तारीख : 03-11-2021श्रेणी :राजकारण
तारीख : 27-10-2023श्रेणी :राजकारण
प्रजावार्ता : सुतार, कुंभार, चांभार, सोनार व न्हावी यांसह १८ व्यावसायिकांना २ लाखांचे तारणमुक्त कर्ज देण्याची पंतप्रधान विश्वकर्मा कौशल सन्मान योजना लोकांना व्यवसाय करण्यास प्रोत्साहित करत आहे. गेल्या महिन्यातच ही योजना सुरू करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १७ सप्टेंबर रोजी ही योजना सुरू केली. या योजनेंतर्गत शिल्पकार आणि कारागीरांना विविध लाभ देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
या योजनेंतर्गत शिल्पकार आणि कारागीर यांची ओळख पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र आणि ओळखपत्राद्वारे केली जाईल. पाच ते सात दिवसांचे प्रशिक्षण ५०० रुपये प्रतिदिन स्टायपेंडसह दिले जाईल. मूलभूत कौशल्य प्रशिक्षणाच्या सुरुवातीला ई-व्हाउचरच्या स्वरूपात १५ हजार रुपयांपर्यंतचे टूलकिट प्रोत्साहन दिले जाईल.
हमीशिवाय कर्ज
या योजनेअंतर्गत तीन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज कोणतेही तारण न देता दिले जाईल. ही रक्कम दोन हप्त्यांमध्ये दिली जाईल. या अंतर्गत अनुक्रमे १८ महिने आणि ३० महिन्यांच्या कालावधीसाठी ५% व्याजदराने एक लाख आणि दोन लाख रुपयांच्या दोन हप्त्यांमध्ये कर्ज दिले जाईल.
फायदा कोणाला होणार?
ही योजना १८ व्यवसायांशी संबंधित कारागिरांसाठी आहे. यामध्ये सुतार, बोट बनवणारे, शस्त्रे बनवणारे, लोहार, हातोडा आणि साधन किट बनवणारे, कुलूप तयार करणारे, सोनार, कुंभार, चांभार, शिल्पकार (शिल्पकार, दगडी कोरीव काम करणारे), दगड तोडणारे, मोची/जूता कारागीर, गवंडी यांचा समावेश होतो. तसेच टोपली/चटई/झाडू निर्माते/कोयर विणकर, बाहुली आणि खेळणी बनवणारे (पारंपारिक), न्हावी, हार बनवणारे, धोबी, शिंपी आणि मासेमारी जाळे निर्मितीमध्ये गुंतलेले मजूर आणि कारागीर यांचाही समावेश करण्यात आला आहे.
तारीख : 21-04-2023श्रेणी :राजकारण
तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) : तळेगाव शहरातील छोट्या हॉटेल चालकांना व चायनीज हॉटेल चालकांना रात्री अकरापर्यंत व्यवसाय करण्याची परवानगी पोलिसांनी द्यावी, अशी मागणी जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक मारोती मद्देवाड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. याप्रसंगी चायनीज असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता भोसले, प्रवक्ते मिलिंद अच्युत, जनसेवा विकास समितीचे संघटक योगेश पारगे, शिवसेना तालुका संघटक सुनील उर्फ मुन्ना मोरे, नगरसेवक रोहित लांघे, पोलीस अधिकारी प्रशांत वाबळे, बाबाराजे मुंडे, किशोर गिरीगोसावी आदी उपस्थित होते.
किशोर आवारे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तळेगाव शहरामध्ये अनेक स्थानिक नागरिक तसेच परप्रांतीय देखील छोटे व्यवसाय करत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने चायनीज, स्नॅक्स, ज्यूस, आईस्क्रीम, चाट मसाला स्टॉलच्या माध्यमातून ते आपल्या रोजीरोटीचा प्रश्न सोडवत आहेत. मात्र तळेगाव दाभाडे पोलिसांनी या सर्व व्यावसायिकांना रात्री दहापर्यंतच व्यवसाय करावा, अशी विनंती केली होती. परंतु सायंकाळी सात ते दहाच्या दरम्यान व्यवसाय करण्यास निर्बंध घातल्यामुळे मिळणारा निव्वळ नफा अत्यल्प असल्याचे व्यवसायिक धारकांनी जनसेवा विकास समितीच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले. त्यामुळे सर्व छोट्या व्यवसायिकांना रात्री दहाऐवजी अकरापर्यंत व्यवसाय करण्यासाठी मुभा मिळावी, असे निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान, सर्व छोट्या हॉटेल व्यवसायिकांनी जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्याकडे सदर प्रश्न सोडवण्यासाठी विनंती केली होती. त्यानुसार व्यावसायिकांचे होणारे नुकसान लक्षात घेत आवारे यांनी सर्व छोट्या व्यवसायिकांना रात्री दहा ऐवजी अकर पर्यंत व्यवसाय करण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात विनंती पत्र देण्यात आले असल्याचे, जनसेवा विकास समितीचे प्रवक्ते मिलिंद अच्युत यांनी सांगितले. तर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवदवाड, यांचे तळेगाव शहरावर व गावातील नागरिकांवर प्रेम असल्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यावसायिकांच्या हिताचा निर्णय लवकरच घेतील, असा विश्वास जनसेवा विकास अच्युत यांनी व्यक्त केला आहे.
