळके यांना अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत.
तारीख : 24-08-2023श्रेणी :खेळ
वडगाव मावळ (Vadgaon Maval) : शहरातील वाढती लोकसंख्या व नागरीकरण लक्षात घेता नागरिक महिला, विद्यार्थी, कामगार, जेष्ठ नागरिक व सर्वसामान्य जनतेची होणारी अडचण लक्षात घेऊन त्यांचा प्रवास सोपा व्हावा या हेतूने खंडोबा चौक येथे जय मल्हार ॲटो रिक्षा संघटनेची स्थापना करण्यात आली. आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते या संघटनेचे उद्घाटन करण्यात आले.
या उद्घाटन प्रसंगी वडगाव नगरपंचायतचे नगराध्यक्ष मयुर ढोरे, नगरसेवक राजेंद्र कुडे, मंगेश खैरे, नगरसेविका पुजा वहिले, राष्ट्रवादी काँग्रेस वडगाव शहर अध्यक्ष प्रविण ढोरे, तुषार वहिले, अफताब सय्यद, शैलेश वहिले, सौरभ सावले, संतोष देशमुख, आप्पा तुमकर आदी उपस्थित होते.
संघटनेचे संस्थापक मा. उपसरपंच विशाल वहिले असून अध्यक्षपदी योगेश भोकरे यांची निवड करण्यात आली आहे. तर विनायक लंके, संतोष धोंगडे, प्रदिप जोगदंड, ओंकार धोंगडे, किरण गावडे, अमोल पवार, कैलास फाटक, पांडुरंग कचरे हे सभासद आहेत.