whatsappicon
prajavarta logo
favicon

आपल्या शहरातील ताज्या बातम्या मिळवा मोफत

Install App

Karla Crime : कार्ला येथे किरकोळ कारणावरून पर्यटकाचा खून, दोनजण जखमी; नऊ जणांवर गुन्हा, दोघांना अटक

तारीख : 29-05-2025श्रेणी :गुन्हेगारी

feature image
whatsapp

Lonavala News : दुर्दैवी! लोणावळा शहराजवळील वलवन धरणात बुडून १७ वर्षीय युवकाचा मृत्यू

तारीख : 31-05-2025श्रेणी :गुन्हेगारी

feature image

लोणावळा (Lonavala) : लोणावळा शहराजवळील वलवन धरणात बुडून एका सतरा वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. शुक्रवारी (दि. ३०) सायंकाळच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. सदर मुलाचा मृतदेह शिवदुर्ग मित्र, लोणावळा रेस्क्यू पथकाच्या मदतीने पाण्यातून बाहेर काढून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.


निलेश शिंदे (वय अंदाजे १७, रा. कासारवाडी, पुणे) पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. आपल्या १२ मित्रांबरोबर तो लोणावळा परिसर फिरण्यासाठी आला होता. त्यासाठी ते वरसोली येथून वलवण धरणाच्या मागील बाजूला गेले. आणि पोहण्याचा मोह अनावर झाल्याने ते पाण्यात उतरले परंतु पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने निलेश याचा पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाला.


घटनेची माहिती मिळताच शिवदुर्ग मित्र रेस्क्यू पथक सर्व साहित्यासह घटनास्थळी दाखल झाले. पाणबुडीच्या सहाय्याने शोध मोहीम राबवत मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. यासाठी शिवदुर्ग रेस्क्यू पथकातील वैभव दुर्गे, योगेश दळवी, मयूर दळवी, सागर दळवी, कपिल दळवी, आकाश मोरे, रोहित मोरे, महेश मसने, कुणाल कडू, महादेव भवर, पिंटू मानकर, सतीश सगर, सुनील गायकवाड यांनी अथक परिश्रम घेतले. पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करत आहेत.

whatsapp

Expressway Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेसवर पिकअपची पंक्चर काढणाऱ्या दोघांना भरधाव मिक्सरने चिरडले

तारीख : 31-05-2025श्रेणी :गुन्हेगारी

feature image

कामशेत (Kamshet) : मुंबई-पुणे एक्सप्रेसवर पिकअपची पंक्चर काढणाऱ्या दोघांना भरधाव मिक्सरने चिरडल्याची घटना घडली. आज (शनिवार दि. ३१) रोजी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास किमी ६७/७०० ताजे (ता. मावळ) गावच्या हद्दीत हा अपघात घडला. अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून मिक्सर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


अजय कन्हैयालाल यादव (वय २५, वर्षे रा. मुंबई, कुर्ला गार्डन) आणि अफजल मुर्तुजा खान (वय ३९, रा. बजुरामपुर उत्तरप्रदेश) अशी अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी पिकअपचालक राकेशकुमार नेतप्रसाद यादव (वय ३१, कुर्ला गार्डन मुंबई) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अशोक लेलंड कंपनीचा मिक्सर (MH 46 BS 5697) वरील चालक राजेश यादव (वय ३०, रा. उत्तरप्रदेश) याच्यावर कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरून मुंबईच्या दिशेने प्रवास करत असताना त्यांची ताब्यातील पिकअप टेम्पो (MH 01 DR 7567) हा ताजे (ता. मावळ) गावच्या हद्दीत पंक्चर झाला. फिर्यादीने टेम्पो रस्त्याच्या कडेला उभा करून त्यांचे दोन सहायक अजय व अफजल पंक्चर काढत होते तर फिर्यादी हे पाठीमागून येणाऱ्या वाहनांना दूर राहण्यासाठी इशारा करत होते. मात्र यावेळी पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या अशोक लेलंड (सिमेंट काँक्रीट मिक्सर) टेम्पोवरील चालकाने फिर्यादीच्या चेतावणी इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून फिर्यादीच्या पिकअपला पाठीमागून धडक दिली.


