तारीख : 28-04-2025श्रेणी :गुन्हेगारी
तारीख : 22-04-2025श्रेणी :गुन्हेगारी
वडगाव मावळ (Vadgaon Maval) : जुन्या मुंबई-पुणे महामार्गालगतच्या मोहितेवाडी (साते) येथे घरफोडीची घटना घडली. येथील बंद घराचे कुलुप तोडून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम मिळून एकूण ३ लाख ६५ हजार ८५० रुपयांचा ऐवज अज्ञात चोरटयांनी शनिवारी (दि. १९ एप्रिल) रोजी संध्याकाळी साडेसात ते रात्री पावणे बारा या कालावधीत चोरून नेला.
याप्रकरणी संतोष आण्णा मोहिते (वय ४७, रा. मोहितेवाडी, साते, ता. मावळ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे शनिवारी (दि. १९ एप्रिल) रोजी संध्याकाळी साडेसात ते रात्री पावणे बारा या कालावधीत घराबाहेर असताना कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरटयांनी बेडरूममधील लोखंडी कपाट उघडून त्यामधून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम मिळून एकूण ३ लाख ६५ हजार ८५० रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. पुढील तपास वडगाव मावळ पोलीस करत आहेत.
तारीख : 20-04-2025श्रेणी :गुन्हेगारी
शिरगाव (Shirgaon) : किरकोळ कारणावरून एकाला बेदम मारहाण करण्यात आली. शुक्रवारी (दि. १८) रात्री दोन वाजण्याच्या सुमारास धामणे (ता. मावळ) येथे ही घटना घडली.
याप्रकरणी संदिप गोरक्षनाथ गराडे (वय ४६, रा. धामणे, ता. मावळ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी पाटिल हरीभाऊ गराडे, सौमेश पाटील गराडे, महेश नारायण गराडे (सर्व रा. धामणे, ता. मावळ) यांच्यावर शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मित्रांसमवेत जेवण करण्यासाठी मरीमाता मंदिराजवळ जात असताना त्यांच्या घराच्या खालचा पोस्टर फाडून त्यांना ओरडू लागल्याने त्याचा राग मनात धरून आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ करून बेदम मारहाण करत जखमी केले आहे. पुढील तपास शिरगाव-परंदवडी पोलीस करत आहेत.
तारीख : 01-04-2025श्रेणी :गुन्हेगारी
वडगाव मावळ (Vadgaon Maval) : अनैतिक संबंधांच्या संशयातून एका २२ वर्षीय तरुणावर कोयत्याने वार करत त्याची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आज (मंगळवार दि. १ एप्रिल) रोजी रात्री पावणे आठ वाजण्याच्या सुमारास शनि मंदिराजवळ आंबेवाडी, कान्हे (ता. मावळ) येथे ही घटना घडली. घटनेने परिसरात एकच खळबळ माजली असून या २२ तरुणाच्या हत्येने संपूर्ण मावळ तालुका हादरून गेला आहे.
वैभव उमेश सातकर (वय २२, रा. आंबेवाडी, कान्हे) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी अंकुश जयवंत सातकर (वय ४२, रा. आंबेवाडी, कान्हे) असे खून केलेल्या आरोपीचे नाव आहे.
वडगाव मावळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत वैभव सातकर व आरोपी अंकुश सातकर दोघे शेजारी राहत असून मयत वैभव सातकर याचे अनैतिक संबंध असल्याचा त्यांना संशय असल्याने आरोपी अंकुश सातकर याने कोयत्याने वार करत वैभव सातकर याची हत्या केली. थेट मानेवरच वार झाल्याने वैभव याचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुमार कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार डोईजड, पोलीस उपनिरीक्षक ऋतुजा मोहिते व पोलिसांनी धाव घेतली. मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. शवविच्छेदन करण्यासाठी रवाना करण्यात आला आहे. पुढील तपास वडगाव मावळ पोलीस करत आहे.
तारीख : 27-02-2025श्रेणी :गुन्हेगारी
तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) : जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर टायरच्या दुकानात भरधाव कार घुसल्याने अपघात झाला. रविवारी (दि. २३ फेब्रुवारी) रोजी रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास काळोखे पेट्रोल पंपासमोर (ता. मावळ) येथे हा अपघात घडला.
मोहम्मद सलाउद्दीन (वय ३६, रा. काळोखे पेट्रोल पंपासमोर, हिंदुस्थान टायर सेंटर, तळेगाव दाभाडे) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी महमंद नाझीर अन्सारी (वय २७, रा. चाकण) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार MH 04 EQ 9981 वरील अनोळखी चालकावर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे दाजी मोहम्मद सलाउद्दीन हे त्यांच्या हिंन्दुस्तान टायर सेन्टरमध्ये झोपलेले असताना होन्डा सिटी (MH 04 EQ 9981) ही कार घरात भरधाव वेगात असल्याने गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटून ती थेट दुकानात शिरली. त्यामुळे आतमध्ये झोपलेल्या मोहम्मद सलाउद्दीन यांचा या अपघातात मृत्यू झाला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलीस करत आहेत.
तारीख : 17-02-2025श्रेणी :गुन्हेगारी
कामशेत (Kamshet) : मावळातून १९ वर्षीय युवती बेपत्ता झाल्याची घटना गुरुवारी (दि. १३ फेब्रुवारी) रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. जुन्या मुंबई - पुणे महामार्गावरील टोनी ढाब्या समोरून एका अज्ञात दुचाकी चालकाकडे लिफ्ट मागून ती कोणालाही न सांगता निघून गेली आहे.
सोनाली मनोहर टाकळकर (वय १९, रा. बुधवडी, ता. मावळ) असे या युवतीचे नाव असून याप्रकरणी अभिषेक मनोहर टाकळकर (रा. बुधवडी, ता. मावळ) यांनी कामशेत पोलीस मिसिंग तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या मुंबई - पुणे महामार्गावरील टोनी ढाबा येथे नोकरी करत असलेली सोनाली टाकळकर ही युवती गुरुवारी (दि. १३ फेब्रुवारी) रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घरात कोणालाही न सांगता एका अज्ञात दुचाकी चालकाकडे लिफ्ट मागून निघून गेली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तिच्या वर्णनानुसार ती कोणाला आढळून आल्यास तत्काळ कामशेत पोलिसांना कळविण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
वर्णन : रंगाने सावळी, उंची ५ फूट ३ इंच, सडपातळ बांधा, अंगात मेहंदी कलरचा कुर्ता, पांढऱ्या रंगाची पँट आणि गळ्यात सोन्याची चैन, पायात गुलाबी रंगाची चप्पल असून मराठी व हिंदी दोन्ही भाषेत बोलू शकते.
सदर वर्णनाची युवती कोणाला आढळून आल्यास किंवा तिच्याबाबत काहीही माहिती मिळाल्यास कामशेत पोलीस ठाणे 02114 - 262440 अथवा पोलीस निरिक्षक रविंद्र पाटील ( 9923407311) अथवा एन आर कळसाईत (9850259911) यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.