तारीख : 14-12-2021श्रेणी :राजकारण
पवनानगर : मराठी तरुणांनी व्यवसायाकडे वळावे असे काले येथील दि एम्पायर रेस्टॉरंट, प्रतिक ॲग्रो फुड इंन्डस्ट्रीजचे उद्घाटन प्रसंगी केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री रामदासजी आठवले बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे जिल्हा आरपीआयचे अध्यक्ष सुर्यकांत वाघमारे हे होते.
यावेळी पुणे जिल्हा आरपीआयचे अध्यक्ष सुर्यकांत वाघमारे, संत तुकाराम कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, जीत आठवले, परसुराम वाडेकर, लोणावळा नगरपरिषेदेचे उपनगराध्यक्ष दिलीप दामोदरे, माजी नगरसेवक सुभाष जाधव, रमेश चिमुरकर, नारायण पाळेकर, शैलेंद्र चव्हाण, स्वप्निल कांबळे, किरण राक्षे, संदीप भुतडा, किसन घरदाळे, गणेश गायकवाड, आनंद रोकडे, अशोक कांबळे, विजय कालेकर, अशोक शेडगे, बबन कालेकर, बाळासाहेब भागवत, राकेश मंदाडे, प्रदीप कांबळे, कैलास गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना आठवले म्हणाले की, मराठी तरुण व्यवसायात उतरायला घाबरतो. त्याचे कारण त्याच्यात व्यवसायाबद्दल निर्माण झालेली भिती. त्यामुळे आपला तरुण मागे राहतो. त्यामुळे तरुणांनी नोकरीच्या मागे न धावता व्यवसायात लक्ष घालून तो मोठा करण्यासाठी प्रयत्न करावेत.
यावेळी बोलताना सुर्यकांत वाघमारे म्हणाले की, भालेराव यांनी शांताई गार्डन या हॉटेलपासून व्यवसायाला सुरूवात केली होती. त्यांनंतर शांताई मंगल कार्यालय उभारुन अनेक गोरगरीब नागरिकांसाठी अल्पदरात कार्यालय उपलब्ध करून दिले. आता प्रतिक ॲग्रो फुड इंन्डस्ट्रीजच्या माध्यामातून नवीन व्यवसाय प्रगतीपथावर जाईल यात शंका नाही.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक लक्ष्मण भालेराव यांनी केले. सुत्रसंचालन अतुल सोनवणे यांनी तर आभार राहुल सोनवणे यांनी मानले.
तारीख : 30-11-2021श्रेणी :राजकारण
वडगाव मावळ : मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाने जिल्हा उदयोग केंद्र, मिटकॉन यांच्या संयुक्त विद्यमाने संतोष जांभुळकर युवा मंच आयोजित स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळावा वडगाव मावळ येथील शासकीय विश्रामगृह प्रांगणात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले व दीपप्रज्वलन करण्यात आले आणि शिवन्या ग्रुपच्या मुलींनी शिववंदना सादर केली. सर्व उपस्थित मान्यवरांचा श्री.संतोष भाऊ जांभुळकर युवा मंच वतीने स्वागत सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रस्तावनेमध्ये संतोष जांभुळकर यांनी सांगितले की, कोरोनाच्या काळामध्ये अनेक युवकांच्या नोकऱ्या गेल्या काही कंपन्या बंद पडल्या अक्षरशः बरेच जण बेरोजगार झाले, यातून सर्वांना सावरण्यासाठी योग्य दिशा, मार्गदर्शन मिळण्यासाठी या स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे असे सांगितले.
