तारीख : 12-05-2025श्रेणी :शिक्षण
तारीख : 06-05-2025श्रेणी :शिक्षण
पवनानगर (Pawnanagar) : येथील लायन्स शांता माणेक पवना आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजने आपली १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. तीनही विभागात मुलींनी बाजी मारली आहे. कॉलेजमधून १३७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १३४ उत्तीर्ण झाले आहेत. कॉलेजचा सरासरी निकाल ९७.८१ टक्के निलाल लागला असून सायन्स कॉलेजचा सलग चौथ्या वर्षी १०० टक्के निकाल लागत असल्याची माहिती पवना शिक्षण संकुलाचे प्राचार्य भाऊसाहेब आगळमे यांनी दिली.
निकाल खालीलप्रमाणे (कसांत टक्केवारी)
वाणिज्य विभाग - ९८.५१ टक्के
१) तुपे दिक्षा गोपाळ - ८४.६७ टक्के
२) मोहोळ अर्पिता हरिश्चंद्र - ७९.८३ टक्के
३) सुतार श्वेता शशिकांत - ७६.६७ टक्के
कला विभाग - ९३.३३ टक्के
१) यादव श्रेया राजू - ८२.५० टक्के
२) तुपे सायली बाळू - ७०.६७ टक्के
३) अल्हाट समिक्षा भाऊ - ७० टक्के
सायन्स विभाग - १०० टक्के
१) दळवी समृद्धी बाळासाहेब - ७४.१७ टक्के
२) अहिर किशन काळूराम - ६५.१७ टक्के
३) लोहर चैतन्य विजय - ६१ टक्के
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे परिसरातुन कौतुक होत आहे. नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे, संस्थेचे सचिव व पवना शिक्षण संकुलाचे अध्यक्ष संतोष खांडगे, उपाध्यक्ष गणेश खांडगे, सहसचिव नंदकुमार शेलार खजिनदार राजेश म्हस्के यांनी यशस्वी विद्यार्थी व संकुलाचे प्राचार्य भाऊसाहेब आगळमे, पर्यवेक्षिका अर्चना शेडगे, शहाजी लाखे यांच्यासह विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या प्राध्यापक सर्वांचे अभिनंदन केले.
तारीख : 11-04-2025श्रेणी :शिक्षण
तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) : मंथन राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झालेला असून या परीक्षेत नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संचलित पैसाफंड प्राथमिक शाळेतील इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे.
या परीक्षेत इयत्ता दुसरीच्या वर्गातील कु. ईश्वरी अरविंद गुरव या विद्यार्थिनीने राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत पाचवा क्रमांक प्राप्त केला. तर पुणे विभागात जिल्हास्तरीय यादीत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. तसेच कु. दिशा तुषार पाटील या विद्यार्थिनीने राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत सातवा क्रमांक तसेच पुणे विभाग जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे.
तर प्रियश शरद फडतरे या विद्यार्थ्याने राज्य स्तरीय गुणवत्ता यादीत नववा क्रमांक तसेच पुणे विभाग जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत चौथा क्रमांक प्राप्त केला आहे. तसेच इयत्ता पहिलीतील विद्यार्थिनी कु. गौरी सुशील चव्हाण या विद्यार्थिनीने राज्य गुणवत्ता यादीत आठवा क्रमांक तसेच पुणे जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. या विद्यार्थ्यांना इयत्ता दुसरीच्या वर्गशिक्षिका पल्लवी जगताप व इयत्ता पहिलीच्या वर्ग शिक्षिका आशा लबडे या शिक्षकांनी मार्गदर्शन केले. या चारही विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशामुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा पुन्हा रोवला आहे.
नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, सचिव संतोष खांडगे, उपाध्यक्ष गणेश खांडगे, सहसचिव नंदकुमार शेलार, खजिनदार राजेश म्हस्के, संस्थेचे ज्येष्ठ संचालक सोनबा गोपाळे, महेशभाई शहा, शालेय समिती अध्यक्ष विनायक अभ्यंकर तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता लादे यांनी या विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
गुणवत्ता धारक विद्यार्थी पुढीलप्रमाणे - कंसात मिळविलेले गुण
इयत्ता दुसरी
▪️ ईश्वरी अरविंद गुरव - १४२ /१५०
(राज्यात पाचवा व जिल्ह्यात प्रथम)
▪️ दिशा तुषार पाटील - १३८/१५०
(राज्यात सातवा व जिल्ह्यात दुसरा)
▪️ प्रियश शरद फडतरे - १३४/ १५०
(राज्यात नववा व जिल्ह्यात चौथा)
इयत्ता पहिली
▪️ गौरी सुशील चव्हाण- १३६/१५०
(राज्यात आठवा व जिल्ह्यात तिसरा)
तारीख : 27-02-2025श्रेणी :शिक्षण
लोणावळा (Lonavala) : मराठी भाषेचा इतिहास अडीच हजार वर्षांपूर्वी पासूनचा आहे. संतापासून ते छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत मराठी भाषेत मोठ्या प्रमाणात ग्रंथ निर्मिती झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यकारभरात मराठी भाषेला अग्रक्रम दिला आहे, असे मत लोणावळा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र देशमुख यांनी व्यक्त केले.
