whatsappicon
prajavarta logo
favicon

आपल्या शहरातील ताज्या बातम्या मिळवा मोफत

Install App

Maval Crime : पवना धरण परिसरातील बंगल्यात घरफोडी; रोख रक्कम आणि इतर साहित्य घेऊन चोर पसार

तारीख : 19-07-2025श्रेणी :गुन्हेगारी

feature image
whatsapp

Maval Crime : धक्कादायक! पवना धरण परिसरातील जंगलात ३३ वर्षीय महिलेवर बलात्कार; आरोपी २४ तासात अटकेत

तारीख : 18-07-2025श्रेणी :गुन्हेगारी

feature image

लोणावळा (Lonavala) : लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ठाकुरसाई (ता. मावळ) गावात भरदिवसा ३३ वर्षीय महिलेवर निर्जनस्थळी नेऊन बलात्कार करण्यात अल्यावही धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने महिलेस रस्त्यावरून पाठलाग करत जबरदस्तीने जंगलात नेले आणि साडीने हात व तोंड बांधून बलात्कार केला. या प्रकरणात अवघ्या २४ तासांत पोलिसांनी आरोपीला अटक करत त्याला पोलीसी खाक्या दाखविल्या. 


बाळु दत्तु शिर्के (रा. जवन नं. ०१, ता. मावळ) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


सीसीटीव्ही आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने शोधमोहीम यशस्वी


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांच्या आदेशावरून तपास पथक तात्काळ कार्यरत झाले. अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर व लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने तपास सुरु करण्यात आला.


सीसीटीव्ही फूटेज, स्थानिक माहिती आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने आरोपीचा माग काढण्यात आला आणि २४ तासांत आरोपी बाळु शिर्के याला अटक करण्यात पोलिसांना यश आले.


तपास कार्यात सहभागी अधिकारी व अंमलदारांची टीम


या तपास मोहिमेत महिला सहा. पोलीस निरीक्षक विजया म्हेत्रे, सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत आवारे, राहुल गावडे, दत्ताजीराव मोहिते, उपनिरीक्षक अभिजीत सावंत, प्रकाश वाघमारे तसेच पोलीस अंमलदार सचिन घाडगे, दिपक साबळे, आसिफ शेख, विक्रम तापकिर, अमोल शेडगे, बाळासाहेब खडके आदींनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. या गुन्ह्याचा पुढील तपास महिला सहायक पोलीस निरीक्षक श्रीमती विजया म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

whatsapp

Maval Crime : शिवणे मंडल अधिकारी लाच प्रकरणातील दोन्ही आरोपींना १८ जुलैपर्यंत पोलीस कोठडी

तारीख : 17-07-2025श्रेणी :गुन्हेगारी

feature image

पवनानगर (Pawananagar): शिवणे गावातील मंडल अधिकारी मारुती चोरमले (वय ५३) आणि खाजगी व्यक्ती जयेश बारमुख (वय ३३, रा. चांदखेड) यांना २ लाख रुपयांची लाच घेताना अँटी करप्शन विभागाने रंगेहाथ पकडले. मंगळवारी (दि. १५ जुलै) रोजी ही कारवाई करण्यात आली. त्यानंतर आरोपी न्यायालयात हजर केले असता पुणे विशेष न्यायालयाने दोन्ही आरोपींना शुक्रवार (दि. १८ जुलै) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की, या प्रकरणातील तक्रारदार आणि त्यांची बहीण यांच्यासह २२ जणांनी २०१८-१९ मध्ये १ कोटी ९० लाख रुपयांना एक विकसन करार केला होता. मात्र संबंधित बांधकाम व्यवसायिकाने त्यांची फसवणूक करून जमीन दुसऱ्याला विकली. त्यावर झालेला फेरफार रद्द करण्यासाठी चोरमले यांनी २ लाखांची मागणी केली.


तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केल्यानंतर, १५ जुलै रोजी भोसरीतील अ‍ॅकॉर्ड हॉस्पिटलसमोर सापळा रचून दोघांना अटक करण्यात आली. चोरमले यांनी तक्रारदाराला कार्यालयीन सहायक बारमुखकडे पाठवले आणि पैसे देण्यास सांगितले होते. दोघांविरोधात भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुहास हट्टेकर करत आहेत.

whatsapp

Maval Crime : ब्रेकींग! मावळ तालुक्यातील शिवणे मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात; दोन लाखाची लाच घेताना रंगेहाथ अटक

तारीख : 16-07-2025श्रेणी :गुन्हेगारी

feature image

पवनानगर (Pawananagar) : मावळ तालुक्यातील शिवणे मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात अडकला असून लेटिगेशन झालेला फेरफार रद्द करण्यासाठी तब्बल २ लाखाची मागणी करण्यात आली होती. ही रक्कम स्वीकारताना आरोपी लोकसेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटक करण्यात आली. मंगळवारी (दि. १५ जुलै) रोजी ही कारवाई करण्यात आली.


