तारीख : 04-05-2025श्रेणी :मनोरंजन
तारीख : 23-02-2025श्रेणी :मनोरंजन
पवनानगर (Pawnanagar) : मावळ तालुक्यात प्रथमच झी टॉकीज वाहिनी प्रस्तुत 'मन मंदिरा' कीर्तन महोस्तवाचे आयोजन करण्यात आले आहे. सबंध मावळ तालुक्यातील वारकरी संप्रदायासाठी ही अभिमानास्पद बाब असून याचे चित्रीकरण उद्यापासून (सोमवार दि. २३ आणि मंगळवार दि. २४ फेब्रुवारी) रोजी शिवप्रसाद मंगल कार्यालय, पवनानगर येथे करण्यात येणार असल्याची माहिती अॅड. भरत ठाकर प्रतिष्ठानचे संस्थापक ज्ञानेश्वर ठाकर यांनी दिली.
अॅड. स्व. भरत ठाकर प्रतिष्ठान आणि पैलवान रोहिदास ठुले यांच्या माध्यमातून या दोन दिवसीय कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी म्हणजेच सोमवार (दि. २३) रोजी ह.भ.प. तुकाराम महाराज मुंडे यांचे सकाळी ११ ते २ या वेळेत तर दुपारी ४ ते ७ या वेळेत ह.भ.प. गीतांजलीताई झेंडे यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे.
दरम्यान, झी समूहाच्या झी टॉकीज या वाहिनीवर सदर कीर्तन सोहळा प्रदर्शित होणार असून संपूर्ण मावळ तालुक्यासह पवन मावळ पंचकृषीतील नागरिकांनी या कीर्तनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन झी टॉकीज वाहिनीच्या वतीने करण्यात येत आहे.