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त लोणावळा महाविद्यालयाचा मराठी विभाग, ग्रंथालय विभाग, सांस्कृतिक विभाग आणि कनिष्ठ महाविद्यालय यांच्या वतीने ग्रंथदिंडी व मराठी स्वाक्षरी मोहीम या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्राचार्य डॉ. नरेंद्र देशमुख बोलत होते.
लोणावळा शिक्षण संस्थेचे विश्वस्त व युवा उद्योजक सुनील ठोंबरे यांच्या शुभहस्ते ग्रंथदिंडीचे पूजन व शुभारंभ करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर नारायण पाळेकर, परीक्षा विभाग व मराठी विभाग प्रमुख डॉ. राजेंद्र देवरे, डॉ. धनराज पाटील, ग्रंथालय प्रमुख चांगुणा ठाकर-येवले, प्रा. भक्ती अहीर, डॉ. अमर काटकर, डॉ. नितीन बोडके, डॉ. संदीप सोनटक्के, प्रा. भारती देशमुख, प्रा. अनी वर्गीस, डॉ. रंजुबाला चोपडा, प्रा. योगिता मोरे, डॉ. संदीप पोकळे, डॉ. श्रीकांत होगले, प्रा. संदीप लबडे, डॉ. पवन शिनगारे, डॉ. मल्हारी नागटिळक, डॉ. दीपक कदम, प्रा. संजय साळुंखे, प्रा. रोहन वर्तक, प्रा. गणेश आखाडे, प्रा. अमोल नवघिरे, प्रा. समीर गायकवाड, प्रा. पल्लवी तिखे, तेजस भांगरे, राकेश साळुंखे, रवींद्र उंबरे, वलवण गावच्या पोलीस पाटील अर्चना देशमुख, विलास इंगुळकर, दीपक राक्षे, उल्हास पाळेकर आदी उपस्थित होते.
डॉ. देशमुख म्हणाले, कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचे मराठी साहित्यातील योगदान मोलाचे आहे. त्यामुळे त्यांच्या जन्मदिवशी मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेमध्ये ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहून मराठी भाषेचा खऱ्या अर्थाने विस्तार करण्याचे अनमोल कार्य केले आहे. सर्व संतानी मराठी भाषेतून ग्रंथनिर्मिती करून येथील समाजाचे एकप्रकारे प्रबोधन करण्याचे काम केले.
छत्रपती शिवाजी महाराजांनीही मराठी भाषेला आपल्या राज्यकारभारात राज्यकारभाराची भाषा म्हणून मान्यता दिली होती. आज याच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. यापुढे शिक्षण क्षेत्रातील सर्व विद्याशाखामध्ये मराठी भाषेचा वापर वाढणार असल्याने हि मराठी भाषिकांच्या दृष्टीने गौरवास्पद बाब आहे.
या कार्यक्रमासाठी तसेच विद्यार्थी, विद्यार्थिनी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. संतोष शिंदे यांनी केले. डॉ. धनराज पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संदीप खाडे यांनी केले.
तारीख : 24-01-2025श्रेणी :शिक्षण
तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) : अभियांत्रिकी क्षेत्र हे झपाट्याने बदलत असून, एआय, डेटा मायनिंग अँड मशीन लर्निंग, सॉफ्ट कंप्यूटिंग, सिग्नल अँड इमेज प्रोसेसिंग या क्षेत्रात विद्यार्थ्यांना रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होत आहेत. रोबोटीक क्षेत्राच्या माध्यमातून जग प्रचंड बदलत आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी आवश्यक कौशल्ये आत्मसात केल्यास मोठा रोजगार उपलब्ध होणार आहे, असे प्रतिपादन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. सुनील भिरूड यांनी केले.
इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालयाच्या बारावी विज्ञान शाखेच्या समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. भिरूड बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे होते. यावेळी संस्थेचे सदस्य संदीप काकडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. संदीप भोसले, विज्ञान शाखेचे प्रमुख प्रा. उत्तम खाडे, प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, क्रीडा, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात देदीप्यमान कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
भिरूड म्हणाले, की तंत्रज्ञान माणसाला नवीन दिशा देणारे असते. त्यात नवीन शैक्षणिक धोरणाने भर घातल्यामुळे आणि तंत्रज्ञानाला ए आय ची जोड मिळाल्याने भविष्यातील तंत्रज्ञान हे विचाराच्या पलीकडे असेल. जीवनाच्या परिवर्तनाचा मार्ग हा अभियांत्रिकी शिक्षणातून जात आहे. इंद्रायणी महाविद्यालयाने इंजिनिअरिंग महाविद्यालय सुरू करून आपल्या नावलौकिकात भर घातल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. समृद्ध महाविद्यालयाच्या परंपरेत इंद्रायणी महाविद्यालयाचे नाव उल्लेखनीय असल्याचेही त्यांनी सांगितले.
चंद्रकांत शेटे यांनी मावळ तालुक्यातील गोरगरीब विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगचे दर्जेदार शिक्षण मिळावे, या हेतूने आम्ही प्रयत्नशील होतो. पुढच्या वर्षी इंद्रायणी महाविद्यालयामध्ये अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू होत असून, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन केले.
प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी प्रास्ताविक करताना संस्थेच्या नावलौकिकात भर पडेल असेच विद्यार्थी महाविद्यालयामध्ये घडवले जात असल्याची भावना व्यक्त करून नुकत्याच पार पडलेल्या खो-खो स्पर्धेत इंद्रायणी महाविद्यालयाच्या प्रियंका इंगळे या माजी विद्यार्थिनीने केलेल्या दैदीप्यमान कामगिरीचे वर्णन करत बारावीच्या परीक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, 'वाचन संकल्प महाराष्ट्राचा' या शासनाच्या अभिनव उपक्रमांतर्गत 'पुस्तक परीक्षण'च्या निमित्ताने घेण्यात आलेल्या स्पर्धेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरवही यावेळी करण्यात आला. महाविद्यालयाने घेतलेल्या पुस्तक वाचन स्पर्धेत सहाशेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, कार्यवाहक चंद्रकांत शेटे यांनी बारावीच्या परीक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. शिक्षिका दीप्ती कन्हेरीकर व विद्यार्थ्यांनी सूत्रसंचालन, तर उपप्राचार्य प्रा. संदीप भोसले यांनी आभार मानले.
तारीख : 23-01-2025श्रेणी :शिक्षण
कामशेत (Kamshet) : २००४ ची एस. एस . सी परीक्षा दिल्यानंतर वेगळे झालेले शालेय मित्र एकवीस वर्षांनी पुन्हा एकत्र भेटले. त्यासाठी निमित्त बनले स्नेहमेळाव्याचे. कामशेत येथील पंडित नेहरू विद्यालयामधील २००३-२००४ मध्ये दहावी उत्तीर्ण झालेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा नुकताच संपन्न झाला.
यावेळी माजी विद्यार्थ्यांच्या वतीने मुख्याध्यापिका साबळे मॅडम, माजी प्राचार्य भसे सर, कडाळे सर, दहितुले सर, माळी सर, मोरे सर, शेलार सर, वाडिले मॅडम, जाधव मॅडम, वाघ मॅडम आदी शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थांनी शालेय जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा दिला. गप्पांची मैफल रंगली. या मैफिलीत अनेक विद्यार्थी भावूक झाले होते. माजी विद्यार्थ्यांकडून शाळेला उपयोगी साहित्य भेट देण्यात आले. स्नेहसंमेलनाचे आकर्षण शाळेच्या आठवणींना उजाळा देणारी प्रा. ज्ञानेश्वर गायखे यांनी रेखाटलेली रांगोळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.
सूरज वाळके, युवराज शिंदे, योगेश चोपडे आदी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. ज्ञानेश्वर गायखे व स्मिता रोढे यांनी सूत्रसंचालन केले. शीतल फाटक यांनी आभार मानले. तर भास्कर काटकर, विकास ननावरे, अनिल इंगवले, सुनील गायखे, श्रीकांत ठाकुरदेसाई, संदीप जाधव, रिचा जैन, सुप्रिया कुसाळकर, ज्योती हेंद्रे आदींनी संयोजन केले.