मंडल अधिकारी मारुती महादेव चोरमले (वय ५३, शिवणे, ता. मावळ) आणि जयेश बाळासाहेब बारमुख (वय ३३, रा. चांदखेड, ता. मावळ) असे रंगेहाथ अटक करण्यात आलेल्या लोकसेवक आणि खाजगी व्यक्तीचे नाव आहे.

 

हेही वाचा : तब्बल १७ वर्षांनंतर तुकोबांची पालखी आळंदी मार्गे देहूत परतणार


लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त दयानंद गावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांची बहीण आणि इतर २१ लोकांनी मिळून सन २०१८ व २०१९ मध्ये एका बिल्डरला १ कोटी ९० लाख रुपये देऊन त्याच्याकडून कुसगाव प.मा. येथील गट नंबर २०९ मधील ३८ गुंठ्याचे क्षेत्र विकसन करारनामा करून घेतले. परंतु या क्षेत्राचा विकसन करारनामा झाला असताना सुद्धा बिल्डरने त्या २२ लोकांची फसवणूक करून ते क्षेत्र दुसऱ्या व्यक्तीला खरेदीखत करून देऊन विकले. त्या ३८ गुंठ्याचे खरेदीखत केल्यानंतर त्याची नोंद सातबाऱ्यावर करण्यासाठी त्या व्यक्तीने तलाठ्याकडे अर्ज केला. त्या अर्जावर संबंधित तलाठयाने फेरफार नोंद करून तो फेरफार मंजुरीसाठी आरोपी मंडल अधिकारी मारुती चोरमले यांच्याकडे पाठवला. 


त्यावेळी तक्रारदाराची बहीण व इतर २१ लोकांनी तो फेरफार मंजूर न होण्यासाठी हरकत घेतली. त्याप्रमाणे आरोपी चोरमले यांनी हरकतीच्या अर्जावर सुनावणी चालू केली. त्यादरम्यान तक्रारदाराची बहीण व इतर २१ लोकांनी तक्रारदाराला अधिकारपत्र देऊन त्यांच्या नावे पॉवर ऑफ ऍटर्नी लिहून दिली. त्याप्रमाणे तक्रारदार हे चोरमले यांच्याकडे दाखल हरकतीच्या प्रत्येक सुनावणीच्या वेळी हजर राहू लागले.

 

हेही वाचा : खराब, कुजलेले आणि उंदरांनी कुरतडलेले बटाटे वापरून वडा विक्री; लोणावळ्यातील हॉटेल व्यावसायिकाकडून पर्यटकांच्या आरोग्याशी खेळ!


त्यानंतर नवीन झालेला फेरफार रद्द करण्यासाठी तसेच ते ३८ गुंठ्याचे वादग्रस्त क्षेत्र तक्रारदाराची बहीण व इतर २१ लोकांच्या नावावर होण्यास मदत करण्यासाठी मंडल अधिकारी चोरमले यांनी तक्रारदाराकडे २ लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून पुढील कामासाठी त्यांच्या ऑफिसमध्ये काम करणारा जयेश बारमुख याला भेटण्यास सांगितले. त्याने सुद्धा तक्रारदाराकडे चोरमले यांच्यासाठी २ लाख रुपये व त्याच्यासाठी वेगळे पैसे द्यावे लागतील अशी लाचेची मागणी केल्याची तक्रार तक्रारदार यांनी दि. १४/०७/२०२५ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे येथे दिली होती.


त्यानुसार तपास करत असताना आरोपींनी तक्रादार यांच्याकडे २ लाख रुपयाच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर मंगळवारी (दि. १५ जुलै) रोजी सापळा रचून ऍकॉर्ड हास्पीटलच्या समोर, स्वाईन रोड, भोसरी, पुणे येथे लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. दोघांवर भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशन, पिंपरी चिंचवड आयुक्तालय येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, सन १९८८ चे कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुहास हट्टेकर हे करत आहेत. 

 

whatsapp

Lonavala News : खराब, कुजलेले आणि उंदरांनी कुरतडलेले बटाटे वापरून वडा विक्री; लोणावळ्यातील हॉटेल व्यावसायिकाकडून पर्यटकांच्या आरोग्याशी खेळ!

तारीख : 15-07-2025श्रेणी :गुन्हेगारी

feature image

लोणावळा (Lonavala) : राज्यभरातीलच नव्हे देश आणि परदेशातील पर्यटकांचा सातत्याने ओघ असलेल्या लोणावळा शहरात मुख्य बाजारपेठेतील एका प्रसिद्ध वडा विक्रेत्याकडून सडलेले बटाटे वापरून वडे विक्री केल्याचा किळसवाणा प्रकार समोर आला आहे. ‘चौधरी वडेवाले’ या ठिकाणी खराब, कुजलेले आणि उंदरांनी कुरतडलेले बटाटे वापरून वडा तयार केला जात असल्याचे धक्कादायक वास्तव एका नागरिकाच्या लक्षात आले. या प्रकाराबाबत संबंधित व्यक्तीने त्वरित ११२ या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांना माहिती दिली.