या अपघातात पिकअपच्या उजव्या बाजुला चाक खोलत असलेल्या  अजय कन्हैयालाला यादव आणि अफजल मुर्तुजा खान या दोघांना ट्रकने चाकाखाली फरफटत चिरडत घेऊन गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे या अपघातास, दोघांच्या मृत्यूस तसेच फिर्यादीचा पिकअप टेम्पो व त्यातील बॉयलर कोंबड्यांच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याप्रकरणी मिक्सर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास कामशेत पोलीस करत आहेत. 

whatsapp

Kamshet Crime : ब्रेकिंग! मावळातून पावणे तीन लाखांचे ज्वलनशील केमिकल व पांढऱ्या रॉकेलचा साठा जप्त; कामशेत पोलिसांची कामगिरी

तारीख : 30-05-2025श्रेणी :गुन्हेगारी

feature image

कामशेत (Kamshet) : मावळातून पावणे तीन लाखांचे ज्वलनशील केमिकल व पांढऱ्या रॉकेलचा साठा जप्त करण्यात आला. बुधवारी (दि. २९) रोजी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास मुंढावरे (ता. मावळ) गावच्या हद्दीतील इंद्रायणी ढाब्याच्या पाठीमागील मोकळ्या जागेत छापा टाकून ही कारवाई करण्यात आली. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कामशेत पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुंढावरे गावात इंद्रायणी ढाब्याच्या पाठीमागील मोकळ्या जागेत केमीकलचा व पांढऱ्या रॉकेलचा अवैध साठा केल्याची गोपनीय माहीती मिळाली होती. त्यानुसार बुधवारी (दि. २९) रोजी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास त्याठिकाणी पोलीस पथक, पंच व पुरवठा निरीक्षक तनपुरे यांच्या पथकाने छापा टाकला. तेथे २८ बैरैलमध्ये २ लाख ८८ हजार ६०० रुपये किमतीचे अंदाजे ४ हजार ८१० लीटर ज्वलनशिल केमीकल सदुष्य द्रव्य तसेच पांढरे रॉकेल सदृश्य पदार्थ असे बेकायदेशीररित्या साठा करून  ठेवल्याचे आढळले. सदरचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आला असून  आरोपी महेंद्र काळुराम चौधरी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील हे करत आहेत.  


सदरची कामगिरी ही पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली कामशेत पोलीस ठाण्याचे  पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील तसेच सहा. पोलीस निरीक्षक सतिष पाटील, सहा. फौजदार नितेंद्र कदम, पोलीस हवालदार समिर करे, गणेश तावरे, पो. कॉ. प्रतिक काळे, गणेश ठाकुर, पोकॉ निशा लालगुडे यांच्या पथकाने केली.

whatsapp

Lonavala Crime : लोणावळ्यातील सुप्रसिद्ध डॉ. खंडेलवाल यांच्या घरावर चौथ्यांदा सशस्त्र दरोडा; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन दरोडेखोर पसार

तारीख : 28-05-2025श्रेणी :गुन्हेगारी

feature image

लोणावळा (Lonavala) : गेल्या चार वर्षांपासून लोणावळ्यातील सुप्रसिद्ध डॉ. खंडेलवाल यांच्या घरावर सातत्याने दरोड्याची घटना घडत असून याहीवर्षी चोरट्यांनी त्यांच्या बंगल्याला लक्ष केले. मंगळवारी (दि. २७) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी सशस्त्र दरोडा टाकून तब्बल साडेअकरा लाखांचा मुद्देमाल चोरून नेला. 