याप्रसंगी व्यासपीठावर सहकार महर्षी माऊली दाभाडे, आमदार सुनील शेळके, व्याख्याते शरद तांदळे सर, व्याख्याते गणेश खामगळ सर, जिल्हा उदयोग केंद्राचे व्यवस्थापक, वडगाव नगरीचे मा. नगरअध्यक्ष मयूर ढोरे, संत तुकाराम सहकारी साखर कारखाना संचालक अंकुश आंबेकर, मावळ तालुका खरेदी विक्री संघांचे मा. चेअरमन पंढरीनाथ ढोरे, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस युवक अध्यक्ष सुनील दाभाडे, मावळ तालुका राष्ट्रवादी महिला अध्यक्षा सुवर्णाताई राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी सरचिटणीस शशिकला सातकर, ग्रामपंचायत सदस्य तृप्ती जांभुळकर, राष्ट्रवादी काँग्रेस रायगड जिल्हा निरीक्षक रुपाली दाभाडे, लोकनियुक्त सरपंच विजय सातकर, मा. सरपंच. प्रकाश आगळमे, मा. सरपंच दत्तात्रय पडवळ, संजय गांधी निराधार योजना मावळचे अध्यक्ष नारायण ठाकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे विष्णूशेठ गायखे, वडगाव नगरीच्या विद्यमान उपनगराध्यक्षा शारदाताई ढोरे, मावळ तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष विलास मालपोटे, मा.सरपंच चंद्रकांत दहिभाते, ग्रामपंचायत सदस्य बाबाजी चोपडे, ग्रामपंचायत सदस्य विक्रम कलावडे, मा.सरपंच गजानन खरमारे, बाळासाहेब खरमारे, मा. सरपंच मंगल मुऱ्हे आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच काही पत्रकार ही उपस्थित होत. त्यामध्ये विजय सुराणा, सुदेश गिरमे, गणेश विनोदे, महादेव वाघमारे, किशोर ढोरे आदी पत्रकार उपस्थित होते. कार्यक्रम प्रसंगी वडगाव नगरीच्या उपनगराध्यक्षा शारदाताई ढोरे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळाव्या प्रसंगी शुभेच्छा देताना सहकारमहर्षी माऊलीभाऊ दाभाडे यांनी सांगितले की, इथून पुढे युवकांनी व्यवसायात उतरले पाहिजे व निवडलेल्या व्यवसायात सातत्य ठेऊन काम करायला पाहिजे असे सांगितले.
तर आमदार सुनील शेळके यांनी आपल्या मनोगतामधून संतोष जांभुळकर यांनी राबवलेल्या या स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळाव्याचे कौतुक केले. कारण असे मेळावे फार कमी प्रमाणात आयोजित होत असतात व आपल्या तालुक्यात पहिल्यांदाच असा मेळावा होत आहे. यासाठी शुभेच्छा दिल्या, उपस्थित सर्वांनी या मेळाव्याचा जास्तीत जास्त उपयोग आपल्या व्यवसाय उभारणी करावा असे सांगितले.
तदनंतर मिटकॉन च्या वतीने गणेश खामगळ सर यांनी उद्योजकीय मानसिकता या विषयावर आपले मत मांडले व सांगितले की, उद्योजक होण्यासाठी आपल्यातील नकारार्थी भावना बदलून होकारार्थी बना, म्हणजे आपली मानसिकता बदला व स्वतःला सिद्ध करा असे सांगितले.
स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळाव्याचे मुख्य मार्गदर्शन व्याख्याते शरद तांदळे यांनी आपल्याला दिलेला विषय म्हणजे महिला व युवकांना रोजगार संधी याबत सांगितले की अनेक संधी आपल्याकडे चालून येतात पण आपण त्याचा सुयोग्य वापर करत नाही त्यासाठी आता पेटून उठा रोजगाराची संधी आहे त्याकडे वाटचाल करा तसेच चांगली माणसे, चांगली वाचलेली पुस्तके, चांगल्या संधी आयुष्य बदलून टाकतात आता स्वतःला बदला असे सांगून आपल्या मार्गदर्शनाने शरद तांदळे सरांनी उपस्थित सर्वाना मंत्रमुग्ध केले व संतोषभाऊ जांभुळकर यांनी हा मेळावा आयोजित करून तरुणांना पुढील काळात त्याचा नक्कीच फायदा होईल असे सांगितले व मावळध्ये येऊन आपल्या भूमीमध्ये आलो आहे असे आवर्जून सांगितले.
कार्यक्रम प्रसंगी उपस्थित मान्यवरांचा परिचय प्रा. देविदास आडकर सर यांनी करून दिला तर उपस्थित सर्वांचे आभार भानुदास जांभुळकर यांनी मानले. साते मावळध्ये वारकऱ्यांचा जो दुर्दैवी अपघात झाला त्यातील मृत वारकऱ्यांना श्रद्धांजली समर्पित करण्यात आली आणि वंदे मातरम घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली. स्वयंमरोजगार मार्गदर्शन मेळावा कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालन प्रा. लक्ष्मण शेलार सर यांनी केले.