मुख्य आचारी पळाला; पोलिसांनी केला पंचनामा


पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी संपूर्ण परिस्थितीची पाहणी केली. मात्र तोपर्यंत मुख्य आचारी फरार झाला होता. पोलिसांनी घटनेची नोंद करून अन्न व औषध प्रशासन (FDA) यांना माहिती देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.


बटाटे सडलेले, पाणी गढूळ – वडा झाला आरोग्यास घातक


तपासणीदरम्यान समोर आले की, तयार होणारे बटाटे पूर्णतः सडलेले होते आणि त्यावर उंदरांचे चावण्याचे पुरावेही आढळले. एवढ्यावरच न थांबता, बटाटे उकळण्यासाठी वापरलेले पाणीही अत्यंत गढूळ व अशुद्ध होतं. त्यामुळे तयार होणारे वडे पर्यटकांच्या आणि नागरिकांच्या आरोग्यास गंभीर हानी पोहोचवू शकतात.


स्थानिक नागरिकांची संतप्त प्रतिक्रिया – प्रशासनाकडे चौकशी व कारवाईची मागणी


दररोज हजारो देशी-विदेशी पर्यटक लोणावळा शहरात दाखल होतात. अशा ठिकाणी अस्वच्छ खाद्यपदार्थ विकणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. खाद्य विक्रेत्यांकडून होणारी अशी बेपर्वाई थांबवण्यासाठी कठोर कारवाई व नियमित तपासणी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

whatsapp

Crime News : मुंबई-पुणे एक्सप्रेसवर रक्तचंदन तस्करीप्रकरणी फरार असलेले दोन मुख्य आरोपी अखेर अटकेत!

तारीख : 12-07-2025श्रेणी :गुन्हेगारी

feature image

शिरगाव (Shirgaon) : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अवैधपणे रक्तचंदनाची वाहतूक करणारा कंटेनर पकडण्यात आला होता. यावेळी ९ कोटी रुपये किमतीचे रक्तचंदन ताब्यात घेण्यात आले होते. परंतु यातील दोन मुख्य आरोपी हे तब्बल चार महिन्यांपासून फरार होते. त्यांना अटक करण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे. दोघांनाही पोलीस कोठडी मिळाल्यानंतर न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले असून १५ जुलै २०२५ पर्यंत पुढील तपास सुरू राहणार आहे.


राजेंद्र विठ्ठल शिंदे (वय ४३, रा. वाशी, नवी मुंबई) हा मुख्य सूत्रधार गुन्हा घडल्यानंतर फरार होता. तर तौसिफ रियाज जमादार याने सुरुवातीला आपले खोटे नाव ‘कल्पेश सिंग’ असे सांगून तपासाची दिशाभूल केली होती. दोघांनाही बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.


पिंपरी चिंचवड पोलीस उपआयुक्त (गुन्हे) डॉ. शिवाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर दिनांक २ मार्च २०५ रोजी, अवैधपणे रक्तचंदनाची वाहतूक करणारा कंटेनर पकडण्यात आला होता. त्यावेळी दोन आरोपींना अटक करून सुमारे ९ कोटी रुपये किमतीचे रक्तचंदन जप्त करण्यात आले होते. सदर प्रकरणी शिरगाव परंदवाडी पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. रक्त चंदनाच्या तस्करीच्या गुन्ह्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलिसांनी कसून तपास केला. यामध्ये आरोपी शिंदे आणि जमादार हेच मुख्य आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. ते गेल्या चार महिन्यांपासून पोलिसांना हुलकावण्या देत होते.


परंतु गुरुवारी (दि. १० जुलै २०२५) रोजी विशेष पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे नेरुळ (नवी मुंबई) येथून राजेंद्र शिंदे याला अटक करण्यात आली. तर शुक्रवारी (दि. ११ जुलै २०२५) रोजी राजेंद्र शिंदेच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीवरून कौपरखैरणे (नवी मुंबई) येथून तौसिफ जमादार यालाही ताब्यात घेण्यात आले. दोघांनाही पोलीस कोठडी मिळाल्यानंतर न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले असून १५ जुलै २०२५ पर्यंत पुढील तपास सुरू राहणार आहे.


ही यशस्वी कारवाई पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, सहआयुक्त शशिकांत महावरकर, अपर आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार आणि सहाय्यक आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ आणि त्यांच्या पथकाने केली. या गुन्ह्यातील उर्वरित सूत्रधार, वाहतूक मार्ग, आणि आंतरराष्ट्रीय रॅकेटचा शोध घेण्यासाठी तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या नेतृत्वाखाली सुरु आहे.

whatsapp