चौथ्यांदा त्यांच्या बंगल्यात चोरट्यांनी हातसफाई केल्यामुळे कुटुंबियांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. विशेष म्हणजे यावेळी उपस्थित पोलिसांच्या हातावर तुरी देऊन चोरटे सहिसलामत पसार झाल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक वर्षांपासून सुप्रसिद्ध ज्येष्ठ डॉ. हिरालाल खंडेलवाल हे प्रधान पार्क येथील त्यांच्या ॐ श्री बंगल्यावर वास्तव्यास आहे. मंगळवारी (दि. २७) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास दरोडेखोरांनी लोखंडी ग्रीलसह जवळपास पाच ते सहा दरवाजे तोडून घरात प्रवेश केला. बंगल्याच्या वॉचमन आणि त्यांच्या पत्नीला मारहाण करून दोरीने बांधले. त्यानंतर डॉ. खंडेलवाल आणि त्यांच्या पत्नीला हातपाय बांधून, तलवार, कुकरी, दांडके दाखवून जीवे मारण्याची धमकी देत घरातील सोन्याचे, डायमंडचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ११.५० लाख रुपयांचा ऐवज लुटला.


दरम्यान, हा दरोडा सुरू असताना, डॉ. खंडेलवाल यांच्या पुतण्याने लोणावळा पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर अवघ्या १० मिनिटांत पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी बंगल्यातून बाहेर पडलेले दरोडेखोर आणि पोलिसांची गाडी यांच्यात फक्त ५ ते १० फुटांचे अंतर होते. पोलिसांनी काही अंतर दरोडेखोरांचा पाठलागही केला, परंतु एकही दरोडेखोर पोलिसांच्या हाती लागला नाही. उपस्थित पोलिसांच्या हातावर तुरी देऊन चोरटे सहिसलामत पसार झाल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. 

whatsapp

Talegaon Crime : इंद्रायणी हॉटेलसमोर विधीसंघर्षीत बालकांचा राडा; धारदार शस्त्रांचे वार-दगडफेकीत दोनजण जखमी

तारीख : 28-05-2025श्रेणी :गुन्हेगारी

feature image

तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) : दोन दिवसांपूर्वी फोनवर झालेल्या वादातून विधिसंघर्षित बालकांकडून दोघांवर धारदार शस्त्रांचे वार करत दगडफेक करण्यात आली. रविवारी (दि. २७ मे) रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास जुन्या मुंबई-पुणे हायवेवरील इंद्रायणी हॉटेल समोर, तळेगाव दाभाडे (ता. मावळ) येथे ही घटना घडली. 


याप्रकरणी विधीसंघर्षीत बालक (रा. शिंदे वस्ती सोमाटणे फाटा, ता. मावळ) याने फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी विधीसंघर्षीत बालक व त्याचे ३ मित्र सर्वांचे वय (अंदाजे १६ ते १७ वर्ष) यांच्यावर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व विधीसंघर्षीत बालके यांच्यात दोन दिवसांपूर्वी फोनवर वाद झाला. त्याच वादाच्या रागातून आरोपी हर्षल व त्याचे ३ मित्र सर्वांचे वय (अंदाजे १६ ते १७) यांनी इंद्रायणी हॉटेल समोर येऊन फिर्यादीला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने  धारदार हत्याराने डोक्यात वार करण्याचा प्रयत्न केला, परंतु फिर्यादीने डोक्याजवळ हात अडवा केल्याने फिर्यादीच्या हाताला दुखापत झाली. तसेच फिर्यादी व त्याचा मित्र आदित्य अमर कोळी याच्यावर देखील धारदार शस्त्राने वार करून त्याला जखमी केले. तसेच आरोपीसोबतच्या तिघांनी फिर्यादी व त्याच्या मित्राला हाताने मारहाण करून शिवीगाळ करून तसेच दगड फेकुन जखमी केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलीस करत आहेत. 

whatsapp